जो कां निर्गुण निर्विकार । निरामय निष्प्रपंच साकार । परि जगजीवन सर्वाधार । करीतसें संतरूपें जगदोद्धार । कृतत्रेत द्वापार । वेष धरोनी अपार । भवाब्धि पाववीत जे । नामें यांचीं परम पावनें । ऐका श्रवणें । चित्सुखसदनें । श्रीआदिनाथ, समर्थ दिगंबर दत्तात्र्य, पराशर, कुमार, अंबरीष आणि रुक्मांनद, ध्रुव, प्रर्हाद, विदुर, शुक, नारद, वसिष्ठ, वामदेव, पृथू, आंगद, उद्धव, अक्रूर, सनकादिक ऋषी, जनक विदेही, ज्ञानपूर्ण शशि, भीष्म प्रतापी, क्षेत्रधर्मनि:सीम याज्ञवल्क्य, दुर्वास, कपिलमुनी, कवि वाल्मिक, अगस्ती, जैमिनी, शिबी, कश्यप, कौंडण्य, शिरोमणी अयोध्याधीश आत्माराम, सुमीत्र सखा आणि राजा धर्म, भीम, अर्जुन वीर, पराक्रमी परम नकुल, सहदेव, परीक्षिती, गौतम, हरिश्चंद्र, मयुरध्वज, रावण, दधिचऋषी, निजभक्त बिभीषण, पुण्यश्लोक तो भरत सुलक्षण, वालितनय, नळ, नीळ, सुग्रीव, जांबुवंत, अतिसैनिक अतिउत्कृष्ट वनिंचे वनचर, भरद्वाज, गर्गाचार्य, भगीरथ, धौम्य, सुदामा, संजय, पुंडरिक, बळी आणि धनंजय, अहिल्या, द्रौपदी, वैदेही, तारा, मंदोदरी, अनुसूया मूळमाया हे खरी; ऐशा ह्या हो अनंत विभूती तेथें, श्रुती मौन्य पावती तेथें, दुर्मति दुर्बळ मंदमती, मी काय वदों महिमा न कळे अति. पूर्ण परात्पर माहेर सुंदर तो करुणाकर नामरुपीं हा भरला । नारायण कमलाक्ष जगपालन हा अवतरला ॥१॥सांप्रत आतां कलीयुगांत । जो कां ब्रह्म मूर्तीमंत । ... ... ... ... । जिवन्मुक्त विचरत शांत जनांत । मुकुंदराज आणि जयत्पालनृप, मीन, मछेंद्र, गोरख, जती, गैनीनाथ, जालिंद्रनाथ, कानिफा, गोपीचंद, माता मैनावती, सिद्ध पुरुष नाथपथी आणि गैनी, निवृत्ती, नामदेव, सोपान, मुक्ती आणि चांगदेव, तो कनकदास, हरिकबीर, पुरंदर विठ्ठल, जनतारक श्रीमत्परमहसं शंकराचार्य, जयदेव, महामुद्गलभट्ट, स्वामी नामदेव, मुग्धेश, मिराई, मृत्युंजय, बाजीत पठाण, धनाजाट, तो कूर्मदास, धागा, रोहिदास, सेना न्हावी, प्रीय भक्त चोखामेळा, जयराम, तुकोबा, रामदास, आनंदमूर्ती, निजरंगनाथ, केशवस्वामी, वडवाळसिद्ध नागेश, सांवता, सुरदास, पिपा राजपत्र, भानुदास, जनार्दन, येका, कृष्णदास, मुद्गल, मुक्तेश्वर, मानपुरी लोलींबराज, जोतिरानंद, तो नरसीमेहता, दासोपंत, विसोबा खेचर, नृसिंहभारथी, नरहरी मालू, कान्हो पाठक, अच्युताश्रम, गुहपेश्वर बावा, निंबराज जो मौनीबावा, निरंजन स्वामी, संतिदास, अच्युत भारती, हस्तामल, हो मुकुंद गोदडी, सेख महंमद, कान्होपात्रा, वामन स्वामी, तुळशीदास, सत्यामळ, गयेनी, गुप्तनाथ, उद्बोध केशरी, प्रगट गुप्त बहु, असंख्यात सौख्यांत निमग्न झाले । स्मरण करिति जे त्वरित तरति, अतिकुमति त्यजुनिया भुक्तिपावन स्वजन धाम परिपूर्ण काम हें नामरूप शिवराम वरदानंदकंद गोविंद परमात्मतयाशि स्वलिला नारायन कमलाक्ष जगपावन हा अवतरला ॥३॥