वधूवरांच्या राशी नक्षत्रे यांचे ऐक्य नसावे
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
वधूवरांच्या जन्मराशी एक, पण जन्मनक्षत्रे निराळी, असल्यास उभयतांचा विवाह उत्तम होय. याचाच व्युत्क्रम म्हणजे जन्मराशी भिन्न असून जन्मनक्षत्रे एक असा प्रकार असल्यास उभयतांचा विवाह मध्यम समजावा. दोघांचीही जन्मनक्षत्रे एक व जन्मराशीही एक, असा प्रकार सर्वथा त्याज्य होय, व तशा प्रकारचा विवाह झाला असता त्यापासून प्राणहानी होते. एका नक्षत्राच्या पोटी अशा भेदावर जन्म असणे वगैरे आणखी सूक्ष्म विचार आहे. परंतु तो येथे लिहिणे नको.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP