पुरंदरायण - दांभिक जन हे
कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..
दांभिक जन हे भुलू नको
फसूं नको रे तूं फसू नको ॥ध्रृ॥
कटीस सोवळे शाल पांघरती
गळा उपवित टिळा रेखिती
सोवळे म्हणती, उड्डाण करिती
बाह्य रुपासी तू भुलू नको
फसूम नको रे तूं फसू नको ॥१॥
गळा घालिती हे तुळशीची माळ
मनी भरला यांच्या तो कामजाळ
बोलणे वागणे नाही ताळमेळ
नाही शुध्द चित्त संग यांचा नको
फसूं नको रे तूं फसू नको ॥२॥
शास्त्र नानापरी सांगती पुराण
सांगे ब्रह्मज्ञान कोरडा पाषाण
अध्यात्म दुकान दक्षिणा कारण
सोड यांचा संग भुलू नको
फसूं नको रे तूं फसू नको ॥३॥
कूळशील वर्ण, वृथा अभिमान
मार्ग ही चुकला, नाही आत्मज्ञान
ऐसे हे दांभिक, माजले रान
पुरंदर विठ्ठल तो सोडू नको
फसूं नको रे तूं फसू नको ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2023
TOP