कामशास्त्राधारे जाणण्याच्या गोष्टी
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
मासामुद्रिक शास्त्राधारे स्त्रियांचे पद्मिनी इत्यादी वर्ग सांगण्यात आले होते, तशा प्रकारे पुरुषजातीचे वर्ग सांगितले असल्याचे कोठे पाहण्यात नाही. कामशास्त्रावरील ग्रंथांत उभय जातींच्या गोपनीय भागांच्या विशेष स्वरूपांवरून आणखी एका निराळ्या प्रकारचे वर्गीकरन केले आहे, त्यात पुरुषांचे ( १ ) शशक ( ससा ), ( २ ) वृषभ ( बैल ), व ( ३ ) अश्व ( घोडा ) असे तीन वर्ग वर्णिले असून, स्त्रियांचे ( १ ) मृगी ( हरिणी ), ( २ ) वडवा ( घोडी ), व ( ३ ) करिणी ( हत्तीण ) हे तीन वर्ग सांगितले आहेत, व त्या शास्त्राच्या दृष्टीने कोणत्या प्रकारच्या स्त्रीस उपभोगसमयी कोणत्या जातीच्या पुरुषाची अपेक्षा असते याचा नामनिर्देश केला आहे. हा विषय पाहू जाता स्वाभाविक अश्लीलपणाचा आहे, यासाठी येथपर्यंत विवेचन झाले त्याहून अधिक विवेचन करणे नलगे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP