ब्रह्मचर्यसमाप्तीनंतर वधूशोधार्थ वराचा प्रवास
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
तात्पर्य हेच की, राजेलोकांच्या घरचे मोठेमोठे व कदाकाळू विस्तीर्ण स्वरूपाने घडून येणारे अपवादाचे प्रसंग खेरीज करून सामान्य लोकव्यवहारांत वरानेच आपणायोग्य वधूचा शोध करीत हिंडण्याच्या पूर्वकाळा रिवाज होता. हा शोध करण्यास वर निघण्यापूर्वी त्याची गुरुगृहीची ब्रह्मचर्याची दीक्षा पुरी होऊन जाऊन गुरूच्या आज्ञेने तो पित्याच्य आज्ञेने घरी परत येई; व त्याचे समावर्तन म्हणजे सोडमुंज, व केशान्त म्हणजे ब्रह्मचर्यस्थितीत वाढलेला जटा व श्मश्रू यांचे मुंडन, हे प्रकार होऊन जात; व त्यानंत पित्याची आज्ञा घेऊन तो आपणाकरिता वधू पाहण्याच्या उद्देशाने प्रवासाचरणास प्रवृत्त होत असे.
ब्रह्मचर्यस्थितीत त्यास अति कडक नियमांचे पालन करावे लागे, व त्यायोगे त्याच्या वर्तनावर अथवा स्वभावावर सुपरिणाम झाल्यशिवाय सहसा राहात नसे. हा असा सुपरिणाम झाला असता त्याच्या अंगी खरी योग्यत देशोदेशी आपोआप लोकांच्या दृष्टीस पडण्याच्या योग जुळून येई; व असे योग येता दरम्यान कोठे तरी त्यास कन्या देण्याचा हेतू कन्यापिताच्या मनात येऊन तो गावशिवेवरील त्याच्या मुक्कामावर जाऊन त्याची साहजिकच पूजा करी. या पूजेच्या प्रसंगाने आलेल्या वराची खरी योग्यता समजून येणे यातच त्याच्या स्वभावाचीही परीक्षा सहजगत्या होऊ शकत असे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP