मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|
आरती गुरूची

आरती गुरूची

मध्वमुनीश्वरांची कविता


तापत्रयें मजला तापविलें भारी । लक्षचौर्‍यांशीच्या शिणलों वेरझारीं । विश्रांतीचा लेश न मिळे संसारीं । विषय सेवूनिया रतलों निःसारीं ॥१॥
जयदेव जयदेव ज्य जय गुरुवर्या । वेगीं भवतम नाशी ज्ञानाच्या सूर्या ॥ध्रु०॥
जडजीवतारक स्वामी तुमचा अवतार । शरण आलों माझा करी अंगिकार ॥ दुस्तर मायानदिच्या उतरी परपार । करुणासिंधू एवढा करी मज उपकार ॥२॥
अपार तुमचे चरणतीर्थाचा महिमा । पांगुळ पर्वत वेंघती मूक वदती निगमा ॥ प्रसाद घेतां मानस येती निजउगमा । मध्वनाथा चारी मुक्ती त्या सुगमा ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP