मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|उपासना खंड|
अध्याय ४१

उपासना खंड - अध्याय ४१

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(कामदा)

धीर दे सुरां श्रीगजानन । विप्ररुप घे श्रीगजानन ।

नाम घे स्वयें तें कलाधरा । भेटला त्वरें राक्षसावरा ॥१॥

उच्च आसनी त्रीपुरासुर । बैसला असे हा कलाधर ।

पातला तिथें देखतां द्विज । आसनीं तया घेत वायुज ॥२॥

त्यास तो वदे वृत्त सांग कीं । सांगतों तुला वृत्त ऐक कीं ।

साग्र त्या कला येति जाण कीं । मी असें नृपा विप्र एक कीं ॥३॥

यामुळें मला हें कलाधर । लोक ठेविती नाम सादर ।

लोक-हीत तें सांगतों सदा । तीन लोक मी हिंडतों सदा ॥४॥

ऐकुनी तुझी कीर्ति येत मी । दर्शनास मी पातलोंच मी ।

वैभवास मी पाहिं आज मी । तुष्टलों अती या स्थळींच मी ॥५॥

(गीति)

त्रिपुरें कलाधराला, पुशिलें तुजला कला किती ठावें ।

पाहुन कलेस तोषित, होउनियां प्राण देत मी भावें ॥६॥

त्रिपुरास वदे मग तो, शिल्पकला ठाउकी असे मजला ।

यास्तव तीन विमानें, करुनी देतों स्वयेंच मी तुजला ॥७॥

एका क्षणांत इच्छित, नेती तुजला बहू भरारीनें ।

इच्छित मनोरथासी, करतिल तीं पूर्णशीं भरारीनें ॥८॥

ऐशीं तीन विमानें, शिवबाणानें त्वरीत नाशास ।

पावति त्रिपुरा तेव्हां, होशिल कीं मुक्त तूं बरें खास ॥९॥

नंतर कलाधरानें, निर्मियलीं तीं पुरें दिलीं त्याला ।

त्रिपुरें पाहुन खुष तूं, मागें मी देतसें अतां तुजला ॥१०॥

तेव्हां कलाधरानें, कैलासाची गणेश ही प्रतिमा ।

चिंतामणि नांवाची, देशी तरि मी बहूतशा प्रेमा ॥११॥

त्रिपुरें भाषण केलें, शंकर किंकर समान मी मानीं ।

विप्र कलाधर यासी, पूजियलें प्रभुसमान मानूनी ॥१२॥

वरती त्याला दिधलें, दश गांवें नी पदार्थ बहुमोल ।

अपुलें वैभव दावी, देउन त्याला करामती मोल ॥१३॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP