मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|वरपरीक्षा|
संसारीपणा व निवृत्तिमार्गनिषेध

संसारीपणा व निवृत्तिमार्गनिषेध

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


सांप्रतकाळी विद्यार्थांची विद्या पितृगृही राहूनच होते, यामुळे पित्याच्या घरच्या गरिबीचे अगर श्रीमंतीचे ज्ञान त्याला होणे साहजिक आहे. या ज्ञानाचा उपयोग त्याजकडून कशा प्रकारे होतो याची परीक्षा लग्नसंबंध ठरविण्यापूर्वी करणे विहित आहे. विद्यार्थिदशेत विद्यार्थ्यांस अनेक सोबती मिळतात, व त्यांच्या सहवासाने त्याला कित्येक प्रकारच्या बर्‍या - वाईट सवयी लागू शकतात. या सवयीच्या पायी मुलांना आपल्या घरच्या स्थितीचे भान राहात नाही असे अनेक प्रसंगी घडते. घरी गरीबी असली तरी बाहेरच्या सहवासाने मुलाला उधळेपणाची खोड लागते, व श्रीमंती असलेला मुलगादेखील गृहस्थितीस पुढेमागे न झेपणार्‍य़ा अशा सवयी अगर व्यसने लावून घेतो. या खोडी अगर व्यसने प्रथम प्रथम जडतात, त्या वेळी त्यांचे दुष्परिणाम कोणासही फ़ारसे जाणवत नाहीत; परंतु एक वेळ ती पक्की जडली म्हणजे मात्र ती सुटणे दुरापास्त होते, व त्यांचा घातुक अंमल भावी हरएक संसारकृत्यावर होत राहतो.
वरपरीक्षण करिताना त्याची स्वभावपरीक्षा करण्याविषयी मागे लिहिलेच आहे, त्याप्रमाणे परीक्षा करिताना वराचे अंगी मितव्ययीपणा व व्यसनापासून अलिप्तता या गोष्टींबद्दलही शोध अवश्य केला जावा एवढेच या ठिकाणी सुचविले असता पुरे होईल. मितव्ययीपणा अंगी नसेल तर मनुष्यास आपल्या संसारस्थितीचे भावी उग्र रूप कळू शकणे अशक्य आहे; व हे उग्र रूप अगोदरपासून ओळखून सावधपणे वर्तन करणे कोणासही केव्हाही इष्ट नाही;  यासाठी कन्येच्या भावी हिताचे चिंतन करण्यार्‍या मातापितरांनी व पालकांनी या स्थितीची शक्यता जितकी टाळावी तितकी थोडीच.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP