वराच्या गुणांसंबंधाने अनुमाने
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
स्त्रीगुणांच्या वर्णनावरून वराच्या गुणवर्णनासंबंधाने ज्या गोष्टी सहज अनुमानाने समजण्यासारख्या असतील त्यांची पुनरुक्ती न करिता विशेष प्रतिपादनाने समजण्याच्या निराळ्या गोष्टी असतील तेवड्यांचे विवेचन करण्याचा हेतू दर्शविला आहे. या हेतूस अनुसरून पुढील लेख आता लिहावयाचा; तथापि त्यास आरंभ करण्यापूर्वी कोणकोणत्या गोष्टींचे विवेचन पुनरुक्तीच्या रूपाने होणे पुनरुक्तीच्या रूपाने होणे अगत्याचे नाही, त्या गोष्टींचे स्वरूप वाचकांस विशेष व्यक्त रीतीने कळावे, एतदर्थ त्यांचा सामान्यत: नामनिर्देश एक वेळ नमूद करणे अधिक सोईचे होणार आहे. स्त्रीगुणांची धर्मशास्त्रास अनुसरून प्रथमची यादी प्रकरण १ क. ५ येथे, व ज्योतिष, सामुद्रिक इत्यादी शास्त्रांवरून पाहण्याच्या गुणांची यादी पुढील दोन प्रकरणात येऊन गेली आहे, त्या यादींवरून ज्या गोष्टींबद्दलचे अनुमान नि:संशय होऊ शकते, त्या गोष्टी पुढे दर्शविल्या आहेत.
( अ ) वर आणि वधू यांचा सपिंडसंबंध नसावा. ( कलम ५ उ ).
( आ ) वधू परापेक्षा लहान असावी, ( क. ५ ऊ ), अर्थात वर वधूपेक्षा मोठा असला पाहिजे.
( इ ) वर आणि वधू यांचे गोत्र आणि प्रवर हे एक नसावेत ( क. ५ लृ. )
( ई ) क. ३५ येथे उ, ऊ, ऋ, ए, ऐ, या पोटकलमात सांगितलेली कूटे, व लृ आणि ओ यांत सांगितलेल्या गण आणि नाड्या, या गोष्टी वधूच्या बाजूकडून वरास अपाय करणार्या नसाव्यात; अर्थात या प्रत्येक गोष्टीसंबंधाने पुरुषाची कूटे, गण आणि नाड्या ह्या स्त्रीकूटादिकांच्या मानाने वरिष्ठ प्रतीच्या अगर निदान बरोबरीच्या असाव्या.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP