पापङ्वर्ग विवाहास वर्ज्य
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
मेषादी बारा राशींचे स्वामित्व निरनिराळ्या सूर्य, चंद्र इत्यादी ग्रहांकडे वाटले गेले असून ते काही विशेष प्रसंगी अशुभदायक होतो, व इतर प्रसंगी शुभदायक असते. एकंदर दिनमानाच्या तिसाव्या अंशास ‘ लग्न ’ ही संज्ञा असून, अर्धे लग्न म्हणजे ‘ होरा ’ व एक-तृतीयांश लग्न ‘ द्रेष्काण ’ याप्रमाणे विशेष अर्थाचे शब्द ज्योतिषग्रंथात मानिले आहेत. हे तीन वेळा भाग व त्याचप्रमाणे लग्नाचा नववा, बारावा व तिसावा भाग मिळून वेळेचे सहा प्रकार होतात व या प्रत्येक प्रकारात विशिष्ट राशीवर ग्रहविशेषाचे स्वामित्व असल्यामुळे त्या प्रकारची वेळा अशुभदायक मानिली गेली आहे, व अशा वेळी मांगलिक कृत्य करू नये असे ज्योतिषग्रंथांचे मत आहे. या विशेश वेळांसंबंधी ग्रहांस ‘ पाप ’ व इतर वेळी ‘ सौम्य ’ अशा पारिभाषिक संज्ञा आहेत. त्या वेळी कार्य करण्याचे योजिले असेल त्या वेळी निंमेहून अधिक ग्रह शुभस्थानी असेल, तर बाकीच्या अशुभस्थानच्या ग्रहांचे महत्त्व मानावयास नको, असाही ग्रंथकारांचा आशय आहे. अशुभ स्थानच्या ग्रहांचे आधिक्य झाल्यस स्त्रीय वैधव्य येते.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP