|
पु. सावकार , व्यापारी , उदमी , कारागीर , सोनार , कासार वगैरे यास स्वतंत्रतेने किंवा त्यांच्या नावापुढे लावावयाचा शब्द . ऐसा तूं विठ्ठला जालाशी रे शेट । करूनि बोभाट देसी जना । - ब ४९० . २ जो मनुष्य कलावंतीण बाळगतो त्यास म्हणतात . त्यांच्या यारास मुंबईतील शेट असे म्हणतात . - व्यानि १ . [ सं . श्रेष्ठ - श्रेष्ठिन् ] म्ह० - शेट सवाशेर आणि लिंग अडीच शेर = लिंगायत व्यापारी गळ्यांत लिंग घालतात त्यावरून वरवर दिसणार्या देखाव्यापेक्षां ज्याची प्रत्यक्ष योग्यता कमी आहे अशा इसमास म्हणतात ०कार पु. ( गो . ) व्यापारी ; सावकार . ०की स्त्री. शेटयाचा हक्क . बाजारांत उपयोगांत आण्लेली धान्याची मापें सरकारी शिक्काची आहेत की नाहीत हे तपासणे , पेठेची व्यवस्था ठेवणे , या कामाबद्दल दुकानदाराकडून ( येणार्या मालावर ) शेटयास मिळाणारे उत्पन्न व ते मिळण्याचा हक्क . हा हक्क साधारण मणामागें पाव आणा असे . - आडिवर्याची महाकाली १३ . ०जी पु. शेट यासच गौरवाने म्हणतात . शाई - स्त्री . शेठजीचा तोरा , ढब , ऐट , प्रतिष्ठा ; सावकारीचा मान ; दर्जा ; हुद्दा . ( क्रि० करणे ; लावणे ; मिरवणे ; मोडणे ; आणणे ; दाखविणे ) ०शाई स्त्री. एक प्रकारची विवक्षित मोहोर ( सोन्याचें नाणें ). मोहर स्त्री. एक प्रकारची विवक्षित मोहोर ( सोन्याचें नाणें ). ०सावकार पुअव . व्यापारी , सावकार , उदीमी यांस सामान्यपणे योजावयाचा शब्द . शेटाई - स्त्री . शेटजीपणाची ऐट , दिमाख , तोरा , डौल , पदवी , हुद्दा , थोरवी . शेटाणी - स्त्री . सावकर , व्यापारी याची स्त्री . शेटी - पु . शेट पहा . शेटे , शेटया - पु . १ पेठ , बंदर , गांव वगैरे ठिकाणी मापें , वजनें , दरदाम इत्यादिकांची चौकशी , तपासणी वगैरे करणारा अधिकारी . नवीन पेठा वसविणे हेंहि याचे काम असे . - थोमारो २ . २८७ . शेटे महाजन ऐका कोणी । घोंगडियाची करा शोधणी । - तुगा ३७१ . २ व्यापारी जातीच्या प्रमुख मनुष्यासहि म्हणतात .
|