मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता| पदे २१ ते ३० मध्वमुनीश्वरांची कविता गणपतीचीं पदें पद १ ते १० पद ११ ते २० पद २१ ते ३० पद ३१ ते ४० पद ४१ ते ५० पद ५१ ते ६० पद ६१ ते ७० पद ७१ ते ८० पद ८१ ते ९० पद ९१ ते १०० पद १०१ ते ११० पद १११ ते १२४ १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३२ पदे १ ते १० पदे ११ ते १९ पदे १ ते ५ पदे १ ते २ परशुरामाचे पद पदे १ ते ५ पदे १ ते ६ पदे १ ते ७ पदे १ ते ११ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४६ पदे १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३० पदे १३१ ते १४० पदे १४१ ते १५० पदे १५१ ते १६० पदे १६१ ते १७० पदे १७१ ते १८० पदे १८१ ते १८८ पदे १ ते १० पदे ११ ते १७ श्लोक १ ला अभंग २ रा अभंग ३ रा अभंग ४ था अभंग ५ वा आरती गणपतीची आरती विठ्ठलाची आरती पांडुरंगाची आरती रामाची आरती मारुतीची आरती कृष्णाची आरती खंडेरायाची आरती नरहरीची आरती नृसिंहाची आरती मोहनीराची आरती मोहनीराजाची आरती देवीची आरती जगदंबेची आरती ललितादेवीची आरती भागीरथीची आरती गुरूची पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते २८ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पद ३१ वें पत्रिका भागीरथी ३२ वीं पदे ३३ ते ३८ सद्गुरुचीं पदें - पदे २१ ते ३० मध्वमुनीश्वरांची कविता Tags : kavitamadhvamunipoemकविताकाव्यमध्वमुनी सद्गुरुचीं पदें - पदे २१ ते ३० Translation - भाषांतर पद २१ वेंकस्तुरीच्या संगें मृत्तिकेसि मोल । मोहरे तोळा तोले सुगंधेंसी ॥१॥तैसें संत संगें दीन पदीं चढे । काय येक न घडे गुरुकृपें ॥२॥तेलासी सुवास । त्याचा तो विलास भाग्यवंता ॥३॥वर्षाकाळीं वोहळ गंगेमध्यें आले । तत्काळ ते जाले गंगारूप ॥४॥चंदनाच्या संगें चंदन अन्य तरु । तैसा तो सद्गुरु साधकासी ॥५॥मध्वनाथीं भ्रमरकीटकाच्या न्यायें । नेणों जालों काय अकस्मात् ॥६॥पद २२ वें गुरुला शरण मी गेलों । जन्ममरणाविरहित केलों ॥१॥आतां सुखी जालों सुखी जालों । निर्भय भुवना आलों ॥२॥भुजंग कळला लटका । सत्यचि रज्जुचा तो कुटका ॥३॥मृगजळ अवघें वाव । तेथें काय करावी नाव ॥४॥साध्य साधन बाष्फळ । चिन्मय मध्वमुनीश्वर पुष्कळ ॥५॥पद २३ वें वंदीन सद्गुरुराज । मनामधें ॥ध्रु०॥त्याविण आणिक नेणें मी साधन । करीन घरांतील काज ॥१॥गुरुरायाचें झाडीन अंगण । काय जनाची लाज ॥२॥कामादिक रिपु करितील विघ्नें । मोडीन त्यांचा माज ॥३॥शासन करीन मी कळिकाळाला । आणीन त्याला वाज ॥४॥मध्वमुनीश्वर म्हणतो मजला । सांपडला निधि आज ॥५॥पद २४ वें गुरुराज दयाळ समर्था ॥ध्रु०॥मी शरणागत तव चरणाप्रति । वारी तूं सर्व अनर्था ॥१॥तूं करुणाकर पूर्ण सुखात्मक । बोधविसी परमार्था ॥२॥वर्णी तुझें यश मध्वमुनीश्वर । तूं जगदीश अकर्ता ॥३॥पद २५ वें गुरुराया मायबापा मी तों आहें परदेशी ॥ध्रु०॥तुजवीण कोण माझें । वारी भवशीण वोझें । हे सगुणा तूं क्षेम मजला कै देसी ॥१॥आठवितां कंट दाटे । माहेरची खंती वाते । हे सजणा सजणा तूं सांग मजला कै नेशीं ॥२॥घडि युगासम लोटि । दिवस मोजितसे बोटीं । हे नकळे नकळे रे मध्वनाथीं कै येशी ॥३॥पद २६ वें व्रत तप उद्यापन नेम ॥ येथें उपजेना प्रेम ॥१॥सोमयागादिक यज्ञ ॥ वैष्णव न मनिती सर्वज्ञ ॥२॥प्रयाग गंगा आणि कासी ॥ तीर्थें शिणविती आणिखांसी ॥३॥उपनिषदांची श्रवण गे ॥ विवरावी ते कवणें गे ॥४॥सांडुनि पंचीकरण गे ॥ सद्गुरु सेवा करणें गे ॥५॥साधन नलगे मजु बाई ॥ समाधि घेऊनि करुं काई ॥६॥भजतां सद्गुरुरायास ॥ चुकले सर्वहि आयास ॥७॥गुरुपदिं मानस रतलें गे ॥ अभिनव कैसें वितलें गे ॥८॥मी तो मुक्तिस नमनीं गे ॥ निजसुख गुरुपद नमनीं गे ॥९॥मध्वमुनीचा वेदांत ॥ गुरुहक्तीचा सिद्धांत ॥१०॥ पद २७ वें जा रे जनहो तुम्ही काशीस । छेदा प्रयागीकासीस ॥१॥आमचा सद्गुरुराज काशी । मोडिल कळिच्या राजिकासी ॥२॥जैथिल पर्वत रैवत । तेथील पहा जी दैवत ॥३॥पूजा शेषाद्रि तैलंग । रामेश्वर ज्योतिर्लिंग ॥४॥उत्तरेचा महिमा लई । जाऊनि राहा हिमालयीं ॥५॥नेदूनि सद्विप्रा दक्षिणा । करा पृथ्वी प्रदक्षिणा ॥६॥आम्हां नलगे येणें जाणें । तीर्थरूप सद्गुरु जाणें ॥७॥मध्वनाथाचा विश्वास । भक्त जाणे मी विश्वास ॥८॥पद २८ वें परम दयाळ दयाळ स्वामी माझा ॥ध्रु०॥मी अपराधी सेवक त्याचा बहुत मनांत गयाळ गयाळ ॥१॥भावें त्याला भजतां जनहो । अंतरीं फार निवाल निवाल ॥२॥मध्वमुनीश्वर स्वामी दयेनें । पुनरपि जन्मा न याल न याल ॥३॥पद २९ वें तुम्ही समर्थ मज करीं धरा ॥ध्रु०॥संतसंगें गंगातीरीं कठीन काळ बरा । विरक्त होऊनी हृदयकमळीं चिंतिन विश्वंभरा ॥१॥आपला त्र्यंबक सेवक जाणुनि त्यावर करुणा करा । तुमच्या बोले मध्वनाथ दयानिधि येईल माझ्या घरा ॥२॥पद ३० वें ऐसा गुरुचा अगाध महिमा । नकळे बाई आगमा निगमा ॥ध्रु०॥सद्गुरुरायें धरितां हस्तकीं । तेव्हां चित्त जालें तें स्वस्थ कीं । अभयंकर ठेवितां मस्तकीं । ब्रह्मरूप भासे समस्तकीं ॥१॥शरण गेलें त्याचिया चरणा । तयासी आली माझी वो करुणा । चुकविलें जननमरणा । भेटविलें जानकीरमणा ॥२॥आत्मारामाचिया भेटीसाठीं । रिघत होतें गिरिच्या कपाटीं । पडलें होतें साधनकचाटीं । मध्वनाथें चुकविली आटाआटी ॥३॥ N/A References : N/A Last Updated : May 27, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP