विठ्ठलपद्मस्तुति
मोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.
( गीतिवृत्त )
उपदेशें उद्धरिले किति भक्त ? किती भुजप्रतापानें ?
‘ कळिकाळीं विश्व तरो ’ म्हणसी ‘ निजपादपद्मरसपानें. ’ १
पाय तुजे गतिकारण, जोडियले त्वां तयां वरूनि भले.
पायचि जोडूनि तुजे प्रेमळ संसारसंकटीं निभले. २
श्रीकरलालितकोमळपदकमळें, ज्यांत सुरनदी - उगम,
तापोपशमनपटुतर दाविशि शरणागतांसि बहु सुगम. ३
समपदविलोकनें तूं जनास हें सूचविसि असें वाटे.
समपद यांचें देणें. लागावें चरणभक्तिच्या वाटे. ४
श्रीचरणाची जोडी, पाहुनियां, भक्त जाणते जाले.
जोडी हेचि सुखाची, जोडुनियां यांसि, बहु सुखें धाले. ५
पंढरपुरांत आम्हीं इटेवरी नीट जोडिले पाय,
हा अनुकार न केला उपदेशग्रहण रूसलां काय ? ६
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP