संग्रहदोष
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
चंद्र आपल्या क्षेत्री असेल, अथवा मित्रक्षेत्री असून उच्चीचा असेल, तर त्यापासून वधूवरांचे कल्याण होते. परंतु तसा नसून जर त्याचा इतर पापग्रहांशी योग झाला तर ‘ संग्रहदोष ’ नावाचा दोष होतो, व त्याची फ़ळे अशुभ असतात. यासंबंधाने नारदाची पुढील वचने ज्योतिषग्रंथांत आढळतात :
सूर्यण संयुते चंद्रे दारिद्र्यं भवति ध्रुवम् ।
कुजेन मरण व्याधि: सौम्येन त्वनपत्थता ॥
दौर्भग्यं गुरुणा युक्ते सापत्न्यं भार्गवेण तु ।
प्रव्रज्या सूर्यपुत्रेण राहुणा कलह: सदा ॥
केतुना संयुते चंद्रे नित्यं कष्टं दरिद्रता ।
तस्मिमन्संग्रहदोषे तु विवाहं नैव कारयेत् ॥
पापद्वययुते चंद्रे दंपत्योर्मरणं ध्रुवम् ।
या वचनात चंद्राच्या इतर प्रत्येक ग्रहाशी घडलेल्या योगाची फ़ळे सांगितली आहेत ती अशी : ( १ ) सूर्य ( दारिद्र्य ), ( २ ) मंगळ ( मरण अगर रोगपीडा ), ( ३ ) बुध ( संतती न होणे ), ( ४ ) गुरू ( दौर्भाग्य ), ( ५ ) शुक्र ( सापत्नभाग म्हणजे स्त्रीस सवत होने, पतीने निराळी स्त्री वरणे ), ( ६ ) शनी ( संन्यासग्रहण ), ( ७ ) राहू ( नेहमी कलह ), ( ८ ) केतू ( निरंतर कष्ट व दारिद्र्य ). हा असा दोष असल्यामुळे त्या दोषावर लग्न करूच नये. चंद्राचा योग या ठिकाणी एकेक पापग्रहाशी झाला आहे, व त्याची फ़ळे अशा प्रकारची आहेत, परंतु तोच योग जर दोन पापग्रहांशी होईल, तर वधू आणि वर या उभयतांस निश्चयाने मृत्यू येणार असे समजावे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP