मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|उपासना खंड|
अध्याय ९०

उपासना खंड - अध्याय ९०

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

मदनानें तप केलें, त्या स्थानीं रत्‍नखचित मूर्तीस ।

स्थापित केलें तेथें, नाम ’मदोत्कट’ प्रसिद्ध मूर्तीस ॥१॥

श्रीराम वनीं असतां, शूर्पणखा नाक कापिलें येथें ।

यासाठीं या स्थाना ’नासिक’ हें नाम दीधलें येथें ॥२॥

अद्यापी साक्ष अशी, मोदक इव गोल गोल ते दगड ।

दृष्टिस पडती तेथें, स्थान असें पश्चिमेस गंगथड ॥३॥

(दिंडी)

कृष्णपत्‍नी रुक्मिणी पट्टराणी ।

तिचे उदरीं ये मदन शिवावाणी ।

तया चोरुनियां दैत्य समुद्रांत ।

तया बुडवीती शत्रु म्हणुन दूत ॥४॥

तया बाळाला मत्स्य गिळी व्यासा ।

धिवर धरितो तेजयुक्त मासा ।

धिवरपत्‍नी ही चिरित भुक्तिं मासा ।

निघें त्यांतुन कीं एक बाळ खासा ॥५॥

धिवर देई तो शंबरासुरापाशीं ।

असुर देई तो मायवशीपाशीं ।

शिकवि त्याला ती प्रचुर अशा माया ।

निघे बालक सहज तो फिराया ॥६॥

फिरत आला तो नगर सरस्वती ।

कृष्णपत्‍न्या नी रुक्मिणी अशा दूती ।

सुता देखति त्या कृष्ण असा भासे ।

होति लज्जित त्या पतिच साच भासे ॥७॥

तिथें नारदही बघत असे मौज ।

वदत रुक्मिणिला तनन तुझा चोज ।

असें वाटे तो मदन नमी माता ।

पुत्रवात्सल्यें हृदयिं धरी माता ॥८॥

(शार्दूलविक्रीडित)

व्यासा ऐक कथा गणेश भजला शेषें कशी गोडशी ।

कैलासीं बसले सदाशिव सवें घेऊन दाक्षा निशीं ।

उद्यानीं बसले वसंत विलसें विश्रांतिसाठीं असे ।

येती दर्शन घ्यावयास सुरही आदीकरुनी असे ॥९॥

शंभूला स्तविती तयास यजिती पाहुनियां शेष तो ।

गर्वानें वदला शिवा शिरिं बसे भूमार वाहेच तो ।

ऐशी शक्ति मला अशी इतरिं ती नाहीं वदे शेषसें ।

देवांसी अमरत्व दे म्हणुनियां माझी स्तुती कां नसे ॥१०॥

ऐशा गर्वित भाषणा परिसुनी शंभू उठे सत्वरीं ।

गर्वानें फुगला असावध असा खालीं पडे भूवरी ।

फाटे मूख तदा सहस्त्र चिरण्या झाला तयाच्या अशा ।

गेला गर्व पुरा संचित मनसा झाली तयाची दशा ॥११॥

(गीति)

इतुक्यामध्यें तेथें, नारद आले तया पुसायास ।

ऐशी दशा तुझी कां, कारण सांगे मला कळायास ॥१२॥

विधि सांगे व्यासाला, भृगु सांगे सोमकांत रायास ।

अवधान पुढें द्यावें, कवि सांगे हें समस्त लोकांस ॥१३॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP