मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|उपासना खंड|
अध्याय ४८

उपासना खंड - अध्याय ४८

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(सहिता)

महिना कार्तिक हा असे करित जे स्नानास दानास ते ।

करितां होम तपा जपास म्हणुनी होतें बहू पुण्य तें ।

म्हणती यास बहूलमास म्हणुनी नामें बहूला असे ।

पुनवेला म्हणती शिवास रुचते सर्वांत मोठी असे ॥१॥

त्रिपुराचा दिप पाजळोन नच जे उत्साह भावें असा ।

करितो यास्तव त्यास पुण्य नच तें लाभे वदे तो असा ।

करिती उद्यम जो यशास न मिळे ऐशा वरा देतसे ।

आणखी बोलत तो सदाशिव असे सांगे विधी ऐकसें ॥२॥

(गीति)

प्रातःकाळीं यजितां, रात्रीचें पाप नष्ट होईल ।

माध्यान्हीं यजितां तें, जन्माचें पाप नष्ट होईल ॥३॥

सायंकाळीं यजितां, हरती तीं सप्तजन्मिंचीं पापें ।

ऐसें महत्त्व आहे, शंकर यजनांत सांगती अमुपें ॥४॥

पार्वति वृत्ता ऐके, मंदर पर्वत त्यजून तो त्रिपुर ।

गेला ऐकुन मग ती, गुंफेंतुन त्वरित येत बाहेर ॥५॥

मंदार पर्वतावरि, गिरिजा गिरिशास शोधिते गिरिं कीं ।

नलगे तपास कोठें, यास्तव विरहें फिरोन ये गिरकी ॥६॥

पुनरपि उठून मग ती, पतिला आणी पित्यास आव्हानीं ।

शिवभक्त एक धिवरें, रुद्राणीचा विलाप ऐकूनी ॥७॥

ऋषिसह हिमगिरिं बैसे, मनरंजन हें करी तयापाशीं ।

कळवी वृत्त तियेचें, धीवर तेथें हिमालयापाशीं ॥८॥

भूषणयुक्त अशी ती, सुंदरशी कामिनी मला दिसली ।

भटके वनामधें ती, घेते नामा त्वदीय घाबरली ॥९॥

वार्ता परिसुन हिम तो,गेला तत्काळ कन्यकेपाशी ।

वदता झाला मग तो,शोकाकुल तूं किमर्थ गे होशी ॥१०॥

(साकी)

सुमंगले तूं विकल्प चित्तीं आणुं नको जगमाय ।

अंतरयामीं जाणसि तूं कीं शिव सोडिल काय ॥११॥

धृ०॥सुन सुन कल्याणी । भेटे त्रिशूलपाणी ।

हे शक्ती तूं सामर्थ्याची मुख्य असे खाणी ।

यास्तव तुजला पीडित ऐसा कोण असे प्राणी ॥१२॥

आतां तुजला त्वरीत भेटे शिव तो शंकर कांते ।

यास्तव शोका सोडुन आतां येईं मम सदनातें ॥१३॥

बोधुन तिजला हिमवानानें अपुल्या गृहास नेलें ।

पतिविरहानें विव्हळ ऐसी कष्टी मन तें झालें ॥१४॥

मग ताताला उपाय पुसते शिवललना भेटीचा ।

इच्छापूरक उपाय आहे गणनायक यजनाचा ॥१५॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP