मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|उपासना खंड|
अध्याय ५२

उपासना खंड - अध्याय ५२

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(भुजंगप्रयात्)

नृपें सौभरीला प्रश्निलें काय ऐसें ।

गणाधीश हा कोण नी शील कैसें ।

कसें रुप आहे कसा तो स्वभाव ।

असे पुत्र कोणा कुणाचा नि देव ॥१॥

मुनी सांगती वृत्त हें कर्दमास ।

जगा निर्मितो आपुले आश्रयास ।

असे सच्चिदानंद हें ब्रह्मरुप ॥२॥

तयापासुनी ॐ वेदादि विश्वें ।

अशीं जाहलीं जन्मही सर्व विश्वें ।

असे सर्वसाक्षी समस्ता जगाचा ।

गणाधीश आहे जनीता तयांचा ॥३॥

(गीति)

ब्रह्मा तपसामर्थ्ये, निर्मी हें विश्व त्या प्रभू आज्ञें ।

विष्णू पाळित विश्वा, तपसामर्थ्ये करुन त्या आज्ञें ॥४॥

श्रावण शुद्ध चतुर्थी पासून मासीं पुढील चवथी तों ।

केलें तपास मुनिच्या, आश्रमिं तूं म्हणून पावला प्रभु तो ॥५॥

इकडे दर्शन दिधलें, तिकडे सदनीं विपूल संपत्ती ।

देउन कृतार्थ केलें, ऐसें वदती भृगू तया नृपती ॥६॥

स्कंदास शिवें कथिला, कर्दम भृगुचा पुनीत संवाद ।

ऐकुन कर्दम मग तो, या जन्मीं ही करीं व्रता यशद ॥७॥

ऐशा व्रतास करुनी, बहु सुख आणी यशास मिळवून ।

गेला गणेश लोकीं, ऐके सूता व्रतास करि म्हणुन ॥८॥

देव मुनी नी मानव, दानव आणी तसेच गंधर्व ।

जे जे व्रत हें करिती, ते ते सिद्धीस पावले सर्व ॥९॥

नळराजा चंद्रांगद, इंदुमतीही व्रतेंचि लाभासी ।

मिळवुन अनेक सौख्यें, तोषित ते जाहले महीवासी ॥१०॥

येणेंपरि गिरिजेला, पतिभेटीचा उपाय हिमवान ।

सांगुन व्रतास करवी, पुढती द्यावें कथेस अवधान ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP