Dictionaries | References

लाशा

   
Script: Devanagari

लाशा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Bearing the mark of the cauterizing iron; branded or fired. 2 Having a spot or discoloration resembling the mark of the iron; or having a black and rotten spot in general--a fruit &c.

लाशा     

वि.  
लास ( डाग ) दिल्यासारखे चिन्ह ज्या आम्रादि फलावर असते तो .
लासाचे चिन्हाने युक्त असा ( मनुष्यादि ); डागलेला . [ लास ] लांशे - न . काळा डाग . [ लास ] लास - पु .
वायुविकृति किंवा अन्य रोग इ० च्या निरसनार्थ त्वचा तापलेल्या लोखंडाने भाजणे ; डागणी . ( क्रि० देणे , घेणे ). अज्ञानाचे लांशे । जेथ लागलेंचि दिसे । - भाए ५८९ .
अशी त्वचा भाजून पडलेला डाग किंवा वण .
जन्मापासून माणसाच्या तोंड इ० वर तांबडा , काळा , पिवळा इ० रंगाचा डाग असतो तो ; तीळ ; वांग .
आंबा इ० फळ अंशतः सडल्याचा जो डाग सालीवर उत्पन्न होतो तो . - न . अंगावरील केंसाळ तीळ ( मागील जन्माची खूण समजतात ) [ सं . लाछ , लांछन ] लासणी - स्त्री .
तापलेल्या लोखंडाने दिलेली डागणी . ( क्रि० करणे ).
( विणकाम ) शाई , कोळसा इ० नी विणावयाच्या वस्त्राच्या ताण्यावर केलेली खूण ; लासन . [ लास ] लासणे - सक्रि .
विस्तवांत घालून लाल केलेल्या लोखंडाचा डाग देणे ; भाजणे .
कोणत्याहि कारणासाठी ( त्वचा किंवा पृष्ठभाग ) भाजून , डागून खूण करणे .
पाजणीनंतर ( ताण्याला ) लासे लावणे , खुणा करणे .
भाजणे ; जाळणे . मूर्खा दीपा पतंग । स्वमनिं जर्‍हि म्हणे हे खरे फूल लासी । - मोकृष्ण ५६ . ३९ . - दा ३ . ७ . २५ . - दा १० . १० . ६१ . - अकि .
जळणे . कपडा लासेल ! जरा इस्त्री थंड कर .
बिघडणे ; डागळणे ( फल इ० ) लांसरुं - नपु . केंसाळ तीळ ; वांग ; लांस . लासे - न .
डाग ; वण . लास पहा . परी गुणत्रय वशे । त्रिविधपणाचे लासे । श्रद्धे जे उठिले असे । ते वोळख तूं । - ज्ञा १७ . ७३ .
( विणकाम ) लास ; लासणी पहा . ( क्रि० लावणे ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP