गंडान्तदोष
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
कालाचे अगर कालगणनेच्या साधनांचे जे अनेक विभाग कल्पिले आहेत, त्यांतले समीपवर्ती कोणतेही दोन विभाग एकत्र घेतले असता एका विभागाचा शेवट व दुसर्याचा आरंभ मिळून होणार्या काळास या शास्त्रात ‘ कालसंधी ’ असे नाव दिले आहे. या कालसंधींपैकी कित्येक संधींच्या प्रसंगी एखादे मांगलिक कृत्य केले असता त्याचा मागाहून अशुभ परिणाम घडतो, व यावरून या विशेष कालसंधींस ‘ गंडान्त ’ अशी निराळी संज्ञा योजिली आहे. यांचे ( १ ) नक्षत्रगंडांत, ( २ ) लग्नगंडान्त, व ( ३ ) तिथिगंडान्त, असे तीन प्रकार असून प्रत्येक प्रकारात विशेष प्रसंगी अशुभ घटिकांच्या निरनिराळ्या संख्या सांगितल्या आहेत. या संख्या लिहीत बसण्याचे प्रयोजन नाही. मात्र प्रत्येक गडान्ताच्या प्रसंगी तितक्या घटिकांच्या अवधीत कोनतेही माम्गलिक कृत्य करू नये एवढे सांगितले असता पुरे आहे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP