पुरंदरायण - उदर वैराग्य
कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..
उदर वैराग्य पोट जाळणे कारण
तुझे परमार्थ साधन, भावभक्तीवीण ॥ध्रृ॥
पभाती तीर्थामाजी तुझे चालते स्नान
काम, क्रोध, लोभ, मद मनामाजी ठेवून
जनामाजी मिरविसी ठेवोनी अभिमान
परि नाही सांडिले तू अंतरीचे अवगुण
उदर वैराग्य....१॥
संध्या, जप, तप तुझे भक्तीचे प्रदर्शन
मनी तुझ्या रुपसी परनारीचे चिंतन
स्वत:स म्हणविसी, बैरागी, ज्ञानसंपन्न
व्यर्थ तुझी खटपट, नाही तुज आत्मज्ञान
उदर वैराग्य.....॥२॥
नाना सुवर्ण, रौप्य, ताम्र आणिक पाषाण
भोवती तुझ्या जणु देव प्रतिमेचे दुकान
परिपरी परिमळ धूप दीव ते भजन
आत्मवंचना अवघी हे कसले पूजन
उदर वैराग्य.....॥३॥
भक्तिवीण सोंग ढोंग भजन कीर्तन
नव्हेच परमार्थ पोट जाळण्याचे साधन
चित्त करी स्थीर, सांडोनिया अवगूण
पुरंदर विठ्ठल चरणी जा तू शरण
उदर वैराग्य .....॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2023
TOP