मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता| पद २१ ते ३० मध्वमुनीश्वरांची कविता गणपतीचीं पदें पद १ ते १० पद ११ ते २० पद २१ ते ३० पद ३१ ते ४० पद ४१ ते ५० पद ५१ ते ६० पद ६१ ते ७० पद ७१ ते ८० पद ८१ ते ९० पद ९१ ते १०० पद १०१ ते ११० पद १११ ते १२४ १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३२ पदे १ ते १० पदे ११ ते १९ पदे १ ते ५ पदे १ ते २ परशुरामाचे पद पदे १ ते ५ पदे १ ते ६ पदे १ ते ७ पदे १ ते ११ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४६ पदे १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३० पदे १३१ ते १४० पदे १४१ ते १५० पदे १५१ ते १६० पदे १६१ ते १७० पदे १७१ ते १८० पदे १८१ ते १८८ पदे १ ते १० पदे ११ ते १७ श्लोक १ ला अभंग २ रा अभंग ३ रा अभंग ४ था अभंग ५ वा आरती गणपतीची आरती विठ्ठलाची आरती पांडुरंगाची आरती रामाची आरती मारुतीची आरती कृष्णाची आरती खंडेरायाची आरती नरहरीची आरती नृसिंहाची आरती मोहनीराची आरती मोहनीराजाची आरती देवीची आरती जगदंबेची आरती ललितादेवीची आरती भागीरथीची आरती गुरूची पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते २८ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पद ३१ वें पत्रिका भागीरथी ३२ वीं पदे ३३ ते ३८ श्रीरामाचीं पदें - पद २१ ते ३० भारत इतिहास - संशोधक - मंडळ - पुरस्कृत - ग्रंथ - माला Tags : kavitamadhvamunipoemकविताकाव्यमध्वमुनी पद २१ ते ३० Translation - भाषांतर २१ पदराजस दशरथबाळ । सीते याला घाली माळ ॥ध्रु०॥कमळदलांपरि नयन विशाळ । मृगमदचर्चित भाळ ॥१॥मदनमनोहर रूप जयाचें । म्हणवी परम दयाळ ॥२॥कनकधनुर्धर कनकधनुर्धर दीनजनोद्धर । दानवकुळीचा काळ ॥३॥काळा डोंगर अंतरीं वोंगळ । रावण तो फटकाळ ॥४॥देखुनी तुझें रूप वेडावले भूप । अंतरीं घोटिती लाळ ॥५॥येवढें त्रिंबकधनु कैसा उचलील नेणु । वेडा जनक नृपाळ ॥६॥मध्वमुनीश्वर सगुण दयानिधि । करील तुझा प्रतिपाळ ॥७॥२२ पद तो मज आवडतो रघुराणा । नवरा राजसवाणा ॥ध्रु०॥दशरथ राजाचा कुमार । सावळा सकुमार ॥१॥मोर्छल वारितो लक्ष्मण । बंधु सुलक्षण ॥२॥कटींतटीं चांगला नेसला । पिवळा सोनसळा ॥३॥कैसा बांधिला उदार । चिरा खिडकीदार ॥४॥प्रसन्नवदन पूर्णेंदु । हृदयें करुणासिंधु ॥५॥भाळीं रेखिला आळवट । कस्तुरी मळवट ॥६॥कर्णीं कांचन कुंडलें । कोदंड दंडलें ॥७॥पाळी येकला त्रिजगा । अंगीं पिवळा झगा ॥८॥त्यावरी बांधिला नेटका । चिकंदोजी पटका ॥९॥माजी खोविली कटार । चिमणी तरवार ॥१०॥पाठीसी बांधला तर्कश । दिसतो रणकर्कश ॥११॥कंठीं शोभते घननीळा । वैजयंती माळा ॥१२॥पायीं नेपुरें वाजती । बिरुदें विराजती ॥१३॥चरणपंकजीं मधुकर गाती । मधुरस्वर ॥१४॥मध्वनाथाचा कैवारी अखिल विघ्नें निवारीं ॥१५॥२३ पद चिमणासा श्रीराम त्याचें चिमणेसें स्वरूप । चिमणें सगुण ब्रह्म चिमणें लावण्य अमूप ॥ध्रु०॥चिमणा स्नान संध्या करुनी शोभे पीतांबर । चिमणा नित्यतृप्त म्हणवी राजा विश्वंभर ॥१॥चिमण्या हातें करुनी बांधी चिरा खिदकीदार । चिमणा गोशपेच त्यावरी कलगी झळके फार ॥२॥चिमणी अंगी ल्याला त्यावरी चिमणी कुडती साजे । चिमणा कमरबंद देखुनी पायां पडती राजे ॥३॥चिमणी माजीं कटार बांधी चिमणीसी तरवार । चिमणी पाठीसी ढाल थाटी चिमणासा दरबार ॥४॥चिमणा तर्कश बां धरी हातीं चिमणी कमान । चिमणें सिंहासन त्यावरि चिमणा भाग्यवान ॥५॥चिमणें केशर मळवट भाळीं रंगीत अक्षता । चिमणा प्रसन्नवदन निजभक्तां संरक्षिता ॥६॥चिमणीसीं झुलपें मोगरेलें विलसती चिमणे गाल । चिमण्या मुक्ताफळकुडक्यांमध्यें झळकती लाल ॥७॥चिमणी तुळसीमाळ कंठीं नवरत्नांचा हार । चिमणी सीता वामभाईं सौंदर्याचें सार ॥८॥चिमणा बंधु लक्ष्मण वारी मोरछला । चिमणे भरतशत्रुघ्नादिक सेवक जवळ ॥९॥चिमणा मध्वनात त्याचा चिमणासा दिवाण । चिमणा विजये होईल करवील लंकेचे निर्वाण ॥१०॥२४ पदधन्य पिता दशरथ । ज्याचे उदरीं रघुनाथ । जन्मला ॥१॥धन्य धन्य कौसल्या । किती पुण्यराशी केल्या । कोण जाणे ॥२॥धन्य धन्य नगर । अयोध्या मनोहर । पुण्यभूमि ॥३॥धन्य धन्य शरयूतीर । जेथें खेळे रघुवीर । स्वामी माझा ॥४॥विश्वामित्रें रायाप्रति । मागितला रघुपति । लक्ष्मणेंसी ॥५॥ताटिका विंधोनि बाणें । हरिले सुबाहूचे प्राण । राघवानें ॥६॥रामें आणि लक्ष्मणें । केलें यज्ञसंरक्षण । कौशिकाचें ॥७॥जानकीच्या स्वयंवरा । मूळ आलें मुनीश्वरा । मैथुळीचें ॥८॥मार्गीं अभिनव केली लीला । उद्धरिली जड शीला । गौतमाची ॥९॥रायें केला सन्मान । जानकीच्या संभ्रमानें । राघवाचा ॥१०॥जनकें केली प्रतिज्ञा । जाणविली सर्वज्ञा । कौशिकानें ॥११॥शाहणव कुळींए राजे । आले भूमंडळीचे । थोर थोर ॥१२॥सभेमध्यें साभिमानें । भांभडभूत दशानन । बैसलाहे ॥१३॥कोटि जेठी लागले । उचलिता भागले । त्रिंबकासी ॥१४॥जशानन उठला । धाकें ऊर फूटला । रावणाचा ॥१५॥धनुष्या घालितां कव । झोक गेला आली तव । रावणासी ॥१६॥उरावरी आदललें । तेव्हां धैर्य गळालें । रावणाचें ॥१७॥मेरूचा तो खचला कडा । किंवा कैलासीचा हुडा । कोसळला ॥१८॥सभेमध्यें हलकल्लोळ । म्हणती लावा हळदबोळ । नोवर्यासी ॥१९॥सहा अवघी घनवटली । रामीं वृत्ति विनटली । जानकीची ॥२०॥सीता नवसी नवसा । राजसदननिवासा । मोरयासी ॥२१॥फाल्गुन वद्य चतुर्थीस । पूजी मंगलमूर्तीस । मोरया रे ॥२२॥त्रिंबक नुचलो रावणा । पर्णॊ मजला राघवराणा । सूर्यवंशी ॥२३॥भोगुर गोवर्धनीं फार । जनस्थानीं बांधीन पार । मोरयासी ॥२४॥मध्वनाथ हे खूण । खणोर काढील वळखोन । कलयुगीं ॥२५॥सफळ झाला नवस । पावला तो गणाधीश । जानकीला ॥२६॥२५ पदसखिबाई साजणी तुम्ही सांगा माझ्या बापा ॥ध्रु०॥चरणीं अहिल्या उद्धरिले वो । परिहरि गौतमशापा ॥१॥रघुपति नवरा म्यां वरिला वो । माझें केलें स्थापा ॥२॥यासि न द्या तरी आपुल्या हातें । मान हे माझी कापा ॥३॥जनक विदेही तूं म्हणवीसी । न सिवसी करुनी पापा ॥४॥मदनमनोहर आवदतो गे । नुचलिता त्रिंबकचापा ॥५॥मध्वमुनीश्वर बहुत गुणाचा । सुंदर सोलीव चापा ॥६॥२६ पदरावण गडबडा लोळे । फिरवी गरगरा डोळे । वोकी रक्ताचे गोळे । तरी स्वगर्वें बोले ॥१॥भत ब्राह्मण बराडी । पंडीत जोसी वर्हाडी । वरकड राजे काबाडी । अवघी दिसते लबाडी ॥२॥गेंठे हो । मुकुट हेटे मेटे हो । उठा महाजन सेटे हो । काय पहातां बेटे हो ॥३॥उचला उचला धनुष्य । देव दानव मनुष्य । माझें पुरलें आयुष्य । न कळे पुढील भविष्य ॥४॥तुमचा उपकारी झालों । झक माराया आलों । नवरी देखुनि नीवालों । स्वयंवरीं निमालों ॥५॥मी तों लंकेचा राजा । आलों बहूतांच्या काजा । ब्रह्मा माझा तो आजा । त्यासी कोण्हीं सांगा जा ॥६॥उदकीं बुडतो पोहणार । आवचट चुकतो लिहिंणार । शाहाणा होतो गंवार । न कळे पुढील होणार ॥७॥याला आलें फेंपरें । ऐसें म्हणती लेंकरें । घासी भूमीस कोपरें । बरवें केलें शंकरें ॥८॥राजद्वारीं नरनारी । हांसती सुकुमारा क्कांरी । रावण देतो वोकारी । जें तें त्याला धिःकारी ॥९॥याचा जाला अपमान । भारें दडपली मान । राम उचलील कमान । पावे राजसन्मान ॥१०॥सीता रामाच्या गळां । घाली कमलाची माळा । मध्वनाथा सोहळा । जाला सर्वां आगळा ॥११॥२७ पद श्रीसद्गुरुनाथा । सांगा विचारा आतां ॥ध्रु०॥शरण आलों हे स्वामी समर्था । उद्धरा दशरथा ॥१॥पायांवरी म्यां ठेविला माथा । पुरवा मनोरथा ॥२॥कलेवराची व्यर्थचि आस्था । माझी वृद्धावस्था ॥३॥मातापिता माझा श्रीराम भ्राता । सद्गतिचा दाता ॥४॥हें राज्य देउनि जानकीकांता । साधीन एकांता ॥५॥श्रृंगारा नगरा शोधुनि पंथा । पाहूनिया ग्रंथा ॥६॥अधिकार देखुनि पढवा वेदांता । शांता आणि दांता ॥७॥श्रीमध्वनाथा त्यजुनी अहंता । पूजीन महंता ॥८॥२८ पद अयोध्याकांडींची विमल वदला वाल्मिकि कथा । शिवें श्रीगौरीला सरस कथिली नाहिं वितथा ॥ तयाचा बांधीतो कविवर महाराष्ट्र उलथा । यमाच्या सैन्याचा पलवित बळें वीर चळथा ॥१॥रायें पाठविला रघूत्तमगृहा श्रीसद्गुरु आपला । जाला जर्जर देह वृद्धपर्णिचा तापत्रयें तापला ॥ श्रीरामा सुमुहूर्त पाहुनि बरें सिंहासनें स्थापणें । वेदांतश्रवणें करून धरणें वैराग्य तें आपणें ॥२॥रघुवीर करी गुरुपूजन तें । शिरिं तीर्थ धरी अवघे जन तें ॥ म्हणवी शिवतत्व निरंजन तें । गुरुभक्तिस लावितसे जन ते ॥३॥गुरु म्हणे परिसे रघुनाथजी । दशरथें कथिली शुभ माते जी ॥ राज्य तूं करि नृपासनिं बैसुनी । सकल इच्छिति लोक मनींहुनी ॥४॥राज्याभिषेक उदईक तुला करावा । त्वां भूमिभार अवघा बरवा हरावा ॥ सीता सत्यांस बहु वांटिल वायणें जी । देतील भूप तुज सर्व उपायानें जी ॥५॥वसिष्ठास रामें नमस्कार केला । गुरू आपल्या आश्रमालागिं गेला ॥ अयोध्येमधें लोक सोत्कंठ सारे । खरी टांकसाळेंत पाडूं ठसारे ॥६॥गुढ्या तोरणें जोड वाजंत्रयांचे । थवे शोहती ठाइं ठाईं स्त्रियांचे ॥ अलंकार लेऊनि दिव्यांबरासी । पहायास आलेति विश्वंहरासी ॥७॥समाचार हा ऐकिला कैकयीनें । पुढें निंद्य आरंभिलें विघ्न तीनें ॥ स्वपुत्रास घे राज्य मागूनि सारें । असें संचरे मंथरेमाजि वारें ॥८॥यावा पंचवटींत गौतमितटीं श्रीराम सीतापती । ऐसें इच्छिति भूमिदेव अवघे दैत्यांस जे कांपती ॥ शेषाचा अवतार लक्षण पहा शिक्षील दुष्टांस तो । धर्म स्थापुनि मध्वनाथ म्हणतो रक्षील शिष्टांस तो ॥९॥२९ श्लोकश्रीगजानना वंदुनी मनीं । पावनी कथा वर्णितो भुनी ॥ व्यास वाल्मिकें गाइली जुनी । मुक्तिदायका गौतमीहुनी ॥१॥मध्वनाथ हे वर्णितो कथा । ते म्हणो नका संतहो वृथा ॥ डोळसें पुढें काढिजे पथा । अंध त्यासवें चालतें तथा ॥२॥माय वागवी लेंकरा जया । कंटकव्यकथा कायसी तया ॥ माझि येउं द्या अंतरीं दया । वंदितों पहा या पदद्वया ॥३॥उद्धरी पदें जो अरण्य कीं । त्या रघूत्तमा मी शरन्य कीं ॥ तेथिची कथा देति पुण्य कीं । ऐकतील ते पापशून्य कें ॥४॥मंथरा वदे कैकयीप्रती । वाटतें तुला वश्य भूपती ॥ त्यासि आवडे रघुनाथ गे । कश्यपा जसा श्रीउपेंद्र गे ॥५॥तो करील हें राज्य सर्व गे । व्यर्थ वाहसी रूपगर्व गे । दासिच्या परी मानिती तुला । राज्य माग तूं आपुल्या मुला ॥६॥मंथरा करी बुद्धिभेद हा । कैकयीमनीं दुःखखेद हा ॥ देव प्रेरिता भारती वदे । वाढला कली दंपतीमधें ॥७॥कैकयी म्हणे युद्धकाळिचें । रीण तें नव्हे आजिकालिंचें ॥ त्या वरद्वया द्या मला नृपा । भामिनीवरी ते करा कृपा ॥८॥काननाप्रती राम पाठवा सूर्यवंशिंचें सत्य आठवा ॥ धर्म तो पुसा त्या बहुश्रुता । राज्य मागतें आपुल्या सुता ॥९॥मंथरा जुडे अंतरीं उडे । ते वदे मुढे टाकि वो चुडे ॥ ऐकुनि कुडें कैकयीपुढें । भूपती रडे मूर्च्छितु पडे ॥१०॥त्या क्षणामधें राम धांवला । देखुनी वदे भूप बावळा ॥ कैकयीस हा डाव फावला । रागह्वा कसा म्यां गवाचला ॥११॥राजयापुढें रामजी वदे । पुत्र तो पित्यासाठिं जीव दे ॥ स्वार होउनी जातसे वना । मी करीन जी तीर्थसेवना ॥१२॥ राज्य येथिचें भाऊ तो करूं । मी जसा तसा तेंहि लेंकरूं ॥ ऐकुनी नृपें कंठ दाटला । अंतरीं बहू खेद वाटला ॥१३॥कैकयीसुता राज्य द्या सुखें । सांगतों तुम्हां आपुल्या मुखें ॥ दीधलें तया म्यांच भातुकें । तो करील जी दिव्य कौतुकें ॥१४॥जानकीसवें पुण्यकाननीं । काळ कंठितों दीनयामिनी ॥ जो शिवा सती सिंहवाहिनी । ते सहाय हो शंभुभामिनी ॥१५॥मध्वनाथ ज्या राहतो मठीं । मी वसेन त्या गौतमीतटीं ॥ सेविली असे जे सदा भटीं । ज्यासि पूजिता मुक्त सेवटीं ॥१६॥३० पदपरिसे राया दशरथा । राज्य द्यावें भरता - । लागिं माझ्या ॥१॥वरदान आठवावें । रामचंद्रा पाठवावें । वनवासा ॥२॥स्मरण तुम्हांलागीं कैचें । पतिव्रता कैकयेचें । युद्धकाळीं ॥३॥बरवें राज्य करीन हर्षें । राम जावो चौदा वर्षें । वनवासा ॥४॥राम जावो वनांतरा । समागमीं मुनीश्वरा । घेउनिया ॥५॥ N/A References : N/A Last Updated : May 21, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP