कृष्णपक्षांतल्या चतुर्दशीला जन्म झाला असल्यास त्याचें सहा प्रकारचें जें फळ आहे तें असें:- चतुर्दशीचे सहा भाग करावेत. पहिल्या भागांत जन्म झाला असल्यास शुभ; दुसर्यांत पितृनाश; तिसर्यांत मातृनाश, चौथ्यांत मातुलनाश; पांचव्यांत वंशनाश; आणि सहाव्यांत धनहानि व वंशनाश. या चतुर्दशींच्या दुसर्या, तिसर्या व सहाव्य भागांत जन्म झाल्यास गोमुखप्रसवशान्ति करुन चतुर्दशीशान्ति करावी. इतर भागांतल्या जन्माबद्दल फक्त चतुर्दशीशान्ति करावी. या शान्तीबद्दल,
’अस्य शिशोः कृष्णचतुदर्श्याः अमुकांशजननसूचित सर्वारिष्टनिरासद्वारा श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं’
असा संकल्प करावा. अग्नेयादि चार (कोन) दिशांना चार कुंभांची स्थापना करुन, मध्यें शंभर भोंकाच्या कुंभावर रुद्रदेवतेची प्रतिमा ठेवावी व आवाहन करावें आणि पीठादिकांच्या ठिकाणीं रुद्रदेवतेची प्रतिमा ठेवावी व आवाहन करावें आणि पीठादिकांच्या ठिकाणीं रुद्रदेवतेची पूजा करावी, व त्याच्या पूर्व अगर उत्तर दिशेला शंभर भोंकांचे पांच कलश मांडून पूजा करावी असें मयूखांत म्हटलें आहे. ’ग्रहानष्टाष्टसंख्यसमिदाज्यचरुभिरधिदेवतादीन् एकैकसंख्यसमिच्चर्वाज्याहुतिभिः रुद्रं अश्वत्थप्लक्षपलाशखदिरसमिद्भिश्चर्वाहुतिभिराज्याहुतिभिर्माषैस्तिलैः सर्षषैश्च प्रतिद्रव्यमष्टोत्तरशताष्टाविंशत्यन्यतरसंख्यया त्र्यम्बकमिति मंत्रेण अग्निं वायुं सूर्यं प्रजाप्रतिं च तिलाहुतिभिरमुकसंख्याभिः सकृद्वाव्यस्तसमस्तव्याहृतिभिः यद्वा प्रजाप्रतिमेव समस्तव्याहृतिभिस्तिलैः शेषेण स्विष्टकृतम्’ वगैरे अन्वाधान करावें.