मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मोरोपंत|स्फुट काव्यें|
भगवत्प्रसादमहिमा

भगवत्प्रसादमहिमा

मोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.


( गीतिवृत्त )

व्हाव्या प्रसाद तुलसीमाळा श्रीमत्पदावरिलचि बुका
येणेंचि धन्यता स्वस्वीकार करावया धरिल चिबुका.     १
विधि हरहि म्हणे स्वपदर-पात्र पदापुढिल खारकेला हो.
ईणें उर:क्षतीं षडरींच्या निज लाभ खार केला हो !     २
यमदूत न पृष्ठीं, सुर पायांवरि बारिक मारितात बुक्या,
ज्याचा श्रीचरणांच्या भाग्यें होईल पात्र हात बुक्या.     ३
तारी जनासि लाउनि आपण होउनि अलाबु कासेला,
श्रीचरणींचा झांकुनि शोभवितो बहु भला बुका सेला.     ४
प्रणताधना म्हणावें श्रीदत्तें द्रवुनि ‘ बाबु ! क्या ? ले, खा. ’
तुज पुसतां भाळींच्या कांहीं नाहींच बा ! बुक्या ! लेखा.     ५
जी साधुकरप्राप्ता गोड सुधेहूनि बहु सुपारी ती
येईल व्यजनाची जरि गुरू तरि काय हो ! सुपा रीती ?     ६
साधुप्रेषित आला, प्रेमें धांवूनि दूर कागद हा
पांच किती ? नच याची सरि करितिल कामपूरकाग दहा.     ७

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP