मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता| पदे ११ ते १७ मध्वमुनीश्वरांची कविता गणपतीचीं पदें पद १ ते १० पद ११ ते २० पद २१ ते ३० पद ३१ ते ४० पद ४१ ते ५० पद ५१ ते ६० पद ६१ ते ७० पद ७१ ते ८० पद ८१ ते ९० पद ९१ ते १०० पद १०१ ते ११० पद १११ ते १२४ १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३२ पदे १ ते १० पदे ११ ते १९ पदे १ ते ५ पदे १ ते २ परशुरामाचे पद पदे १ ते ५ पदे १ ते ६ पदे १ ते ७ पदे १ ते ११ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४६ पदे १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३० पदे १३१ ते १४० पदे १४१ ते १५० पदे १५१ ते १६० पदे १६१ ते १७० पदे १७१ ते १८० पदे १८१ ते १८८ पदे १ ते १० पदे ११ ते १७ श्लोक १ ला अभंग २ रा अभंग ३ रा अभंग ४ था अभंग ५ वा आरती गणपतीची आरती विठ्ठलाची आरती पांडुरंगाची आरती रामाची आरती मारुतीची आरती कृष्णाची आरती खंडेरायाची आरती नरहरीची आरती नृसिंहाची आरती मोहनीराची आरती मोहनीराजाची आरती देवीची आरती जगदंबेची आरती ललितादेवीची आरती भागीरथीची आरती गुरूची पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते २८ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पद ३१ वें पत्रिका भागीरथी ३२ वीं पदे ३३ ते ३८ स्थलवर्णन - पदे ११ ते १७ मध्वमुनीश्वरांची कविता Tags : kavitamadhvamunipoemकविताकाव्यमध्वमुनी स्थलवर्णन - पदे ११ ते १७ Translation - भाषांतर पद ११ वें क्षेत्र धरातळीं पाहातां निर्मळ गोदातीरीं टोकें हो । जेथिल ब्राह्मण धार्मिक पाहातां कळीकाळासारिखे हो ॥ त्याचा हृदयस्फोट होऊनी अंतरीं जळतो शोकें हो । कांहीं न चले या स्थळीं म्हणवुनी फोडुनी घेतो डोकें हो ॥१॥जय जय सांभ सदाशिव शंभो सिद्धेश्वरा स्वामी जी । करुणासागर ऐकुनी तुला शरण आलों आम्ही जी ॥ सकळही सधन सोडुनी केवळ रतलों तूझ्या नामीं जी । मध्वमुनीश्वर म्हणतो ठेवी कैलासाचळधामीं जी ॥२॥विश्वेशाची नगरी म्हणवी राजधानी काशी हो । तेही धांवुन आली माझ्या सिद्धेश्वरापाशीं हो ॥ द्वादश जोतिर्लिंग येथील झालीं क्षेत्रवासी हो । एक प्रदक्षिणा करितां जळती पातकाच्या रासी हो ॥३॥प्रवरासंगमवासी त्याला नलगे प्रयाग रेवा हो । ज्याच्या द्वारीं रिद्धी सिद्धी सदैव करिती सेवा हो ॥ ज्याची योगक्षेमचिंता सिद्धेश्वरा देवा हो । कायगांवीं जन हो भाव रामेश्वरीं ठेवा हो ॥४॥श्लोक १२ वा टोकीचेरेणुका सबळ एकविरा हे । जाणुनि जवळिचे कवि राहे । जोडिली सरस राजस माये । मध्वनाथ भुवनीं न समाये ॥१॥हंस आसनिं बैसुनि शारदा । सामगायन करी विशारदा । जे प्रसन्न मुनिवर्य नारदा । ते भवानि भवसिंधुपारदा ॥२॥जे पुरातन हिमाद्रिबालिका । वैष्नवी दनुजवृंदचालिका । कालिका कुटिललोकजाळिका । संकटीं निजजनाप्रति पालिका ॥३॥चंड मुंड महिषासुर टोकीं । तोडूनि वसविली मग टोकी । अंबिकानगर जो अवलोकी । तो कदापि न बुडे भवशोकीं ॥४॥अंबिका नगर बंदर पाहे । बंदरीं करुनि मंदिर राहे । ज्या स्थळीं त्रिपुरसुंदरी आहे । ते शिवा करिल सर्वहि साह्ये ॥५॥देखिली शशिमुखी नवचंडी । आंगदें विसलती भुजदंडीं । मूर्ति तो अशि नसे नवखंडीं । दर्शनेंकरुनि संकट खंडी ॥६॥जे उमा कमलजा सरस्वती । जीस पूजित असे बृहस्पती । व्यासवाल्मिक कवींद्र सेविती । वाहती तुलसी बेल सेंवती ॥७॥अंबिकानगर उत्तरभागीं । श्रीशिवा प्रगटली मुनिलागी । देवगिरीच समीप राहते । शुद्ध भाविकजनासि बाहते ॥८॥भ्रामरी गिरिसुपश्चिमभागीं । अर्चनीं विमुख तोचि अभागी । दुःस्वरूप अविद्या भवजाया भक्त हो तुम्हि भजा भव जाया ॥९॥क्षेत्र जागृत पुरातन टोकी । सेवि त्यासि यमदूत न टोंकी । विंध्यपर्वतशिरोधिवासिनी । या स्थळीं प्रगटली सुवासिनी ॥१०॥सांडुनी सकळ लौकिकदंभा । लोक हो तुम्ही भजा जगदंबा । दर्शनें सकळ संकट वारी । मध्वनाथ मम दैवत तारी ॥११॥श्लोक १३ वा( पारनेराचें वर्णन ) पाराशराच्या नगरीं राहावें । शिलोदकें निर्मल तें नाहावें ॥ गौरीसुताचे चरणा पाहावें । सिंदूर दूर्वादळ तें वाहावें ॥१॥सिद्धेश्वरा धांवत शीघ्र ये रे । शिलोदकाचें निज तीर्थ दे रे ॥ कडेवरी तूं मजलागिं घे रे । भवांबुधीच्या परपार ने रे ॥२॥विश्वेश्वरा त्र्यंबकराज देवा । श्रीपांडुरंगीं मजलागिं ठेवा ॥ मला घडूं द्या नरसिंहसेवा । मुनीश्वराच्या मनिं हाचि हेवा ॥३॥विज्ञप्ति हे भाकिली मध्वनाथें । केली कृपा त्या मग नागनाथें । प्रसाद देवें दिधला स्वहातें । कसा विसबूं जनहो तयातें ॥४॥धुळीमधें जेवि अनर्घ्य मोतीं । ज्या सांपडे तेचि कृतार्थ होती ॥ अश्वत्थमूळीं बघ मूर्ति होती । ते दाखवीली प्रगटोनि ज्योती ॥५॥हातास आलें धन शांभवांचें । माझें पळालें भय तें भवाचें ॥ स्वरूप ध्यातां हृदयीं भवाचें । झालें अकल्याण मनोभवाचें ॥६॥प्रदोषकाळीं शिव देखिला हो । भाळीं जयाच्या शशि रेखिला हो ॥ साफल्यतेचा दिप देखिला हो । प्रसाद त्याचा मग चाखिला ॥७॥अंबिकेसहित जो तळी गजी । पूजिती मुनि सदा असंग जी ॥ ज्यासि वेष्टुनि असे भुजंग जी । लक्षिला विमलअंतरंग जी ॥८॥जो महेश मधुवर्ण शोभतो । दानवांवरि मनांत क्षोभतो ॥ ज्यासि नाहिं अभिमान दंभ तो । त्या समीपचि सदैव शंभु तो ॥९॥तारिलें मुनिस चंद्रशेखरें । दाविलें प्रगट या युगीं खरें ॥ बिल्वपत्र वाहातील जे करें । उद्धरी प्रभु तयांचि लेंकरें ॥१०॥पद १४ वें देव कचेश्वर हा बरा हा ॥ध्रु०॥गुरुसुत दावित गुरुपद शाश्वत । जागृत देव महा ॥१॥देवऋषीचें कुमर सगुण संवत्सर । पन्नास आणि दहा ॥२॥कुंकुमठाणींचे विप्र निर्वाणीचे । अभिषेकास बाहा ॥३॥शुक्लेश्वर शिव उद्धरी जड जीव । लिंग अनादि पहा ॥४॥गौतमीचें जळ निर्मळ सोज्ज्वळ । पायीं तयाचे वाहा ॥५॥पश्चिमवाहिनी सद्गतिदायिनी । त्या स्थळीं नित्य नाहा ॥६॥जनहो निज मनीं तत्व उमजुनी । कोपरगांवीं रहा ॥७॥मध्वमुनीश्वर सांगे निरंतर । गुरुकृपें सर्व लाहा ॥८॥पद १५ वें पूजावें ज्योतिर्लिंग तें कुंकुमाचें ॥ध्रु०॥पाहे सुक्षेत्र वेळूर । प्राण्याजाऊं नको दूर । व्यर्थ होसी तूं चुकुर । खोटें व्यसन कामाचें ॥१॥धन्य वेळुर नगर । ऐसें नाहीं धरणीवर । नांदे जेथें घृष्णेश्वर । स्थान सर्वोत्तमाचें ॥२॥शिवालयींचें जीवन । त्याचें करी कां रे सेवन । होती पूर्वज पावन । बीज मुक्तिद्रुमाचें ॥३॥आली येळासी प्रतीत । जाला तापत्रयातीत । अनेक तरले पतित । सामर्थ्य ज्याच्या नामाचें ॥४॥येरुळींचे जे भूदेव । त्यांचें चरणोदक सेव । द्रव्य सत्पात्रीं तें ठेव । सार्थक होईल जन्माचें ॥५॥धन्य वेळगंगातीर । तेथील सेवील जो नीर । त्याचें चित्त होईल थीर । सस्वरूपीं नेमाचें ॥६॥करितां तीर्थाचें स्पर्शन । होतां देवाचें दरुषण । जालें दुरिताचें निरसन । गेलें भय यमाचें ॥७॥भावें मध्वमुनीश्वर । गातो महिम्न सादर । प्रसन्न जाला जगदीश्वर । तुटलें बंधन भ्रमाचें ॥८॥पद १६ वें हरली भवभयवेथा पाहातां परळी वैद्यनाथा रे ॥ सरली मायाममता भरली सबाह्यअंतरीं समता रे ॥ सहज जयंती नगरीमध्यें स्वार्थमुळें रमतां रे ॥ त्रिकाळ पूजा पाहातां भावें ज्योतिर्लिंगा नमितां रे ॥१॥जयजय गिरिजाकांता कांतीमध्यें राहसि शांता रे ॥ जेथिल अष्टतीर्थें करिती पातकाच्या अंता रे ॥ अपार तुझा महिमा न कळे संसारींच्या भ्रांता रे ॥ मध्वमुनीश्ववर म्हणतो दावी कैलासींच्या प्रांता रे ॥२॥हरिहरतीर्थीं स्नानें करुनी समस्त दानें देती रे ॥ पूजुनियां द्विजवृंदें त्यांचे आशीर्वाद घेती रे ॥ सुरवर ज्याच्या भेटिस धाउनि स्वर्गींहूनी येती रे ॥ संतति संपति देउनि अंतीं मुक्तिपदाप्रति नेती रे ॥३॥जो नर वैजयंतीमध्यें राहून काळ कंठी रे ॥ त्याच्या वैजयंती सुंदर रुळे माळ कंठीं रे ॥ सरस्वतीच्या तीरीं कीर्तन करी जो वाळवंटीं रे ॥ त्याचे पूर्वज पूजी गोपीराज वैकुंठीं रे ॥४॥ज्या तुजसाठीं योगी माळा अजपेची फिरविती रे ॥ कोण्ही प्रयागांत घालुनि घेताती करवती रे ॥ तो तूं देवा प्रगट नांदसि नारायणपर्वतीं रे ॥ येक प्रदक्षिणा करिती त्याला कैलासीं मिरविती रे ॥५॥श्लोक १७ वा ( वाराणशीस्तुती ) वाराणशीपुरपते जय विश्वनाथा । माझा प्रणाम तुझिया चरणासि आतां ॥ मी मागतों सहज पावन एक भिक्षा । द्यावी मला त्वरित शांभवी वेददीक्षा ॥१॥श्रीबिंदुमाधव तुला स्मरतों स्वभावें । संसारसिंधु मग बिंदु तव प्रभावें ॥ माझी कृपानिधि कधीं न करी उपेक्षा । ठेवी मला निज पदांबुजिं हे अपेक्षा ॥२॥श्रीधुंडिराज गणनाथ गजानना रे । संसारपिप्पलतरूसि विनाशना रे ॥ तूं देव सुंदर धुरंधर विघ्नहर्ता । वाराणशीस मज येथुनि ने समर्था ॥३॥मी प्रार्थना करितसे तुज दंडपाणी । माझे उदंड अपराध मना न आणी ॥ श्री भैरवा चुकवी रौरव यातना रे । वाराणशीस मज ने करुणाकरा रे ॥४॥वाराणशी त्रिभुवनेश्वर राजधानी । भागीरथीतटिं जगद्गुरु संनिधानीं ॥ जी प्राणीयासि मरणीं गति दे निदानी । ती धन्य धन अविमुक्त पदाभिराणी ॥५॥तूं स्वामि कार्तिक उमेश्वरनंदनारे । सेनापते करितसे तुज वंदना रे ॥ आनंद फार करितोस महास्मशानीं । त्वां मारिले असुर घाव दिला निशाणीं ॥६॥भागीरथी तवतटीं तनु ही पडावी । सायुज्य मुक्ति पदवी मज सांपडावी ॥ ही वासना हृदयिं उत्कट वाहतों गे । धाडी निरोप घरिं वाट मी पाहतों गे ॥७॥जे सोडूनि इतर लौकिक दभं वाणी । जे मानिली जननि केवळ शांभवांनीं ॥ जे पूजिली मुनिजनीं निज वैभवांनीं । ऐसी जगत्रजननी मज तूं भवानी ॥८॥तूझा अपार महिमा मुनि वर्णिती गे । तूं माझि माय बहिणी मणिकर्णिके गे ॥ तूझ्या जलेंकरूनिया तनु ही भिजो गे ॥ संसारताप अवघा मग हा विझो गे ॥९॥श्रीमध्वनाथलिखितार्थ अपूर्व वर्णी । विश्वेस यश ? परि सादर सर्व कर्णीं ॥ धाडूनि मूळ मज येथुनि ने प्रयागा । दावी गया न करि विष्णुपदा वियोगा ॥१०॥तूझा अपार महिमा कथिला महंतीं । हें ऐकुनी हृदयिं वाटत फार खंतीं ॥ तारील कोण मजला तुजवीण अंतीं । ही मध्वनाथ कविनें लिहिली विनंती ॥११॥ N/A References : N/A Last Updated : May 28, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP