पुरंदरायण - नको सोडू हरिचरण
कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..
नको रे मना सोडू तू हरिचरण
रविकिरण चरण शरण पावन ॥ध्रृ॥
मतिभ्रष्ट होवू नको, माझे माझे म्हणून
मतिभ्रष्ट होता, येती का तुजे आप्तजन
नको रे मना.... ॥१॥
यज्ञयाग कशास्तव योगीयति कारण
त्रिभुवनी नारायण, करी तयाचे भजन
नको रे मना....॥२॥
संतसंग करुनी, करी वेदशास्त्र पठण
वेदांचे सार, नको सोडू तयाचे चरण
नको रे मना....॥३॥
हरिचरणी होता लीन, घोर पाप क्षालन
अनन्यभावे ते पुरंदर विठ्ठल स्मरण
नको रे मना....॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2023
TOP