अष्टम व द्वादश लग्नांचे दोष
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
वधूवरांचे उभयतांचे अष्टम जन्मलग्न व अष्टम जन्मराशी याप्रमाणे योग आला असता तो उभयतांच्याही मृत्यूस कारणीभूत होतो. हे लग्न किंवा ही राशी असता इतर योग कितीही चांगले जुळून आले असले तरी ते सर्व निष्फ़ळ होतात. यासाठी अशा प्रसंगी विवाह होऊच देऊ नये. हे लग्न इतके वाईट असते की, ते तर टाळावयाचेच, परंतु त्याशिवाय त्याचा कोणताही अंश अगर त्या अंशाचा अधिपती असला तर तोही पत्करता कामा नये. नाही म्हणावयास जन्मराशी आणि जन्मलग्न यांपैकी कोणत्याही एकाचा जो स्वामी असेल, त्याचा स्वामी विवाहलग्नाचाही स्वामी असेल, अगर उभयतांच्याही स्वामीचा एकमेकांशी मित्रभाव असेल, तर मात्र केलेल्या विवाहाचे फ़ळ अशुभ होत नाही, व विवाहस्थितीत शिरणार्या कन्येस संतती, दीर्घायुष्य व इतर सर्व प्रकारचे गृहसौख्य मिळते. जन्मलग्न आणि जन्मराशी या दोहोंस ज्याप्रमाणे अष्टम भवन ( स्थान ) वर्ज्य म्हणून सांगितले आहे, त्याचप्रमाणे दोहोंसही द्वादशस्थानही वर्ज्य सांगितले आहे. अर्थात द्वादशस्थानचे जन्मलग्न व जन्मराशी यांच्या योगाने विवाहित दंपत्यात नेहमी भांडणतंटे होतात, व यासाठी असा विवाहही प्रयत्नेकरून न होऊ दिला पाहिजे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP