मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|
आरती भागीरथीची

आरती भागीरथीची

मध्वमुनीश्वरांची कविता


गंगे जान्हवी माये दाखवी तव पय । संसारार्णविं बुडतों चुकवी अपाय । अपार तुझा महिमा वर्णूं मी काय । तीर्थप्राशन करितां मन माझें धाय ॥१॥
जय देवी जय देवी जय भागीरथी । गणपती सन्निध्त उज करितों आरती ॥ध्रु०॥
तीर्थामध्यें अवचित बाळक बुडालें । देखुनि मुनिचें तेव्हां भानचि उडालें । तळासि गेलें मग ते वरती धाडिलें न कळे लाघव कैसें सजीव काढीलें ॥२॥
सिंदुरासुर सिंदुरवाडा मारिला । गणेशगीता बोधुनि संशय वारिला । अभिनव प्रताप ऐसा जगासि दाविला । विश्वरूप दाउनि वरेण्य तारीला ॥३॥
ब्रह्मा दिव्य कमंडळू घेउनिया आला । भावें मंगलमूर्ती पूजीता झाला । प्रवाह तुझा तेथुनि कलियुगीं आला । मध्वमुनीश्वर तीर्थामध्यें तो न्हाला ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP