|
स्त्री. १ मषी ; लिहिण्यासाठीं बनविलेला रंगित द्रव पदार्थ . शाईचा उपयोग लिहिण्याची सुरवात झाल्यानंतर बर्याच काळानें झाला - ज्ञाको २० . १५ . २ लोखंडाच्या किसापासून तयार केलेलें मृदंग , पखवाज इ० स लावण्याचें लुकण , रोगण . [ फा . सियाही ] वि. १ ताबा , अंमल यासंबंधीं ; गुण , स्वभाव , नांव धारण करणारा ; मालकीचा . उदा० पुणेंशाई , मुंबईशाई , सुरतशाई . २ कडून प्रस्थापित ; संबध्द ; वाच्य - वाचक . उदा० शिंदेशाई ; होळकरशाई , अप्पाशाई , बाबाशाई . ३ नाणीं , चाली , रीतरिवाज , पध्दती , कायदे वगैरे . उदा० शिवशाई , आदिलशाई , इ० ४ विशिष्ट जातिगुणादिवाचक . उदा० ब्राह्मणशाई , शूद्रशाई , मोंगलशाई , सोदेशाई , शिनळशाई , लबाडशाई . - स्त्री . १ अंमल ; सत्ता ; अधिकार ; आमदानी ; कारकीर्द . शिंदेशाई पुण्यामध्यें झाली . २ ( राज्य , गांव , लष्कर , इ० मध्यें राहणारा विवक्षित ) जनसमूह ; समाज . उ० सगळया शाईत यासारखा शूर दुसरा कोणी नाहीं . होळकरशाईमधें मल्हारबा होता एकच पूत . - ऐपो ९० , ११० , १२७ , इ० . ३ राजमंडळ ; राज्य . ४ आणखीं निरनिराळे संकीर्ण उपयोगाचे प्रकार . उदा० ढपळशाई , फुकटशाई , बागशाई , लंगडशाई . [ फा . शाही ] ०घालणें नाश करणें . त्या सुंदर चित्रावर त्या दुष्टानें शाई घातली . ०शिरस्ता पु. १ सार्वजनिक किंवा सर्वसाधारण चालरीत , पध्दत ; रिवाज , रूढी ; जनरीति . २ राजशिरस्ता ; राजरीत . चांगलें माणूस मिळऊन शाई शिरस्त्याचें मर्द माणूस पाहून - समारो १ . १३ . ०देणें कराराप्रमाणें वागण्याची निश्चितता दाखविण्याकरितां आगाऊ कांहीं पैसे देणें , इसार , बयाणा देणें . ०दान दानी - न . स्त्री . ( क . ) दौत ; शाई ठेवण्याचें साधन ; पात्र . ०शिरें न. शिर्याची शाई . - रा ८ . २१ . ०शोक सोक - पु . ( व . ना . न . ) टिपकागद . ( इं . ) ब्लॉटिंगपेपर . [ शाई + शोक ( ष ) णें ] शाईचा पुडा शाईपुडी - पुस्त्री . शाई किंवा लुकण लावलेली मृदंगाची बाजू .
|