Dictionaries | References

राहणे

   
Script: Devanagari

राहणे

 क्रि.  नांदणे , मुक्काम करणे , वस्ती करणे , वास करणे ;
 क्रि.  उरणे , बाकी असणे , शिल्लक राहणे , हाती असणे ;
 क्रि.  मावणे , समावेश होणे , सामावणे ;
 क्रि.  टिकणे , जशाचा तसा राहणे , सुस्थितीत राहणे .

राहणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  एखाद्या ठिकाणी वास करणे   Ex. माझे वडील गावी राहतात.
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
SYNONYM:
 verb  दुखणे नाहीसे होणे   Ex. हे औषध घेतल्याने तुझे पोटाचे दुखणे राहील.
 verb  एकाच ठिकाणी थांबून राहणे   Ex. आता तुझे वडील कुठे राहिले?
ONTOLOGY:
कार्यसूचक (Act)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  पूर्ण किंमतमिळणे वा वसूलहोणे   Ex. हजार रुपयातले शंभर रुपये राहिले.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
 verb  एखादी क्रिया केल्यानंतरदेखील काही मागे उरणे   Ex. चांगले घासून धुतल्यावरही हा डाग तसाच राहिला.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
Wordnet:
mniꯂꯩꯍꯣꯕ
urdرہنا , رکنا , بچنا , رہ جانا
 verb  कुणाच्या घरी जास्त काळ राहणे   Ex. दिनू महिनाभर आजीकडेच राहिला आहे
HYPERNYMY:
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
Wordnet:
 verb  एखाद्या विशिष्ट अवस्थेत राहणे   Ex. येथे वातावरण नेहमी एकसारखेच राहते.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
 verb  वंचित होणे   Ex. संतोषचे आपल्या वडिलांचे शेवटचे दर्शन राहून गेले.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
SYNONYM:
राहून जाणे
 verb  देवाणघेवाण इत्यादीमध्ये एखाद्यावर एखादी रक्कम बाकी निघणे   Ex. तुझे आताचे काही राहिले असतील तर सांग मी आता चुकते करतो.
HYPERNYMY:
राहणे
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
SYNONYM:
बाकी राहणे शेष राहणे
   see : उरणे, मावणे, सुटणे, टिकणे, थांबणे, पडणे, उतरणे

राहणे

 अ.क्रि.  
   नांदणे ; वास करणे ; असणे ; मुक्काम करणे . आम्ही सांप्रत काशीत राहतो .
   एका स्थितीत टिकणे . एका बोटावर काठी कशी राहील .
   मावणे ; समाविष्ट होणे ( भांड्यात पदार्थ ). या दौतीत अच्छेर शाई राहील .
   मागे पडणे ; सध्यां टाकले जाणे ; न संपतां पडून राहणे ; तात्पुरते बंद पडणे ( काम इ० ). वाड्याचे काम अर्धे झाले अर्धे राहिले . यंदा त्याचे लग्न होणार होते पण राहिले .
   उरणे , शिल्लक असणे ; हातांत , खिशांत शिल्लक , बाकी म्हणून असणे .
   मागे घेणे ; थांबणे . त्वां शिवी दिलीस तर तो तोंडांत मारल्याशिवाय राहणार नाही .
   शिथिल होणे ; असमर्थ होणे ( अवयव , इंद्रिये ); मोडावणे ; खचणे ( सामर्थ्य , दम )
   ठेवला जाणे ; पदरच्या माणसाप्रमाणे , चाकराप्रमाणे असणे ; कामावर , दिमतीस असणे . तूं एका महिन्याचा चाकर . मी कालपासून राहिलो .
   ( आयाचा शेवटी असणार्‍या धातुसाधितां बरोबर ह्या क्रियापदाचा प्रयोग असतां ) मागे फिरणे , थांबणे . असा अर्थ होतो . हा मारायाचा - खायाचा - बसायाचा - जायाचा - राहिला .
   ( तिरस्कारार्थी ) असूं देणे ; बाजूस सारणे ; दुर्लक्ष करणे . होउनि तृप्त नृपाते भीष्म म्हणे काय ती सुद्धा ? राहो । - मोभीष्म १२ . १२ . [ सं . रह = थांबणे ] साधितशब्द - राहतक - न .
   राहतेपण .
   ( ल . ) राहण्याची क्रिया . यालागि जोते पुसे जातककोणी कोणी राहतक पुसेना । - भारा बाल ९ . ४१ . राहराहो - क्रिवि . पुनःपुनः ; वारंवार . राहराहो शोध घ्यावा । परांतरांचा । - दा १५ . १ . ४ . [ राहून राहून ] राहवणे , राहविणे - सक्रि . राहवून , ठेऊन घेणे . कैकेयी चालली रायासरसी । राहवितां तिसी न राहे । - भारा बाल १ . ८२ . राहवलेपण , राहावलेपण , राहिवलेपण - न . रंगेलपण . कां सरलेया गीताचा समारंभु । न वचे राहवलेपणाचा क्षोभु । - ज्ञा १८ . ४२४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP