मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता| श्लोक १ ला मध्वमुनीश्वरांची कविता गणपतीचीं पदें पद १ ते १० पद ११ ते २० पद २१ ते ३० पद ३१ ते ४० पद ४१ ते ५० पद ५१ ते ६० पद ६१ ते ७० पद ७१ ते ८० पद ८१ ते ९० पद ९१ ते १०० पद १०१ ते ११० पद १११ ते १२४ १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३२ पदे १ ते १० पदे ११ ते १९ पदे १ ते ५ पदे १ ते २ परशुरामाचे पद पदे १ ते ५ पदे १ ते ६ पदे १ ते ७ पदे १ ते ११ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४६ पदे १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३० पदे १३१ ते १४० पदे १४१ ते १५० पदे १५१ ते १६० पदे १६१ ते १७० पदे १७१ ते १८० पदे १८१ ते १८८ पदे १ ते १० पदे ११ ते १७ श्लोक १ ला अभंग २ रा अभंग ३ रा अभंग ४ था अभंग ५ वा आरती गणपतीची आरती विठ्ठलाची आरती पांडुरंगाची आरती रामाची आरती मारुतीची आरती कृष्णाची आरती खंडेरायाची आरती नरहरीची आरती नृसिंहाची आरती मोहनीराची आरती मोहनीराजाची आरती देवीची आरती जगदंबेची आरती ललितादेवीची आरती भागीरथीची आरती गुरूची पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते २८ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पद ३१ वें पत्रिका भागीरथी ३२ वीं पदे ३३ ते ३८ स्फुट प्रकरणें - श्लोक १ ला मध्वमुनीश्वरांची कविता Tags : kavitamadhvamunipoemकविताकाव्यमध्वमुनी प्रल्हादचरित्र Translation - भाषांतर जनस्थानीं नांदे द्विजवर सदा त्रिंबक कवी । तयानें हे केली सरस कविता पद्धत नवी ॥ कथेला ज्या येती द्विजवरद मूर्ती मुखरणी । तयाला वाढावी अभिनव रसाची सिखरणी ॥१॥जगीं दैत्येंद्रानें तप करुनि देवांसि सळिलें । प्रतापें मृत्यूचें परम गति सामर्थ्य खिळिलें ॥ नृसिंहाच्या रूपें कनककशपूलागिं गिळिलें ॥ तया प्रल्हादाचें त्रिभुवनीं पहा भाग्य फळलें ॥२॥कयाधूचें पोटीं सुत सुमति जाला गुणनिधी । तयाला देखोनी जनक सुख मानी निरवधी ॥ म्हणे याचीं चिन्हें सकल दिसतीं सुंदर बरीं । असो हा दीर्घायु असुरकुळिंचा दीपक घरीं ॥३॥प्रकर्षें आल्हादें रमविल तुम्हांला निशिदिनीं । म्हणोनी पाचारा गुरु म्हणति प्रल्हाद वदनीं ॥ द्विजा द्या गोदानें गज तुरग यानें रथ धनें । अनंता वाद्यांचे गजर गुण गाती त्रिभुवनें ॥४॥घरामध्यें रांगे मधुरवचनें बोलत असे । मुलांमध्यें खेळे अनुभवरसें डोलत असे ॥ भुकेल्या मागेना अशन जननीला निजमुखें । निवाला साधूचें वच परिसोनी निजसुखें ॥५॥कुमाराचे केले उपनयनसंस्कार बरवे । जगीं शुक्राचार्या गुरुपरिस दैत्यांत मिरवे ॥ जिवीं प्रल्हादाचे नरहरिविना अन्य न सुचे । मुखीं गोविंदाचें स्मरण हरिचें कीर्तन रुचे ॥६॥पित्यानें घोकाया गुरुसदनिं धाडूनि वहिलें । गुरूनें ॐ नामा लिहुन दिधला त्यास पहिलें ॥ गुरूला प्रल्हादें नमन विधिसंयुक्त विहिलें । स्वसंतोषें जेंएण निगमतरुचें बीज लिहिलें ॥७॥नमः सिद्धा बुद्धा परमगुरुवृद्धांसि करितो । प्रसादें मी त्यांचे हृदयिं अनिरुद्धास धरितों ॥ असो त्यांचे पायीं अचल मति माझी अतुळसी । त्रिकाळीं गोपाळा नमुनि बहु वाहीन तुळसी ॥८॥दया गोपाळा मजवरि दया पूर्ण करणें । अनाथाला येथें भवपुरिं वाहातांचि धरणें ॥ किती या संसारीं उपजुनि पुनर्जन्म मरणें । नको आतां ऐसें विषमविषयामाजि रमणें ॥९॥दयाळा गोविंदा कमळनयना कंजवदना । कधीं येसी कान्हा कलुषशमना कंसदमना ॥ दयादृष्टी पाहे बहुत शिणलों शेषशयना । सख्या यावें न्यावें त्वरित मज वैकुंठभुवना ॥१०॥गुरू बोले याचें चरित असुरां घातक असे । असें या संसारीं त्रिभुवनिं दुजें लेंकरु नसे ॥ दटाऊनी सांगे वदनिं न म्हणावें नरहरी अशा छंदें वेड्या करतिल तुला ताडन घरीं ॥११॥गुरूच्या वाक्याला परिसुनि पुढें आपण वदे । म्हणे या मूर्खाची रघुपति मला संगत न दे ॥ कुळीं ज्याचें नाहीं स्मरण हरिचें कीर्तन सदा । तयाला कल्पान्तीं विमळ न मिळे मंगळ कदा ॥१२॥घरा आला रागेंकरुनि अपमानूनि गुरुला । मनामध्यें चिंती सुमन सुफला कल्पतरुला ॥ पित्यानें त्या बाळा कवळूनि निजांकीं बसविलें । म्हणे बा प्रल्हादा तुज बहुत कोणें रुसविलें ॥१३॥म्हणे शुक्राचार्या मज बहुत हा दापित असे । तयाचे ते दोघे कुमर दिसती केवळ धसे ॥ अशांच्याही बोधा बधतिल जगीं वोंगळ पिसे । गुरू ज्याचा ऐसा स्वहित आंधळ्यालागि न दिसे ॥१४॥अनंता श्रीकांता हृदयिं भगवंता न भजती । वृथा चिंता कांताकुचकलश चिंतूनी निजती ॥ गुणातीता सीतापतिचरणपद्मीं न रमती । असे हे त्यागावे गुरुतर दुरात्मे खरमती ॥१५॥म्हणे बा प्रल्हादा हृदयिं भजसी श्रीहरिपदा । नव्हे हे मर्याद आसुरकुळिंची निर्मळ कदा ॥ मुकुंदा गोविंदा वदनिं वदसी नामचि सदा । तुझ्या जिव्हाछेदा करिन बहुधा वीन अपदा ॥१६॥पित्याची प्रल्हादें वचनरचना ऐकुनि बरी । म्हणे या दैत्याला हृदयिं न रुचे कां नरहरी ॥ त्रिदोषाच्या छंदें ज्वरित भलतैसे बडबडी । तसें याला जालें म्हणौनि सदनीं हा चरफडी ॥१७॥अहा रे दैत्येंद्रा स्वहित समजेनास अधरा । वृथा केली कष्टी जननि परि येऊनि उदरा ॥ तुला नाहीं लज्जा विषयरस प्यालासि मदिरा । किती बोधूं मूर्खा श्रुतिवचनभावार्थबधिरा ॥१८॥शरीराची आशा धरुनि फिरसी तूं दशदिशा । असारीं संसारीं विसरुनि कसा त्या जगदिशा ॥ अविद्येच्या योगें मन विषयरानांत फिरवीं अहा रे दैत्येंद्रा पळभरि न विश्रांति बरवी ॥१९॥करा श्रीरंगाचें भजन तुम्हि सांडूनि कपटा । असंगाच्या शस्त्रें करुनि रिपुचें मूळ निवटा ॥ वृथा लोकांमध्यें भ्रमण करितां येइल उणें । कसें दारोदारीं मन फिरवितें ओंगळ सुनें ॥२०॥भजावें श्रीकृष्णा उपजुनि तुम्हीं दानवकुळीं । त्यजावी हे तृष्णा विषयदमोहासि समुळीं ॥ सुता प्रल्हादाचें वचन परिसा दिव्य निरुतें । अनायासें जाती सकल तुमचीं दूर दुरितें ॥२१॥अरे माझी कोणी अति सुरस हे युक्ति परिसा । भल्याच्या संसर्गें सकल तुम्हि संदेह निरसा ॥ विरक्तीचें कांहीं जरि घडल शास्त्रश्रवण रे । करावें मुक्तीचें तरि सुलभ पाणिग्रहण रे ॥२२॥विरक्तीं सेवावें श्रवण मननाचें दधि मधू । प्रयागीं सत्क्षेत्रीं चतुर परिणावी नववधू ॥ विवेकें वारावें मधिलचि अविद्यावरण रे । प्रतिष्ठा वोंकारीं प्रगट वधुमुक्ताभरण रे ॥२३॥प्रयागीं सत्क्षेत्रीं मिरवुनि विमानीं वधुवरें । तया दोघामध्यें अमित दिसतें हे सुखवरें ॥ पुढें सौभाग्याच्या अधिक अभिवद्धीस उमजा । कळेना तेव्हां हे शरण गुरुरायास तुम्हि जा ॥२४॥सदा श्रीरामाचें हृदयकमळीं ध्यान धरें । प्रसादें देवाच्या भवजलधिचा बिंदु करणें ॥ द्विजेंद्रीं सेवावें अभिनय जगत्कल्पतरुला । मनोभावें जावें शरण सखया मध्वगुरुला ॥२५॥कुमाराच्या बोलें असुर बहु संतप्त हृदयीं । भडाडे कोधाग्नीकरुनि मग तो तेच समयीं ॥ म्हणे याची कांहीं दिसत विपरीतार्थ करणी । रिपू आला पोटा खपविल कुला गारकमणी ॥२६॥कयाधूसी बोले सुत खपवि देऊनि जहरा । बलावा गारोडी भुजग डसवा येकलहरा ॥ कुजंत्रीं जळावा प्रबळ अनलीं हा अवचिता । कुळीं माझ्या जाला बहुत करितो हे अनुचिता ॥२७॥कुठाराचा दांडा अति सरळ हा नंदन म्हणा । पुढें माझ्या छेदा करिल सकळा चंदनवना ॥ उसाच्याही पोटीं जसिं निजपती हीन कणसें । तसें वंशामध्यें सुत उपजती पातकवशें ॥२८॥अरे याचे बांधा भुज सुदृढशेंकरुनिया । समुद्रीं सेंदावा चपल करिं सेंडी धरुनियां ॥ निराळीं लोटावा अचल शिखराग्रावरुनिया । मला वाटे ऐसा कुमति सुत जावा मरुनिया ॥२९॥वराहाच्या रूपें रणिं निवटिला उग्र चुलता । तयाला हा ध्यातो म्हणुनि गज लावूनी उलथा । अरे याचें कोणी शिरकमळ छेदा कचकचा । असें बोले तेव्हां सदय जन थुंके पचपचा ॥३०॥यया प्रल्हादाला बहुत सळिले सेवक जनीं । समाधी मोठा हृदयिं सुखदुःखास न मनी । जयाचा कैवारी असुरगजवैरी नरहरी । तयाला संसारीं कवण रिपु मारी निजकरीं ॥३१॥न जाळी त्या अग्नी जलधि सहसा तो न बुडवी । पडेना शैलाग्रावरुनि गज पायें न तुडवी ॥ तुटेना शस्त्रास्त्रीं भुजगविष त्यालागिं न चढे । विषाचा तो प्याला जिरवुनि सुखामाजि पहुडे ॥३२॥घरां आले रायाजवळीं कथिलें सेवकजनीं । तया प्रल्हादाचे सकळ करिती कौतुक मनीं । बलीयेसी याचे हृदयिं वसते जीवनकळा । मिळाला विष्णूला वधिल तुमच्या दानवकुळा ॥३३॥म्हणे बा प्रल्हादा प्रगट तरि दावी तव हरी । असे कोणे ठाईं वद मजपुढें तूं लवकरी ॥ न ये कां रे येथें लपत फिरतो कां गिरिवरी । बलावी युद्धाला प्रबळ तरि वैरी क्षणभरी ॥३४॥म्हणे माझा स्वामी तव हृदयपद्मांत वसतो । अनंत ब्रह्मांडें रचुनि तृणकाष्ठांत दिसतो ॥ असें बोले तेव्हां कनककशपु त्रासुनि वदे । सभास्तंभीं कां रे त्वरित मजला दर्शन न दे ॥३५॥पित्याच्या त्या बोलास्तवचि मग पुत्रें विनविलें । तया श्रीरंगाचें त्वरित हृदयीं ध्यान धरिलें ॥ वराहाच्या रूपें धरणि धरिली त्या निजमुखीं । सभास्तंभीं द्यावें त्वरित रिपुला दर्शन सुखीं ॥३६॥स्वपुत्राच्या बोलावरुनि मग हांसे खदखदां । सभेच्या त्या स्तंभावरि सबळ हाणी असि तदा ॥ तये काळीं देवें त्यजुनि सहसा दूरि आळसा । सभास्तंभीं जाला प्रगट करि ब्रह्मांडवळसा ॥३७॥सभास्तंभीं जाला ध्वनि अवचिता तो कडकडा । अनंत ब्रह्मांडें खचति समयीं ते गडगडा ॥ नृसिंहाच्या नेत्रीं निघति बहु ज्वाळा भडभडा । पळाले दैत्यांचे अधिप निजपायीं झडझडा ॥३८॥नृसिंहाच्या तेजें गगनिं रविचंद्राग्नि जळती । सडा नक्षत्रांचा धरणिधर वाराह पळती ॥ प्रतापें दिक्पालासहित अमरां धाक सुटला । भुकेला कल्पातीं प्रळयसमयीं रुद्र खबळला ॥३९॥नृसिंहानें जानूवरि असुर धाऊनि धरिला । नखाग्रानें त्याचें उदर उर संपूर्ण चिरिला ॥ सभाद्वारीं संध्यासमयिं रिपुचा गर्व हरिला । स्वभक्ताच्या रागें मग नरडिचा घोट भरिला ॥४०॥तयाच्या त्या दाढा घनसर मुखामाजि विकटा । नखश्रेणी वज्रापरिस कठिणा फार तिखटा ॥ मुखीं नेत्रीं ज्वाळा निघति जळती तैं दशदिशा । नृसिंहाच्या दीर्घा पिवळट खटा पिंगट मिशा ॥४१॥चतुर्बाहू पीतांबर विलसतो हा कटितटीं । मुखीं जिव्हा लोळे रुधिररस चाटी सरकटी ॥ करी अट्टाहासा असुर गजकुंभस्थळ चिरी । म्हणा रे तो आतां अभयवरदाता नरहरी ॥४२॥तयेवेळीं देवाजवळिं मग कोणी परि न ये । लपाले ते ब्रह्मादिक करिति धांवा जयजयें ॥ रमेनें प्रल्हादासहित चरणांभोज नमिले । म्हणे लक्ष्मीकांता त्रिभुवनपते विघ्न शमलें ॥४३॥नृसिंहाच्या माथां सुर वरुषती दिव्य सुमनें । दुरूनियां भूमीवरि करिति साष्टांगनमनें ॥ अनंता वाद्यांचे गजर उठती घोष बरवे । सभास्थानीं सिंहासनिं कमलजाकांत मिरवे ॥४४॥रमा ज्याचे अंकीं अचल विलसे विश्वजननी । सुखी ज्यानें केले मुनिजन पदांभोजभजनीं ॥ शिरीं ज्याच्या शोभे मुकुट फणि छत्राकृति दिसे । जयासाठीं झाले हरिहर विरंच्यादिक पिसे ॥४५॥म्हणे बा प्रल्हादा तुज बहुत बाळास सळिलें । तुझ्या रागें त्याला सुमति क्षणमात्रांत गिळिलें ॥ सुखी राहे आतां भजन करि माझें अनुदिनीं । तुझ्या भाग्याचा तो शुभ उदय झाला त्रिभुवनीं ॥४६॥दयाळा म्यां तूझा अमल मनिं धांवा विनविला । धणी त्रैलोक्याचा अभयवरदानीं सिणविला ॥ तया प्रल्हादानें हृदयकमळीं देव नमिला । म्हणे स्वामी स्थापी चरणकमळी मध्वमुनिला ॥४७॥ N/A References : N/A Last Updated : May 28, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP