घराच्या नैऋत्य दिशेला सूतिकागृह (बाळंत होण्याची जागा ) करुन --अश्विनी, रोहिणी, मृग, पुनर्वसु, पुष्य, तीन उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती, अनुराधा, धनिष्ठा व शततारका-या-नक्षत्रांवर--रिक्ता तिथि वर्ज्य करुन, इतर तिथींवर---चंद्र अनुकूल असतां---शुभलग्न पाहून--गाई, ब्राह्मण व देव यांची पूजा करुन मंत्र व वाद्यें यांच्या गजरांत मुलें असलेल्या सुवासिनींसह (बाळंतीण होणारणीनें) त्या सूतिकागृहांत जावें. इतकें करण्यास वेळ नसल्यास शुभमुहूर्त पाहून ताबडतोब (सूतिकागृहांत) जावें.