मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता| पद ३१ ते ४० मध्वमुनीश्वरांची कविता गणपतीचीं पदें पद १ ते १० पद ११ ते २० पद २१ ते ३० पद ३१ ते ४० पद ४१ ते ५० पद ५१ ते ६० पद ६१ ते ७० पद ७१ ते ८० पद ८१ ते ९० पद ९१ ते १०० पद १०१ ते ११० पद १११ ते १२४ १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३२ पदे १ ते १० पदे ११ ते १९ पदे १ ते ५ पदे १ ते २ परशुरामाचे पद पदे १ ते ५ पदे १ ते ६ पदे १ ते ७ पदे १ ते ११ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४६ पदे १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३० पदे १३१ ते १४० पदे १४१ ते १५० पदे १५१ ते १६० पदे १६१ ते १७० पदे १७१ ते १८० पदे १८१ ते १८८ पदे १ ते १० पदे ११ ते १७ श्लोक १ ला अभंग २ रा अभंग ३ रा अभंग ४ था अभंग ५ वा आरती गणपतीची आरती विठ्ठलाची आरती पांडुरंगाची आरती रामाची आरती मारुतीची आरती कृष्णाची आरती खंडेरायाची आरती नरहरीची आरती नृसिंहाची आरती मोहनीराची आरती मोहनीराजाची आरती देवीची आरती जगदंबेची आरती ललितादेवीची आरती भागीरथीची आरती गुरूची पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते २८ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पद ३१ वें पत्रिका भागीरथी ३२ वीं पदे ३३ ते ३८ श्रीरामाचीं पदें - पद ३१ ते ४० भारत इतिहास - संशोधक - मंडळ - पुरस्कृत - ग्रंथ - माला Tags : kavitamadhvamunipoemकविताकाव्यमध्वमुनी पद ३१ ते ४० Translation - भाषांतर ३१ पददशरथ वदतो रघुवीरा । मानसपंजरींच्या कीरा । सांडुनि शरयूच्या तीरा । नेसुनि जाउं नको चीरा ॥१॥कैकयी पापिण नष्टगिरा तिजवरि लोटुनि घालि चिरा । बांधिन सोनेरी चिरा । त्यावरि झळक जडित हिरा ॥२॥सेउनी तूप अपूप । जिंती राजे अमूप । अयोध्येचा तूं भूप । रामा राहें स्वस्वरूप ॥३॥तुझिया वियोगें जाण । जाइल माझा प्राण । मध्वनाथा तुझी आण । वाहुनी करितो निर्वाण ॥४॥पद ३२ वें पतिव्रता म्हणवी तेचि सीते वो ॥ घराबाहेरि घालिता पाय भीते वो ॥१॥न करी पतीचा मनोभंग वो ॥ गुण तुझे सहज अंतरंगे वो ॥२॥करी सासुसासर्याची नित्य सेवा वो ॥ पूजी संतामहंता भूमिदेवां वो ॥३॥कैकयीचें बरवें जालें राज्य वो ॥ सेविल शर्करा घालुनि पायस साज्य वो ॥४॥आम्ही जातों सानुज वनवासा वो ॥ सांभाळीं तूं आपुल्या दासीदासां वो ॥५॥पाइं रुपती कंटक क्लेशी होसी वो ॥ तुझ्यासंगें संकटें कोण सोसी वो ॥६॥घरीं राहतां पावसी सर्व सौख्यें वो ॥ माझा अभिप्राय हाचि मुख्य वो ॥७॥रक्षी कौसल्येसी लावुनि पंचप्राणा वो ॥ मध्वनाथाची घालितो तुज आण वो ॥८॥पद ३४ वें राम वदे वो जानकी । न करीं आपुलें जान की ॥ आशय माझा जाण कीं । तुजहूनी मी सुजाण कीं ॥१॥कौसल्येस मान कीं । शैल्यजेसमान कीं ॥ दिधलें म्यां उपमान कीं । न करी तूं अपमान कीं ॥२॥कैकयी जीवनासी वो । जानकीजीवनासी वो ॥ धाडी आजि वनासी वो । राजीवनयनासि वो ॥३॥कनखर खडे रुपती वो । पाईं कंटक रुपती वो ॥ न मिळे पलंग सुपती वो । तेव्हां स्मरसी पसुपति वो ॥४॥पक्षी भात भात वो । हरि नामें बोभातवो ॥ होतांचि प्रभात वो । मानसीं दूधभात वो ॥५॥न मिळे घारी पुरी वो । शाक तेही पुरी वो ॥ न बुडे भवनदीपुरीं वो । सेवी अयोध्यापुरी वो ॥६॥राहूं नको तूं उपासी । सेवी गुळ वरी तुपासी ॥ गुंतुं नको तूं पाशीं । जीव माझा तूंपासी ॥७॥ऐकुनि नमकें चमकें वो । पूजी पार्थिव चिमकें वो ॥ मध्वमुनीचीं यमकें वो । गाता मग तो यम केंवो ॥८॥पद ३५ वें विनवी जानकी देवा श्रीरामचंद्रा जी । येतें मी समागमें आनंदसांद्रा जी ॥ तुमच्या वियोगें नये मजलागीं निद्रा जी । भरताच्या हातीं घाला ते राजमुद्रा जी ॥१॥भविष्य बोलोनि गेला तो वाल्मीकी जी । श्रीराम ठेउनी गेला घरीं जानकी जी ॥ हें नाहीं ऐकियलें प्रमाण कीं जी । विचारुनि या गा रामायण आणखी जी ॥२॥माहेरीं आला होता तो एक जोसी कीम, सांगुन्नी गेला बहू तूं भाग्याची होसी कीं ॥ भर्तारासंगें ककंहीं वनवास सोसी कीं । अंतीं करिसी राज्य त्रिभुवना पोसी कीं ॥३॥हे सत्य वाणी त्याची घडोनि यावी जी । संगें सर्वज्ञा प्राणवल्लभा न्यावी जी ॥ ओटी पसरितें येवढी आज्ञा द्यावा जी । श्रीमध्वनाथचरणसेवेसी लावी जी ॥४॥पद ३६ वें जाऊं नको रामा टाकुनी आम्हां वाटुनि वैभवधामा ॥ध्रु०॥देवा तुझा अगाध महिमा नकळे आगमनिगमा ॥ नाम स्मरतां दाविसी उगमा भक्ति तुझी ते सुगमा ॥१॥रमा ज्याची म्हणवी रामा मुनिजनहृदयारामा ॥ सांभाळूनी दक्षिणवामा शिक्षा लावी अधमा ॥२॥वामभागीं घेउनी भामा सुवर्णचंपक दामा ॥ सिंहासनीं तूं बैस उद्यामा लेउनि तगटी जामा ॥३॥कैकयी पापीण मेघश्यामा न वदे ईसी सामा ॥ यातनेचा मेळउनि सामा छेदिन ईच्या चामा ॥४॥दशरथ भुलला कामिनीकामा सानुज भरत रिकामा ॥ दुष्ट युधाजित खडतर नामा मारीन त्याचा मामा ॥५॥लक्ष्मण वदतो सांडुनि ग्रामा करितां हे संग्रामा ॥ मध्वनाथा विजयी होउनी वाजवितों मी डमामा ॥६॥पद ३७ वें माते आतां प्रणाम करितों तुझिया चरणांसी । आम्हां आशीर्वाद देनें तीजणांसी ॥१॥कैकयीवरदानें बद्ध झाला दशरथ । मुक्त होइल येथील राज्य करितां भरत ॥२॥सूर्यवंशेहें राजे त्यांची सत्यप्रतिज्ञा । विपरित करितां नरका जावें विदित सर्वज्ञा ॥३॥राम म्हणे वो कैकयीनें केली पूर्ण कृपा । दंडकारण्यासी जातों संमत हेंचि नृपा ॥४॥कंदेंमुळें फळें सेवुनी राहीन एकांतीं । संतसंगें अंतरंगे पावन विश्रांती ॥५॥सुवेळेसी स्वार जालों जाउनी त्या प्रांतीं । अहंकार मर्दुनी आणिन बरवी निजशांती ॥६॥क्षणामध्यें चवदा वर्षें जातील निघोनी । पुनरपि तुजला भेटेन सत्वर भद्रीं रिघोनी ॥७॥देवें समाधान केलें आपुल्या जननीचें । मध्वनाथें रहस्य कथिलें श्रवणमननींचें ॥८॥पद ३८ वें तुजविण रामारे मी परदेशी आज ॥ध्रु०॥गुणमयी कैकयी झगडत मजसी । बांधुनी आपुल्या माज ॥१॥सवत अविद्या छळित जीवातें । आणियलें बहु वाज ॥२॥घेउनी दशरथा सानुज भरता । ते करूं येथील राज ॥३॥जाउं नको मज ताकुनी कोठें । नाहीं वनांतरीं काज ॥४॥वत्साविरहित तळमळां धेनु । सीत जळ तीस पाज ॥५॥शरयूतटिं मठ बांधुनि राहूं । काय जनाची लाज ॥६॥सनकादिक मुनि पूजिन सुमनीं । पाहीन दिव्य समाज ॥७॥त्रिभुवनविजयी तूं होशिल रामा । करिशील ते साम्राज्य ॥८॥मध्वमुनीश्वरस्वामी दयाळा । म्हणविसी गरीब नवाज ॥९॥पद ३९ वें हातीं धरुनी पुत्रा निरवी सुमित्रा ॥ निंदी कळसूत्रा कैकयीच्या ॥१॥रामा तुझा भाऊ रागीत हा बौ । नको याचे पाहूं गुणदोष ॥२॥चालतां अधम मुखीं वमी तम । यासि सर्वोत्तम देव राखो ॥३॥मारीं कैचें सूख पदोपदीं दुःख । भुकेल्या श्रीमुख कोमाइल ॥४॥तूं याचें जीवन कठीण तें वन । कंठील यौवन ब्रह्मचर्य ॥५॥सकावार सीते चालसील कसी । कैकयी ते कसी चांडाळीण ॥६॥विळें डोळे मोडी राया लावी गोडी । केली ताडातोडी गाईवत्सा ॥७॥परिस वो साजणी आम्ही दोघीजणी । पडलों विजणीं पतिसहित ॥८॥रामा तुजविण बहु वाते शीण । जाली हीनदीन अयोध्या ते ॥९॥आहा जगदिशा वोस दाही दिशा । आतां कोण्या देशामध्यें जावें ॥१०॥तेणें अवसरें रडती दीर्घस्वरें । मध्वमुनीश्वरें सांभाळिलें ॥११॥पद ४० वें रामा जायरे वनवासा । समजुनी आशय माझा ॥१॥दशरथरायाची प्रतिज्ञा । सत्य करी सर्वज्ञा ॥२॥संगें घेउनी लक्ष्मणा । सीता सुलक्षणा ॥३॥जावें त्रिवर्गीं निजहर्षें । चतुर्दश वर्षें ॥४॥तेथील आनकुळ पाहाणें । येणें अथवा राहणें ॥५॥भरत राज्य करूं हें विहीत । शत्रुघ्नासहित ॥६॥हें मज संमत रघुराया । सीतळ होईल काया ॥७॥रघुपति चित्ताचा वदान्य । आज्ञा होईल मान्य ॥८॥वंदुनि कैकयीच्या चरणा । वांटी वस्त्राभरणा ॥९॥कैकयी गौरवीते रघुवीरा । देउनि बल्कल चीरा ॥१०॥सीता घेउनी हस्तकीं । वंदी निजमस्तकीं ॥११॥आली दशरथाजवळी । भूपति घाली कवळी ॥१२॥सांगे सुमंता दशरथ । आणविला निजरथ ॥१३॥रथीं बैसउनी रघुवीरा । नेले तमसातीरा ॥१४॥श्रीरघुनाथाच्या वियोगें । दुःखित जालीं दोघें ॥१५॥करिती सकळिक ते शोक । अयोध्येचे लोक ॥१६॥शोकें व्याकुळ दिनरजनी । लक्ष्मणाची जननी ॥१७॥मध्वनाथासी तो चिंती । भूपति चिंती अंतीं ॥१८॥ N/A References : N/A Last Updated : May 21, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP