मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|पुरंदरायण|
दासा पाहोनी दार लाविते

पुरंदरायण - दासा पाहोनी दार लाविते

कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..


गावभवानी दासा पाहोनी दार लाविते
आतील पाप आत ठेवोनी दार लाविते ॥ध्रृ॥
वेदभारत, पुराणसार जाळील पाप
हरीचे दास, तया पाहोनी दार लाविते
गावभवानी दासा पाहोनी....॥१॥
पदी घुंगरु हरिकीर्तनी रंगला दास
गीत गोविंद कर्णी पडेल दार लाविते
गावभवानी दासा पाहोनी....॥२॥
हरिचरण रज होईल घर मलीन
हरिदासा हाकलून टवळी दार लाविते
गावभवानी दासा पाहोनी....॥३॥
पुरंदर विठ्ठल चरण बाहेर ठेवोन
उतली मातली कैदाशिण दार लाविते
गावभवानी दासा पाहोनी....॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 04, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP