Dictionaries | References क काज ळी Script: Devanagari Meaning Related Words काज ळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ वात किंवा काकडा वगैरचा जळून काळा झालेला कण , भाग ; कोळी ; कोजळी . ' मग आगी लागलिया कापुरा । ना काजळी ना वैश्वानरा । ' - ज्ञा . १५ . ४३९ . २ धान्यावर , विशेषत ; जोंधळ्यावर पडणारा एक रोग , यामुळें कणसांत धान्याऐवजी काळा पदार्थ निघतो ; कोळशी , काजळ्या , काणी . ३ दिव्याच्या धुरानें जमलेला काळ्या पदार्थाचा थर . ४ दागिन्याच्या अरुंद व खोलगट भोंकातील लाख जाळुन बाहेर काढली म्हणजे आंत जो लाखेचा थोडासा जळका भाग राहतो तो . ५ पित्तविकारानें डोळ्यापुढें येणारी अंधारी . ६ काजळ धरण्याकरितां दिव्यावर जें भांडे वगैरे धरतात तें . ७ काजळाइतपत अतिशय बारीक वाटलेलें औषध वगैरे . ८ काजळला नावांचें झाड . ९ अंबर , राल टरपेंटाइन वगैरे पदार्थ जाळले असतां शिल्लक राहणारें काळेपण . १० ( ल .) दुःख काळजी . ' नाना चिंतेची काजळी । नाना दुःखें चित्त पोळी । ' - दा . ३ . ६ . ५२ . ' चित्ता काजळी लागली । ' - दा . ३ . ७५८ . - वि . काजळाचें केलेलें ( शाई , पागोट्यासाठीं केलेला रंग , अशा रंगानें रंग विलेलें क कापड ). ( सं . कज्जल )०कागद पु. ( इं .) कार्बन पेपर . ज्याच्या पाठीवर लिहिलें असतां खालीं ठेवलेल्या कागदावर अक्षरें असा काळा लेप लावलेला कागद . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP