येथपर्यंत धर्मशास्त्रग्रंथांतून आढळणार्या वचनातून वरपरीक्षेसंबंधाने वर्णिलेल्या गोष्टींचे शास्त्रांस अनुसरून आणखीही कित्येक गोष्टींचा प्रसंगाने विचार, करण्याची पाळी येते, सबब त्यासंबंधाने येथे थोडासा उल्लेख करणे अगत्याचे आहे. स्त्रीजातीच्या गुणदोषांचे विवेचन मागे केले आहे, त्या वेळी या सर्व शास्त्रांचा उल्लेख करण्यात आला होता. परंतु त्या वेळी कन्येची परीक्षा वरपक्षाकडून व्हावयाची ह्या गोष्टीवर मुख्य कटाक्ष असल्याने, जेणेकरून वर आणि वधू यांच्या गुणदोषतुलनेत वधूचे पारडे जड न होईल, व वरास श्रेष्ठास किंवा ती न साधल्यास निदान बरोबरी प्राप्त करून घेता येईल, अशा स्वरूपानेच स्त्रीजातीबद्दल विवेचन करण्यात आले होते.
प्रस्तुत प्रसंगी या स्थितीचा थोडासा व्युत्क्रम व्हावयाचा आहे, - म्हणजे वराची परीक्षा करण्याचे काम वधूपक्षीयांचे असल्याने त्यांनी आपल्या कन्येच्या वर्चस्वाकडे दृष्टी न दिली, तरी निदान तिच्या जन्मभर कल्याणाच्या गोष्टी कोनत्या हे पाहून तदनुसार पुढील वर्तनाची दिशा ठरवायची या धोरणाने सांप्रतच्या विषयाचा विचार कर्तव्य आहे. तसेच वधूवरांचे गुण मिळवून लग्न होण्याचे निश्चित झाल्यावर केव्हा केव्हा नजरचुकीने मुहूर्तयोजना भलतीच होते, व त्यामुळे वधूवरांच्या गुणांचा फ़ायदा होण्या एकीकडे राहून उलट भलताच परिणाम होतो. यासाठी मुहूर्त ठरविताना निराळ्या कोणकोणत्या गोष्टींबद्दल जपावयाचे त्याबद्दलचाही उल्लेख थोडाबहुत होणे अगत्याचे आहे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP