मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|उपासना खंड|
अध्याय ८५

उपासना खंड - अध्याय ८५

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

ध्यानस्थ शंभू बसले, तें होतें घोर थोर कांतार ।

सिंह व्याघ्र असे हे, प्राणी होते करीत संचार ॥१॥

मदनें त्यांना तेथुन, घालविलें मग करुन उद्यान ।

निर्मी सरोवरें तीं सामर्थ्यानें तयांत तीं छान ॥२॥

मदनाचा मित्र असे, वसंत नामें चतूर उद्यानीं ।

उत्तम सुगंध युक्तहि, पुष्पें निर्मी प्रचूर उद्यानीं ॥३॥

सौगंधयुक्त सुमनें, घेउन गेला शिवाकडे मदन ।

नंतर हळूच शरिं तो, शंकर सावध करीतसे जपुन ॥४॥

(शार्दूलविक्रीडित)

चापाचा ध्वनि ऐकुनी शिव तदा नेत्रांस तो ऊघडी ।

पाहे त्या विपिना तिथें दिसतसे उद्यान तेव्हां घडीं ।

केली ही रचना तपास हरणां दुष्टेंच येथें अशी ।

ऐशी मानसिं पाहिली स्थिति शिवें वृत्तीच क्रोधी अशी ॥५॥

देवांनीं स्तविलें परंतु शिव तो झाला नसे शांत तो ।

रागानें उघडी तृतीय नयना कार्ष्णीच हो भस्म तो ।

रुद्राणी सरली पुढेंच मग ती भिल्लीण वेशांत ती ।

वन्हीसी विझवी मिटून नयनां प्रार्थीतसे पार्वती ॥६॥

(भुजंगप्रयात्)

अहो प्राणनाथा करावी कृपा ही ।

अहो तारकासूर तो पीडितो ही ।

म्हणूनी इथें पातले सर्व देव ।

मुनींही इथें पातले हाच भाव ॥७॥

म्हणूनीच नाथा तुम्हां प्रार्थितात ।

करावी कृपा लक्ष घालून त्यांत ।

म्हणूनीच ध्याना असें भंगियेलें ।

जिहीं भंग केला तईं भस्म झालें ॥८॥

करावी कृपा रक्षणीं सिद्ध व्हावें ।

नमस्कारिलें बोलतां शुद्धभावें ।

तदा शांत झाले मिटोनी त्रिनेत्र ।

स्वयें धीर देती कृपा-पूर्ण-पात्र ॥९॥

(गीति)

पार्वती भाषण ऐकुन, पर्वतवासी स्वयेंच पार्वतिला ।

अंकावरीच घेती, मोद अनावर खचीत पार्वतिला ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP