मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|स्फुट कविता संग्रह|
श्रीधरस्वामीकृत

श्रीधरस्वामीकृत

विविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.


अपार महिमा । संतांचा वर्णवे कोना ? ॥ध्रु०॥
आचार्य शंकर जाण, । देवी देत स्तनपान,
मतें उच्छेदी संपूर्ण. ॥१॥
हस्तामळक सज्ञान । अष्टावरुषें मोहन ।
बोले आचार्यास देखोन. ॥२॥
कलियुगीं हरिनाथ । अवतरला रमाकांत. ।
मांडीवरि श्रीपद दावित. ॥३॥
जयंतपाळें ब्राह्मण । कोंडिले हें जाणोन ।
मुकुंदराजें प्रगटिलें ज्ञान. ॥४॥
पशुमुखें वेदध्वनि । करविली प्रतिष्ठानीं, ।
ज्ञानेश्वर ज्ञानाची खाणि. ॥५॥
चौरंग करूनि सत्य । मारिला जो राजसुत, ।
उठवित गोरक्षनाथ. ॥६॥
मातेच्या वचनें बोध, । वैराग्य धडधडित शुद्ध, ।
महाराज राजा गोपीचंद. ॥७॥
महामुद्गल देखोन । करींचा पांवा टाकून ।
घेत हातीं धनुष्यबाण. ॥८॥
बिल्वमंगळ रामाहातीं । मुरली धरवी प्रीती; ।
अयोध्येंत केली हे ख्याति. ॥९॥
मिराबाईचें विष । प्याला जगन्निवास; ।
गोष्टि हे ठाउकी सर्वांस. ॥१०॥
नृसिंह मेहता महाभक्त । हुंडी त्याची भगवंत ।
द्वारकेमाजी भरित. ॥११॥
भानुदासाच्या गळां । घातला कंठींच्या माळा, ।
आंग रगडिलें ते वेळां. ॥१२॥
महारामेश्वर भक्त, । राम झाल त्याचा सुत; ।
नंदादीपा तेल आणित. ॥१३॥
एकनाथाचे घरीं । कावडी वाहत हरि; ।
चमत्कार दावी मुरारि. ॥१४॥
वधून टाकिली गाये । नामदेव हरीस बाहे. ।
उठविली सवेंचि लाहे. ॥१५॥
पद्मावतीचे प्राण । गेले होते निघोन. ।
जयदेवें आणिले परतोन. ॥१६॥
धाना जाटाचें शेत । पेरी स्वयें भगवंत. ।
तुकोबाच्या वह्या राखित. ॥१७॥
जसवंतास नवज्वर । जाला असतां फार, ।
जानकीनें पाजिलें नीर. ॥१८॥
अच्युताश्रमाचा नेम । सर्वां हातीं म्हणवीं राम. ।
भक्त भेटला नि:सीम. ॥१९॥
विठ्ठल पुरंदर । उघडिलें त्यास द्वार. ।
सुरदासा दिधले नेत्र. ॥२०॥
सेउ सीतम महाभक्त । अन्न देतीदुष्काळांत; ।
भगवंतें पाहिला अंत. ॥२१॥
कबीर निजधामा जात, । माघें न दिसेच प्रेत ।
पुष्पें आणि तुळसी होत. ॥२२॥
ध्यानीं ब स सेना भक्त, । त्याचें रूप राम धरित.
रायासीं, हो, तेल मर्दित. ॥२३॥
रोहिदास सप्रेम । फिरोनि ये शालिग्राम; ।
भावाचा भोक्ता श्रीराम. ॥२४॥
कूर्मदास नाहिंत पाये, । विठोबा भेटीस जाये. ।
सांवत्याचे पोटीं सामाये. ॥२५॥
कुल्लाळ गोरा भक्त, । तोडून घेतलेल हात; ।
पंढरिये पुढती फुटत. ॥२६॥
सतीदास मयराळ बाळ; । निश्चय देखोन निर्मळ
धांवली रुक्मिणी वेल्हाळ. ॥२७॥
नागोबा जनमैत्र; । व्याघ्ररूपें त्रिनेत्र ।
भेटला, हें मोठें चरित्र. ॥२८॥
चांगदेवें आपली । मोठ दृढ बांधिली. ।
पांडुरंगें हृदयीं धरिली. ॥ २९॥
नरहरी सोनारें । कडदोरा घडिला, खरें. ।
विठोबाचे माजीं न पुरे. ॥३०॥
अनामिक चोखामेळा । ब्राह्मणीं दवडिला; ।
विठोबा त्यालागीं फिरला. ॥३१॥
जालया समाधिस्त । दर्शन दे रंगनाथ. ।
कीर्तनेंचि समंध मुक्त. ॥३२॥
तोडून आशापाश, । सर्वदाही उदास, ।
महाराज स्वामी रामदास. ॥३३॥
देखोन गुरुभक्त । वृंदावन डोलत; ।
आनंदमूर्ति तो समर्थ. ॥३४॥
जयरामस्वामी संपूर्ण, । पांडुरंग प्रसन्न; ।
करविलें श्रीकृष्णदर्शन. ॥३५॥
ब्रह्मानंद समाधिस्थ । जाल्या, बाहे येक भक्त; ।
‘ वो ’ ऐसी ध्वनि उठत. ॥३६॥
असोत आतां बहुत भक्त; । वर्णितां नलगेच अंत. ।
ब्रह्मानंदरूप समस्त. ॥३७॥
श्रीधरें प्रेम गुणीं । संतमाळल गुंफूनि, ।
गळां घाली दिवसरजनी. ॥३८॥
अपार महिमा । संतांचा वर्णवे कोणा ? ॥ध्रु०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP