एकामागून एक असे तीन मुलगे झाल्यावर चौथी जर मुलगी किंवा मुलगा होईल तर ते मातापितरांच्या (दोहोंच्या) कुलास अनिष्ट जाणावें. त्यांनें ज्येष्ठ पुत्राचा नाश, वित्तहानि, दुःख वगैरे अरिष्टे उद्भवतात. यासाठीं गोप्रसवशान्ति करुन
’मम सुतत्रयजन्मानन्तरं कन्याजनन्सूचितसर्वारिष्ट०’
किंवा ’मम कन्यात्रयजन्मानन्तरं पुत्रजननसूचितसर्वारिष्ट०’ इत्यादि संकल्प करावा आणि स्थंडिलावर पुढच्या भागीं ग्रहांची स्थापना केल्यावर त्यांच्या उत्तरेस पांच कलशांवर ब्रह्मा, विष्णु, महेश, इन्द्र व रुद्र यांचें सोन्याच्या प्रतिमांत आवाहन करुन त्यांचें पूजन करावें. त्या देवतांचें आवाहन--
’ब्रह्मजज्ञानं० इदं विष्णु० त्र्यंबकं० यत इन्द्र० व कद्रुद्राय०’
या मंत्रांनीं करावें. त्यानंतर ग्रहपीठस्थ देवतांचें अन्वाधान करुन,
’ब्रह्माणं विष्णुं महेशं इन्द्रं रुद्रं च प्रत्येकं समिदाज्यचरुतिलैः प्रतिद्रव्यमष्टोत्तरसहस्त्राष्टोत्तरत्रिशताष्टोत्तरशतान्यतमसंख्याहुतिभिः शेषेणेत्यादि’
असें अन्वाधान करावें.