मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|वरपरीक्षा|
कुलपरीक्षा

कुलपरीक्षा

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


ग्राह्य व वर्ज्य कुले : ही परीक्षा करिताना ती आईच्या बाजूने दहा व बापाच्या बाजूने दहा पुरुषांपावेतो करावी, असा गृह्यसूत्रकारांचा आशय असून, यासंबंधाने मनूची पुढील वचने निबंधग्रंथांत लिहिली आहेत :
( अ ) उत्तमैरुत्तमो नित्यं संबंधानाचरेदिह ।
निनीषु: कुलमुत्कर्षमपमानवतां त्यजेत् ॥
विशुद्धा: कर्मभिश्चैव श्रुतिस्मृतिनिदर्शिन: ।
अविप्लुतब्रह्मचर्या महाकुलसमन्विता: ॥
संतुष्टा: सज्जनहिता: साधवस्तत्त्वदर्शिन: ।
रागद्वेषामर्षलोभमानमोहविवर्जिता: ॥
अक्रोधना: सुप्रसादा: कार्या: संबंधिन: सदा ॥
‘ देवला ’च्या मते पुढील प्रकारची कुले वर्ज समजावी :
( ब ) अग्रजा येषु वंशेषु स्त्रीप्रजाप्रसवस्तथा ।
पतिघ्न्यश्च स्त्रियो यत्र तानि यत्नेन वर्जयेत् ॥
‘ संस्काररत्नमाला ’ नामक ग्रंथात आणखी एका निराळ्या स्मृतीपैकी पुढील वचने लिहिली आहेत :
( क ) कुविवाहै: क्रियालोपैर्वेदानध्ययनेन च ।
कुलान्यकुलतां यान्ति ब्राह्मणानि क्रमेण च ॥
शिल्पेन व्यवहारेण शूद्रापत्यैश्च केवलम् ।
गोभिरश्वैश्च यानैश्च कृष्या राजोपसेवया ॥
अयाज्ययाजनैश्चैच नास्तिक्येन च कर्मणा ।
कुलान्यकुलतां यान्ति यानि हीनानि मंत्रत: ॥
या वचनांचे अर्थ : ( अ ) उत्तम कुलात जन्मलेल्या मनुष्याने उत्तम कुलाशी संबंध जोडावा. आपल्या कुलाचा उत्कर्ष व्हावा अशी इच्छा करणाराने हीन कुलाशी संबंध करू नये. उत्तम आचाराने वागणारे, श्रुतिस्मृती जाणणारे व त्यांचा विचार करणारे, ब्रह्मचर्यापासून न चळलेले, स्वत: मोठ्या कुलातले, आनंदवृत्ती बाळगणारे, सज्जनांचे हित करणारे, मनाचे थोर, तत्त्वज्ञानी; राग, द्वेष, मत्सर, लोभ, मान आणि मोह यांस थारा न देणारे; क्रोधरहित, सदा प्रसन्न वृत्तीचे, अशांशी नेहमी संबंध जोडावा. ( ब ) ज्या कुलातील पूर्वीच्या स्त्रियांस स्त्रीजातीचीच संतती झाली आहे, व ज्यांतील स्त्रिया पतीचे घात करीत आल्य आहेत, अशी कुले प्रयत्नेकरून वर्ज्य करावीत. ( क ) वाईट प्रकारचे विवाह, योग्य क्रियांचा म्हणजे आचारांचा लोप, वेदाध्ययन न करणे, यायोगाने मूळची कुले उत्तम असली तरी ती वाईट ठरतात. ( वाईट ) धंदे अगर व्यवहार; केवळ शूद्रांच्या मुलांशीच संबंध; गाई, घोडे व वाहने यांच्यात कारभार; शेतकी अगर राजसेवा ज्यांच्याबद्दल यज्ञ करू नये त्यांच्याबद्दल यज्ञ करणे, व नास्तिकपणाचे आचरण, यायोगाने मूळची चांगली असलेली कुलेदेखील वाईट मानिली जातात. तसेच ज्या कुलात वेदमंत्रांच्या क्रिया नाहीत, ती कुलेही निंद्य समजावीत.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP