मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|उपासना खंड|
अध्याय ५५

उपासना खंड - अध्याय ५५

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


नारदाचा उपदेश

(शार्दूलविक्रीडित)

माते शोक करुं नको वदति ते तेथील सारे जन ।

आहे भूप खुशाल कीं परत ते येतीलसे तेथुन ।

त्यांचा शोध करुं त्रिकाळ कळतें ऐसें मुनी पाहुनी ।

त्यांना हें पुसुनी कळे तंववरी शांती धरावी मनीं ॥१॥

लोकांचें म्हणणें तियेस पटलें नेत्रां पुसूनी जनां ।

जाण्याचा दिधला निरोप सदना धीरास देई मना ।

टाकोनी दिधले सुभोग सगळे वैधव्यशी राहिली ।

वर्षें द्वादश तीं पुनीत नियमें पाळून तीं लोटलीं ॥२॥

(गीति)

एके समयीं नगरीं, नारद आले तिच्या सुदैवानें ।

नृपमंदिरांत गेले, पूजन केलें यथाविधी तीनें ॥३॥

इंदुमतीही दिसली, पतिविरहानें कृशी तशी दीन ।

वृत्त निवेदन केलें, ऐकुनि तें करित ते समाधान ॥४॥

भर्ता जिवंत आहे, भेटे तुजला करुं नको शोक ।

वैधव्यपणा टाकुन, भाळीं लावीं सुवासिनी तिलक ॥५॥

कंठीं मंगळसूत्रा, हस्तीं कंकण करींच धारण हीं ।

कर्णीं भूषण घाली, नीलांबर कुंचकीहि धारण ही ॥६॥

नारदवचनें ऐकुन, इंदुमती हर्षली बहू चित्तीं ।

अमृतडोहीं मज्जन, केलेंसें वाटलें तिला चित्तीं ॥७॥

हर्षित मनें करुनी, सत्वर सौभाग्य धारणा केलें ।

स्वादु वांटुन नगरीं, स्वपति कूशल असेंहि कळविलें ॥८॥

इंदुमती राणीनें, विनयें केली मुनीस ती प्रणती ।

पतिची प्राप्ती व्हावी, यासाठीं सेवणें कुणा भक्ती ॥९॥

नारद उपाय सांगे, वरद-विनायक व्रतास करि आतां ।

ऐकुन उपाय सत्वर, व्रत करण्या लागली प्रभू-कांता ॥१०॥

मृण्मय गणेशमूर्ती, पूजियली ती विधीपरी नेमें ।

भक्तिपुरःसर व्रत हें, करिती झाली सुभक्तिनें प्रेमें ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP