मुरलीपंचक
मोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.
( गीतिवृत्त )
व्यक्तानेकस्वरसतरंगिणी जींत विश्वमति मुरली,
व्रजवनितांची दूती चुंबिशि ते हे मनोरमा मुरली. ॥१॥
जीची नादसुधा या ब्रह्मांडघटीं भरोनियां उरली,
जी ज्येष्ठ सुरभिभगिनी चुंबिशि ते हे मनोरमा मुरली. ॥२॥
नखमणिकिरणीं अधरामृतससिक्ता सदैव अंकुरली,
श्रीची प्रबळ समत्नी चुंबिशि ते हे मनोरमा मुरली. ॥३॥
विरहीं व्रजबाळाहीं जीवरि मृदुलांगुलीतती चुरली,
वंशप्रभवा सरला चुंबिशि ते हे मनोरमा मुरली. ॥४॥
यन्माधुर्योत्कर्षश्रवणें वाणी सुधा मनीं झुरली
भक्तामयूरघना हरि ! चुंबिशि ते हे मनोरमा मुरली. ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP