मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता| पदे १११ ते १२० मध्वमुनीश्वरांची कविता गणपतीचीं पदें पद १ ते १० पद ११ ते २० पद २१ ते ३० पद ३१ ते ४० पद ४१ ते ५० पद ५१ ते ६० पद ६१ ते ७० पद ७१ ते ८० पद ८१ ते ९० पद ९१ ते १०० पद १०१ ते ११० पद १११ ते १२४ १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३२ पदे १ ते १० पदे ११ ते १९ पदे १ ते ५ पदे १ ते २ परशुरामाचे पद पदे १ ते ५ पदे १ ते ६ पदे १ ते ७ पदे १ ते ११ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४६ पदे १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३० पदे १३१ ते १४० पदे १४१ ते १५० पदे १५१ ते १६० पदे १६१ ते १७० पदे १७१ ते १८० पदे १८१ ते १८८ पदे १ ते १० पदे ११ ते १७ श्लोक १ ला अभंग २ रा अभंग ३ रा अभंग ४ था अभंग ५ वा आरती गणपतीची आरती विठ्ठलाची आरती पांडुरंगाची आरती रामाची आरती मारुतीची आरती कृष्णाची आरती खंडेरायाची आरती नरहरीची आरती नृसिंहाची आरती मोहनीराची आरती मोहनीराजाची आरती देवीची आरती जगदंबेची आरती ललितादेवीची आरती भागीरथीची आरती गुरूची पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते २८ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पद ३१ वें पत्रिका भागीरथी ३२ वीं पदे ३३ ते ३८ श्रीकृष्णाचीं पदें - पदे १११ ते १२० मध्वमुनीश्वरांची कविता Tags : kavitamadhvamunipoemकविताकाव्यमध्वमुनी श्रीकृष्णाचीं पदें - पदे १११ ते १२० Translation - भाषांतर पद १११ वें माझ्या गुरुचे पायवणी । तुझ्या पापाची करील धुणी ॥१॥त्याचा लागलियां बिंदू । होसी कैवल्याचा सिंधू ॥२॥माझा सद्गुरु उदार । तुझा करील उद्धार ॥३॥शुक योगींद्राचा पूर्ण । काय होसील उत्तीर्ण ॥४॥मध्वनाथ म्हणे देवा । माझ्या गुरुची करील सेवा ॥५॥पद ११२ वें देवा मातीनें निघते माती । डाग वस्त्राचे आंगींचे जाती ॥१॥तैसें घेतल्या आमुचें नाम । शुद्ध होसील आत्माराम ॥२॥निंद्य रजकाची सौंदणी । तीस वोंगळ मानिसी झणी ॥३॥देवा आगीनें निघते आग । वर्म जाणती सभाग्य ॥४॥स्वामी काट्यानें काढुनि काटा । दोन्ही सांडावे आव्हाटा ॥५॥देवा हिर्यानें विंधिती हिरा । तैसें होईल यदुवीरा ॥६॥कृष्णा होई तूं सगुण । मध्वनाथाची समजून खूण ॥७॥पद ११३ वें जीवलगा दीनानाथा मजलागीं तारि दयाळा ॥ध्रु०॥दीन तुझें बहू मी सिणलों रे । आतां तर्ही लवकरि दे अभयाला ॥१॥चित्त तुझ्या भजनीं नलगे रे । नरदेहीं दवडिलें व्यर्थ वयाला ॥२॥मध्वनाथा वरदा सखया रे । भवरिपु । निरसुनि दे विजयाला ॥३॥पद ११४ वें कृष्णा केशवा कालियदमना कलिकल्मषशमना । केव्हां भेटसी खगपतिगमना करितों मी नमना ॥१॥किरीटीं खोविसी केतकी सुमना कौशेयवसना । कानीं कुंडलें कौस्तुभधरणा केयूराहरणा ॥२॥करुणासागरा कमलारमणा करि बंधनहरणा । कान्हा कामिनी कामिति चरणा कुजदैत्योन्मथना ॥३॥केशिकौंसादिककुवलयकदना कौरवकुलदहना । श्रीमध्वनाथकविवर सजणा करितो या स्मरणा ॥४॥पद ११५ वें सये बाई माझा श्रीहरी । मज भासतो भगवंत वो ॥ध्रु०॥अविद्यापूतना मारायासी आली । यानें केला तिचा अंत वो ॥१॥आणिक गोकुळीं खेळतीं लेकुरें । करणें याचें अंतघंत वो ॥२॥मध्वनाथ याची बोलतसे खूण । ऐकुनि डोलती संत वो ॥३॥पद ११६ वें मुकुंदा मी तुजविण जालों मतिमंदु रे ॥ध्रु०॥तूंचि सुखकंदु रे । नादकळाबिंदु रे । लागो तुझा छंदु रे ॥१॥मध्वनाथ म्हणे तुझें नाम दीनबंधु रे । सोडी भवबंधु रे । भेटे गुणसिंधु रे ॥२॥हरि तुजविण जिवलग नाहीं रे ॥ध्रु०॥तूंचि सर्वांठायीं रे । पूर्ण दिशा दाही रे । यासी वेद गाही रे ॥१॥मध्वनाथ म्हणे मन हरपलें तुझ्यापायीं रे । हरि हरि हरि । अनुभवसुख जालें कांहींबाहीं रे ॥२॥पद ११८ वें तूं अनुदिनिं भज भगवंत रे ॥ध्रु०॥सेवी साधुसंत रे । जेणें दुःख अंतरें । ऐसें हरिरूप चिंत रे ॥१॥मध्वनाथ म्हणे आतां । राहे तूं सचिंत रे । देह नाशवंत रे । याची काय खंत रे ॥२॥पद ११९ वें मनमोहन माधवराया रे ॥ध्रु०॥वामन होउनि दानव मोहिसी । लहान मानवी काया रे ॥१॥दंडकमंडलुमंडित देखुनि । विस्मित ते नृपजाया रे ॥२॥पीत पटें कटि शोभतसे नीट । नाटक चेटक माया रे ॥३॥निर्मळ तें भुवनत्रयीं अर्पुनि । लागतसे बळी पायां रे ॥४॥बुद्धि सदोदित मध्वमुनीश्वर । मागतसे गुण गाया रे ॥५॥पद १२० वें हरि हा देवकीनंदन रे । वंशीं भूषण हा ॥ध्रु०॥देवकीनंदन कंसनिकंदन सनकसनंदन सेविती सीतळ चंदन रे ॥१॥कालियशासन श्रीगरुडासन दुरितविनाशन करित सुधारस प्राशन रे ॥२॥मध्वमुनीश्वर मृदुमधुरस्वर मुरलीरवें सुरकिन्नर रंजवी सुंदर रे ॥३॥ N/A References : N/A Last Updated : May 27, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP