मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|उपासना खंड|
अध्याय ४९

उपासना खंड - अध्याय ४९

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


लोकांना संकलित कळावा म्हणून तात्पर्यानें सुलभ करुन लिहिला आहे.

पूजाप्रकार -

पार्वतीला शंकर भेटावेत म्हणून हिमालयानें कथन केले आहेत.

श्रीगणपतीची तपश्चर्यापूर्वक आराधना करण्याचा शास्त्रोक्त विधि :---

१ प्रातर्विधि

२ स्नान

३ वस्त्रपरिधान (धौतवस्त्र)

४. तिलक

५.नित्य विधि (संध्या वगैरे),

६. प्रतिमा करणें

७. पूजासाहित्य

८.आसन

९. भूतशुद्धि

१०. प्राणायाम

११. दिशाबंधन

१२. देवतास्मरण

१३. अंतरबहिर्मातृकापूर्वक आगमोक्त विधीनें न्यास मंत्रन्यास व षडंगन्यास

१४. पूजाद्रव्यप्रोक्षण

१५. देवताध्यान

१६. आवाहन

१७. षोडशोपचार व अभिषेकासह पूजा

१८. स्तोत्रें, सूक्तें व सहस्त्रनाम पाठ

१९. प्रार्थना

२०. नमस्कार व

२१. जप.

प्रतिमाकरण :-

वारुळ व खडयाशिवाय शुद्ध स्थलांतील चांगली चिकट व मऊ माती घ्यावी. सर्व अवयव सुटे, चतुर्भुज, सायुध-परशु-त्रिशूळ, मोदकादिक युक्त अशी गणेशप्रतिमा करावी.

पूजासाहित्य :-

रक्तचंदन, शेंदूर, हळद, कुंकू, अक्षता, १०८ दूर्वा, शमी, तांबडीं पुष्पें, पंचामृत (दूध, दहीं, तूप, मध, साखर), धूप, दीप, नैवेद्य (मोदक, लाडू, खीर, घारगे, तिळाचे लाडू, साळीच्या लाह्या व खडी साखर), नारळ, केळीं, डाळिंब इ० व तांबूल, दक्षिणा व कापूर हें असावें.

आसन :-

एकांत-कार्पास, दर्भ, ऊर्णा व मृगाजीन.

मातृका :-

(शिवासह चार देवता-ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी , वैष्णवी, वाराही, इंद्राणि व चामुंडा ).

ध्यान :-

हे देवा, एकदंता, शूर्पकर्णा लंबोदरा इ० तूं भक्तांच्या इच्छा पूर्ण करतोस. सिद्धि, बुद्धि या दोन परिचारिका आहेत असा आणि ब्रह्मादिक देव ध्यान करितात अशा प्रकारें करावें.

आवाहन :-

हे जगदाधारा, अनाथनाथा, तूं मजसंनिध ये असें करावें.

प्रार्थना:-

हे दीननाथा, दयानिधे, संकटनाशना, त्रैलोक्यनाथा वगैरे तूं माझ्या सर्व अपराधांची क्षमा कर अशी करावी.

साष्टांग नमस्कार करुन नंतर स्थिर मनानें जप करावा.

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP