मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मोरोपंत|स्फुट काव्यें|
सिद्धेश्वरस्तव

सिद्धेश्वरस्तव

मोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.


( गीतिवृत्त )

श्रीसिद्धेश्वरदेवा ! दे वात्सल्यें स्पृहा मला भजनीं.
याहुनि मोक्षाचाही अधिक, महामुनिमतें, न लाभ जनीं.     १
धन्यत्व सुरांसि तसें भजनें सिद्धेश्वरा ! नरा होतें.
भक्तिप्रतिबंधक जें, त्वन्नामोच्चारणें न राहो तें.     २
भुक्तिहि मुक्तिहि साधुनि देतो तव, सेवका नरा, बेल,
भक्तगृहीं श्री राबे; शक्रादिक देव कां न राबेल ?     ३
भक्तें समर्पिल्या तूं मानिसि मणिमुकुट शंकरा ? बेला.
त्या अमृताशन करिसी, पात्र न जो परम रंक राबेला.     ४
करुनि प्रसाद दीनीं, यश तूं सिद्धेश्वरा ! अचाट विसी.
परमोदारा ! देवा ! दासाकरवीं न ओठ चाटविसी.     ५
वरदवरा ! मदनहरा ! प्रणतपराभ्युदयहेतु तूंचि खरा.
‘ धत्तूर वहत्यावरि ’ म्हणसी ‘ रत्नेंचि देव हो ! विखरा. ’     ६
मागे क्षीर, तयास क्षीरधि दिधला तुवां, अगा धात्या !
सिद्धेश्वरा ! प्रभुवरा ! ज्या तव लीला महा-अगाधा त्या     ७
काम जळे, तव माथां केवळ जड दस्यु पाय दे, वांचे;
पावे गतिहि; तुजपुढें महिमे रुचतील काय देवांचे ?     ८
न्हाणी वदनजळें, त्या भिल्लाचें व्यास भाग्य वाखाणी.
दीनाचा मोहद्रुम, तत्काळ तव प्रसाद बा ! खाणी.     ९
तू आशुतोष; ऐसा नच कथिला अन्य देव वेदांनीं
सिद्धेश्वरा ! त्वदितरा स्वपद, खात्मा, न देववे दानीं.     १०
म्हणसि, ‘ मज प्रणति करा; अति दुर्लभ वस्तु जें, वदा, न्या तें ’
तरिच महादेवा ! वा ! लाजवितें यश तुझें वदान्यातें.     ११
भक्तमयूरें आर्या सिद्धेशा ! वाहिल्या तुला अकरा.
कीं तूं प्रभु म्हणसी, ‘ स्तुति रुचती; संकोच दास हो ! न करा. ’     १२

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP