मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|उपासना खंड|
अध्याय २

उपासना खंड - अध्याय २

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(अंजनी गीत)

ऐसें असतां कांहीं दिवसीं । आद्यकर्मानुसारेंसी ।

गलत्‌कुष्ठ हें त्या राजासी । जडलें हें परिसा ॥१॥

अंगीं पडलीं क्षतें पाही । रक्त आणि पूही वाही ।

अंगीं वेदना सोसत नाहीं । ऐशी स्थिति झाली ॥२॥

कृमी पडले अगणित ऐसे । अंगावरती माशी बैसे ।

राज्यभोग हे आवडेनासे । झाले हे त्यास ॥३॥

प्रधानपत्‍नी आणिक सूता । आपलें दुःखा सांगत होता ।

विलाप मध्यें करितचि होता । दुःखित ते सर्व ॥४॥

राजा बोले प्रधानासी । राज्या बैसवा मम पुत्रासी ॥

वना चालिलों या समयासी । भोगा हें राज्य ॥५॥

बोलत असतां मूर्च्छा आली । सर्व मंडळी बहु घाबरली ।

बहु यत्‍नांनीं शुद्धी आली । सावध मग झाला ॥६॥

(गीति)

नृपति वदे सकलांना, कांती माझी जशी असे सोमा ।

मातृपित्यांनीं पाहुनी, ठेवियलें सोमकान्त या नामा ॥७॥

आतां माझी काया, नाशयली कीं बहूत रोगांनीं ।

न कळे पापें केलीं, मागिल जन्मीं कुवर्तनें करुनी ॥८॥

या जन्मीं मीं केलें, स्मरत नसे कीं कुकर्म मीं केलें ।

पुत्रापरी प्रजेचें, न्यायानें पालनार्थ श्रम केले ॥९॥

दुष्टांचा संग असा, केला नाहीं खरोखरी लेश ।

शंकरभक्तीमध्यें केला नाहीं चुकार लवलेश ॥१०॥

या देहानें पूर्वी, सुगंध द्रव्यें अनेक भोगियलीं ।

आताम दुर्गंधीनें, जीवितआशा वृथा अशी केली ॥११॥

या कष्टयुक्त जीवा, धिःकारीं मी न दाखवीं वदन ।

वाटे मजला लज्जा, यास्तव वनिं मी प्रवेश हो करिन ॥१२॥

भो भो अमात्य तुम्ही, राज्यीं स्थापा मदीय पुत्रास ।

समजा मदीयसम त्या, पालन करणें प्रजेस समयास ॥१३॥

(सुनीत वृत्त)

उरलेली वयसा करीन तपसा ईशापदीं दाससा ।

इहजन्मीं शुभसा कलेवर तसा होईन मी शुद्धसा ॥

करितों मी गमना, वनांत भजना, घालीन ही जन्मना ।

मम सेवा प्रभुंना रुचो अशि मना इच्छीत ही वासना ॥१४॥

(दिंडी)

हेमकंठांना राज्य समर्पावें । राज्य करतिल हें योग्य प्रेमभावें ।

असति कूशल हे शूर वीर नामी । हस्तिसंपदाही पूर्ण पथक धामी ॥१५॥

अम्हीं निष्ठेनें राज्य सेवियेलें । अम्हां चरणांसी पारखेंच केलें ।

इथें राहुनियां सौख्य नसे आम्हां । भक्ति चरणांची आपुल्याच आम्हां

सती बोले मी धर्मपत्‍नि साची । चरणसेवाही नसे अंतराची ।

म्हणुन येत्यें मी आपुल्यासवें राया । धर्म अमुचा हा म्हणे जगन्माया

असें ऐकुनियां हेमकंठ बोले । पितृसेवा हा धर्म राम बोले ।

म्हणुन येतों मी तात तुम्हांसंगें । नसे मजला हें राज्य गोड लागे ॥१८॥

(साकी)

प्रधान, पत्‍नी आणि सुताचीं ऐकुन प्रेमळ वचनें ।

सोमकांत हा मुदित जाहला उपदेशी प्रेमानें ॥१९॥

धृपद

सुन सुन उपदेशा । शरण रिघे जगदीशा ।

माझी आज्ञा पाळुन बाळ राज्य करीं समतेनें ।

प्रधानाची संमति घेईं बहुत आदरानें ॥२०॥

हेमकंठ बा शास्त्रांमाजी जो सुत आज्ञा सेवी ।

जनकाचें जो श्राद्ध करुनियां पिंड गयेसी ठेवी ॥२१॥

ऐशापरि जो वर्ते त्याला सुपुत्र ऐसें नाम ।

आतां बाळा आनंदानें राज्य करीं जपुन ॥२२॥

माझे पत्‍नीसह मी जातों आतां काननवासा ।

बहुत सुखानें राज्य करुनियां मिळवीं लौकिक खासा ॥२३॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP