मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|उपासना खंड|
अध्याय ७६

उपासना खंड - अध्याय ७६

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

महिमा संकष्टीचा, कैसा आहे बघून तो राव ।

कुलगुरु वशिष्ठ आज्ञे, करिता झाला व्रतास सद्भाव ॥१॥

शुभदिनिं यथाविधीनें, पूजन केलें गजानन प्रभुचें ।

संकष्टीव्रत नेमें, भूपें केलें यथाविधी साचें ॥२॥

गणपति विमान धाडी, इच्छित सांगे तयाप्रती भावें ।

सार्‍या प्रजेस येथें, दुःखार्णविं लोटुनी स्वयें यावें ॥३॥

न रुचे मजला दूतां, वदला हें शूरसेन बहु लीन ।

तेव्हां त्या दूतांनी, नगरींचे सर्व लोक जिव-सान ॥४॥

जारज अंडज उद्भिज, स्वदेजही बसविले विमानांत ।

वैमानिक दूतांनीं, चालविलें तें गणेश लोकांत ॥५॥

या समयासी तेव्हां, पुरवासी ते स्तवीत रायासी ।

सांगे विधि व्यासांसी, ऐकें सखया सुरम्य वृत्तासी ॥६॥

जरि भूप पुण्यशाली, असला तरि तो प्रजेस हितकारी ।

होतो जसा परिस तो, लोहासी लागतांच हेम करी ॥७॥

साधूदर्शन होतां, पाप जसें पावतें त्वरें नाशा ।

यापरि स्तविलें भूपा, ते सारे पावती प्रभूवासा ॥८॥

वैमानिकदूत तयीं, देती गतिला त्वरीत गमनास ।

कुंठित गती तयाची, झाली कारण करीत शोधास ॥९॥

कारण कळलें दूतां, ज्या दृष्टीनें विमान इंद्राचें ।

भूमीस लागलें तो, कुष्टी होता तयांत हें साचें ॥१०॥

यास्तव कुष्टी ठेवूं, विमान चढवूं त्वरेंच गगनास ।

ऐसा विचार सुरगण, करिती कळलें नृपास तें खास ॥११॥

भूपति गणांस वदला, जर तो कुष्टी असा इथें त्यजितां ।

तरि मी येतच नाहीं, दुष्कृत त्याचें मला कथा वृत्ता ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP