ऋतुकालापासून सहाव्या दिवशीं बायकोसह अभ्यंगस्नान करुन प्राणायाम करावा व देशकालादिकांचा उच्चार करुन, ’पुत्रकामः पुत्रकामेष्टिं करिष्ये---’ असा संकल्प करावा. स्वस्तिवाचनापासून नान्दीश्राद्धापर्यंतचें सर्व कर्म केल्यावर अग्नि मांडावा व ’चक्षुषी आज्येन अत्र प्रधानं अग्निं पञ्चवारं वरुणं पञ्चवारं विष्णुं पृथ्वीं विष्णुं सोमं सूर्यासावित्रीं पायसेन शेषेणस्विष्टकृतमित्यादि’-- असें अन्वाधान करावें. निर्वापकालीं (अग्नि विझवितांना) मंत्रावांचून साठ मुठी मुकाटयानें भांडयांत ठेवून, त्यांवर मंत्रावांचूनच पाणी शिंपडावें. पांढरा गोर्हा असलेल्या पांढर्या गाईच्या दुधांत भात शिजवून, आज्यभाग झाल्यावर त्या भागाचा जो होम करावा, तो असा:- ’अति गर्भ इतिअग्निरैतु इतिसूक्तद्वयस्य हिरण्यगर्भऋषिः । ............तां पूर्षाञ्छव० सूर्यासावित्र्याइदं० ॥’ इत्यादि याप्रमाणें पंधरा आहुतींनीं हवन करुन स्विष्टकृत् होम करावा. नंतर नवराबायकोंनीं (दम्पतांनी) ’अपश्यंत्वेति द्वयोः प्रजाबाजू प्राजापत्यः प्रजापतिस्त्रिष्टुप् हुतशेषचरुप्राशने विनियोगः । अपश्यं०॥’ या दोन मंत्रांनीं होमांतला शिल्लक राहिलेला पायसचरु (तांदुळांची दुधांतली खीर) खाऊन ’पिशङ्गाभृष्टिमित्त्स्य दैवोदासिः पारुच्छेप इन्द्रोगायत्री नाभ्या लभ्मने विनियोगः पिषङ्गभृष्टि०॥’ या मंत्रानें भूमीला स्पर्श करावा. यजमानानें प्रायश्चित्तादि करुन होमशेषाची समाप्ति करावी, आणि ब्राह्मणांना गाई, सोनें वगैरेची दक्षिणा द्यावी. रात्रीं नवराबायकोनीं दर्भ पसरुन त्यांवर निजावें. याप्रमाणें येथें पुत्रकामेष्टिप्रयोग संपला.