मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|उपासना खंड|
अध्याय ४४

उपासना खंड - अध्याय ४४

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

देव पराजित झाले, त्रिजगीं प्रसरे अधर्म बहुसाळ ।

यज्ञादि बंद पडले, यास्तव करिती विचार सुर सकळ ॥१॥

त्रिपुराचा नाश कसा, व्हावा ऐसा विचार जंव होई ।

तंव ते नारद आले, शंभूनें पूजिलें तयें ठाईं ॥२॥

शिव नारदास कथिती, युद्धाचें वृत्त हें घडे जें कीं ।

ऐकुन वृत्त वदे मग, ऐकति ते सुरवरादि शंकर कीं ॥३॥

युद्धापूर्वी पूजन, केलें नाहीं गणेश देवाचें ।

यास्तव तुम्हां जय तो, कैसा लाभे दिसे मला साचें ॥४॥

यास्तव गजाननाची, करणें आहे उपासना आधी ।

होई प्रसन्न मग तो, इच्छित तें देतसे हरी आधीं ॥५॥

त्रिपुरें गणेशपूजन केलें म्हणुनी तयास सामर्थ्य ।

आलें आहे सांबा, लाभे त्याला जयादि हा अर्थ ॥६॥

नारद भाषण शिव तें, मान्य करी मानवें तया खचित ।

युद्धासाठीं जाणें, भाग पडे म्हणुनि जातसे त्वरित ॥७॥

संकटसमयीं जपण्या, एकाक्षरि नी षडक्षरी मंत्र ।

दिधलें गजाननांनीं, स्मरण नसे समर-कार्यीं हें मात्र ॥८॥

ऐसें सांगुन शंभू, गेले त्या दंडकावनामाजी ।

एकान्त स्थल पाहुन, तपसा करिती मनोरथां काजी ॥९॥

(इंद्रवज्रा)

पद्मासनीं बैसति ते तपास ।

नासापुटीं प्राण धरीत खास ।

शांती असें साधन इंद्रियांस ।

निश्चिंत हें मानस कीं तपास ॥१०॥

वर्षें दहा तें तप साधनानें ।

निर्माण झाला नर एक त्यानें ।

वक्त्रें तया पांच दहा करांनीं ।

शीर्षी असे चंद्र विराज-मानीं ॥११॥

कंठीं असे रुंडयुताच माळा ।

साजे अही भूषण शंभु भोळा ॥

सूर्यापरी तेज अशीं बहूत ।

चिन्हें तया शोभत वस्तुजात ॥१२॥

(शार्दूलविक्रीडित)

ऐसा दिव्य-पुरुष त्यास वदतो माझे रुपा जाण तें ।

ब्रह्मादी मुनि जाणण्यास नसती ज्ञाते तसे त्यास ते ।

माझा थांग नसेच वेद मथितां लागे कधीं शंकरा ।

घेतो वेष बहू समस्त जगतां संरक्षिता संकरा ॥१३॥

(पृथ्वी)

कृतार्थ करण्यास मी उदित जाहलों शंकरा ।

तुला उचितशा वरा मजसि मागणें शंकरा ।

गणेशवचनास तो मुदित ऐकुनी शंकर ।

स्वरुप अवलोकुनी नयन सर्वही तुष्कर ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP