मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|स्फुट कविता संग्रह|
कपोताख्यान

कपोताख्यान

विविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.


आरंभीं नाम ज्याचें रमणिय स्मरतां, सर्व विघ्ना हरीतो, ।
जो कां सर्वांतरात्मा, जगजनक विधी, शूलपाणी. हरी तो, ॥
जो कां भक्तांतरंगीं भवभय हरुनी, देतसे मुक्तिपद्मा, ।
त्या श्रीमद्गणेंद्रा कर - युग - सिरसें वंदिलें पादपद्मा. ॥१
कमलजतनये ! श्रीशारदे ! आदिमाते ! ।
मृगनयनगुणाग्रे ! वारि सर्व भ्रमातें. ॥
नव निजपद ध्यातो, स्फूर्ति दे शीघ्र मातें, ॥
मग जगजनकातें वर्णितां फार माते. ॥२
जो लक्षिल्या लक्षसि लक्षवेना ।
जो ज्ञानगर्वासि परिक्षवेना ॥
जो कल्पवृक्ष सकळासि वसे निदानीं ।
तो सद्गुरु नमिन मी मज मोक्षदानी ॥३
वंदूं संत सुशांत साधक सभा भावी कवींच्या जना ।
वंदूं भक्त विरक्त मुक्त विषयी श्रोते ऋषी सज्जना ॥
ऐका पुण्यकथा चरित्रसुमनें वाक्पुष्पमाळा भली ।
त्या श्रीविष्णुपदीं समर्पुनि मुखें हृत्पंकजीं शोभली ॥४
मुक्तिस्थान प्रसिद्ध कांतिनगरी विख्यात भूमंडळीं ।
तेथें शीभ्रिनरेंद्र सत्यवचनीं पाळी ऋषी मंडळी ॥
कोणी दु:ख न देखती निशिदिनीं, आनंद लोका जनीं ।
तेथें ब्रह्मविचारणा अनुदिनीं, विश्रामता सज्जनीं ॥५
अश्वमेध शत येक कराया ।
धर्मबुद्धि उपजे नूपराया ॥
दुस्तरू भवसमुद्र तराया ।
मोक्ष अक्षय मुखासि वराया ॥६
नव्याणौ नृपयज्ञ सांग घडले, वस्त्रादि धान्यें धनें ।
आर्पी, विप्रकुळांशि इच्छित मनीं तोषी समाराधनें. ॥
शेखी एक उरे नरोत्तममणी तोही करी आदरें ।
तों देखे मुनि नारदा निजमखीं, मूजी अती आदरें ॥७
ह्मणे नारदू फार संतोष झाला ।
तुझ्या सुकृतें मोक्ष पैं पूर्वजांला ॥
अती शीघ्र शल्यारि स्थाना हराया ।
त्वरें यज्ञसिद्धी करी पूर्ण राया ॥८
मुनी मानसीं फार आनंदला हो ।
सुखानंदसिंधू मनीं कोंदला हो ।
‘ कली फावली येच वेळें मला हो, ।
छळूं सत्त्वधीरा, हरूं होमलाहो. ’ ॥९
वेगीं वेग करोनि नारद नभी लंघूनिया पोंकळी ।
गेला इंद्रपुरीं सुरेंद्रसदना लावावयातें कली ॥
इंद्रें देखुनि वंदिले मुनिवरा जोडोनि दोन्ही करा ।
पूसे गुह्य मनांत चिंतुनि असा ते आजि आज्ञा करा ॥१०
बोले नारद भूतलीं मख करी कांतीपुरीचा पती ।
शिभ्री भूप अमूप पुण्य करुनी भोगी सुखें संप्रती ॥
रायाला शत यज्ञपुण्य घडलें पावेल तूझ्या पदा ।
आतां पाहसि कायरे सुरपते जाईल हे संपदा ॥११
सिभ्री टपे शकपदा वराया ।
राखे तुझी संपति देवराया ॥
त्याच्या मखा निर्फल हो कराया ।
ते सांगतों सादर ऐक राया ॥१२
शक्राचे सुहितार्थ नारदमुनी अत्यादरें बोलतो ।
ऐके सादर होवुनी नगरिपू चीत्तीं धरी बोल तो ॥
यज्ञीं जो अतिथासि विन्मुख करी नेदी मनोभिष्ट हो ।
तैं त्याचा मख पूर्ण सिद्धि न पवे शास्त्रार्थ हा स्पष्ट हो ॥१३
याकारणें ऐक उपाय यातें ।
कापट्यरूपें छळिजे तयातें ॥
तुवां कपोतस्वरूपा धरावें ।
अग्नी ससाणास्वरुपी करावें ॥१४
जावें सत्वरि कांतिये नृपमणी यज्ञासि जेथें करीं ।
वैरत्वें अति लाघवें सुरपती बैसे नृपाचे करीं ॥
तुह्मां देखुनिया स्वभक्ष ह्मणुनी मागे ससाणा त्वरें ।
तैं राया अविचार येउनि घडे टाळीत तो सत्वरें ॥१५
अशा साकडामाजि राजा पडे हो ।
तुह्मालागिं पै संधि ते सापडे हो ॥
त्वरें सत्व जातां नृपू भोगभोगी ।
तयानंतरें तूं पदीं भोग भोगी ॥१६
मुनी नारदू युक्ति सांगे खरी हो ।
सुरेंद्रा गमे युक्तशी वैखरी हो ॥
कपोतस्वरूपी दिसे जंभशत्रू ।
ससाणा करी वन्हि तेव्हां स्वशत्रू ॥१७
त्वरें पातले क्षेत्र कांतीपुरीशी ।
दिठीं देखिला तो मखीं सत्वराशी ॥
वधो धर्मपुत्रादि सद्बुद्धि मंत्री ।
ऋषी आहुती घालिती वेदमंत्रीं ॥१८
बहू सुकृतें यज्ञ राजा करी हो ।
कपोता बसे शीघ रायाकरीं हो ॥
ससाणा त्वरें दूरि पै बैसलाहो ।
नराधीप देखोनिया हांसला हो ॥१९
तया पक्षिया देखिलें सर्व लोकीं ।
रुपादृष्टिनें राव त्यांतें विलोकी ॥
प्रधाना पुसे हा अभिप्राय दावा ।
ह्मणे मंत्रि पक्षिद्वया पूर्ण दावा ॥२०
ससाना कपोत्या धरायासि धावे ।
धरोनी करीं शीघ्र त्यातें वधावे ॥
ससाणा वध व्यर्थ वाया करी हो ।
तयाच्या भयें पक्षि बैसे करीं हो ॥२१
शरण तुज कपोत प्राण रक्षावयातें ।
मरण हरुनि राया सौख्य देई तयातें ॥
परि हरुनि ससाणा दीन रक्षी नृपाळा ।
तरुनि कुल मुभूशाकीर्ति घेई कृपाळा ॥२२
कपोत्यासि मागे ससाना नृपातें ।
ह्मणें तृप्त मी त्याचिया देहपातें ॥
भुकेनें बहू पीडिलों शिभ्रिराया ।
त्वरें भक्ष दे या क्षुधेतें हराया ॥२३
मंत्री ह्मणे दवडितां शरणांगता हो ।
जाईल सत्य नृपकीर्ति न सांगतां हो ॥
वेगीं कपोतरिपुतें परतें करा जी ॥
हे गोष्ट मान्य करितां बहु लोक राजी ॥२४
ससाणा ह्मणे धन्य हो धन्य हा कीं ।
अधर्मा करी धर्म बाहेर हाकी ॥
वदा नाम यांचें कृपेनें नृपेशा ।
दुरात्मा दिसे मूळ हाकीं अपेशा ॥२५
नरेंद्रू ह्मणे ‘ नाम याचें सुबुद्धि ।
पुरोहित हा शाहणा तर्कबुद्धि ’ ॥
ससाणा परीसोनि माथा तुकीं हो ।
ह्मणें ‘ नाम या ठेविलें कौतुकीं हो ॥२६
जसें नाम तैशी क्रिया यासि नाहीं ।
क्रियेसारखी ते दिसे वासना ही ॥
महादेव शंभू तया नाम स्थाणू ।
जनीं बोलताती द्रुमालागि स्थाणू ॥२७
तसें नाम या ठेविलें हो सुबुद्धि ।
परी अंतरीं नांदतो हा कुबुद्धि ॥
सुमंत्री बहू देखिला आजि दृष्टि ।
न दावी जना यासि लागेल दृष्टि ॥२८
ऐशासि नीति पुसतांचि  पुरोहिताला ।
तेथें नृपासि सुख काय उणें हिताला ॥
आतां कुमंत्रिवचना न धरी मनातें ।
अन्नार्थि मी पुरविजे मम कामना ते ॥२९
त्या कारणें बहुत कष्टुनि लाभु केला ।
कां जे त्वरीत शमवूं जठरीं भुकेला ॥
मातें न द्याल तरि कोण तुह्मांस वारी ॥
जैसें तृष्णें न धरवें बहुलोट वारी ॥३०
माता वधी गरल पाजुनि लेंकुराला ।
ग्राशी पिकें धरणि कोण धरी कराला ? ॥
किंवा जलाब्धि महितें बुडवी जळें हो ।
कीं अग्नि भूमि दहितां सकळै जळे हो ॥३१
किंवा जगीं नभ पडोनि घडे अपाया ।
कीं अन्न वीष घडल्या न दिसे उपायां ॥
किंवा क्शितेश अवनीति करी तरी हो ।
नाहीं प्रयत्न दुसरा निज अंतरीं हो ॥३२
तैसें कराल जरि भक्ष्य न सावयासी ।
नाहींच अन्य मजलागिं उपाव यासी ॥
त्या रक्षुनी मज न देउनि अन्नपाणी ।
हें मान्य होय कवण्यापरि चक्रपाणी ॥३३
x x x x करुनि ताडन सज्जनांला ।
विप्रांसि पूजुनि दिलें जरि भोजनाला ॥
कीं मार्ग रोधुनि जनां हरुनी धनाला ।
नेमें करी सकळही व्रत साधनांला ॥३४
हें पुण्य कीं अघ ह्मणोनि भल्या विचारा ।
ते संत सांगति तुह्मां बरव्या विचारा ॥
शास्त्रानुसार तुह्मीं वर्ततसां अचारा ।
द्यावें असें वचन पैं अतिथासि चारा ॥३५
तूं सर्व जाणशि नृपा निगमागमाशीं ।
हे नाकळेचि मजलागि विहंगमाशी ॥
विप्रासि अन्न दिधलें बहु धर्मराजें ।
आद्यापि कीर्ति जगतीं बहुधा विराजे ॥३६
गृहस्थाश्रमीं पुत्र कन्यादि दारा ।
क्षुधार्थी त्वरें जाति त्याच्याच दारा ॥
अतीथा मनोभिष्ट देताति भावें ।
जगीं चालती नीति ऐशी स्वभावें ॥३७
येती अतीथ विपिनीं ऋषी आश्रमातें ।
तेहीं विखूख न व्हतां हरिती श्रमातें ॥
ऐश्वर्यता असुनियां अतिथां उपाशी ।
हें देखिलें नवल भूपति तूजपाशीं ॥३८
यज्ञीं अतीथ दिठिं देखुनि इष्टदेशी ।
हे कीर्ति लोकवदनीं बहुदूर देशी ॥
माझेंचि भक्ष मज नेदिसि तूं कसारे ।
मिथ्याच बोलति जगीं जन लोक सारे ॥३९
ज्यांचे तयासि जरि नेदिसि आहराशी ।
या सुकृतें ह्मणसि तोष करुं हराशी ॥
भिक्षूक विन्मुख करी तरि यज्ञासिद्धी ।
नाहीं, न होय तव कीर्ति जगीं प्रसिद्धी ॥४०
रुक्मांगदू मोहिनि लागि राते ।
ह्मणोनि पुत्रेम दिधलें शिरातें ॥
तैशीच कीर्ती वरिली श्रियाळें ।
भिक्षार्थिया पुत्र दिला दयाळें ॥४१
हरीश्चंद्र स्वप्नीं द्विजा दे धरा हे ।
तयाची जगीं कीर्ति आद्याप राहे ॥
तशी म्या तुह्मा घातली नाहिं कोडी ॥
स्वभक्ष्या दिल्या तेंचि कीं लक्ष्य कोडी ॥४२
नरेंद्रा त्वरें देउनी पाखरा या ।
तुझें पुण्य सत्कीर्ति तूं राख राया ’ ॥
असें घातलें भूपती साकडे हो ।
नराधीश पाहे सुपुत्राकडे हो ॥४३
बोलें पुत्र ‘ कपोत त्यास दिधल्या सत्कीर्ति वेगीं पळे ।
केलें पुण्य अमूप सर्वहि त्वरें जातां न लागे पळें ॥
यासाठीं अतिथासि ‘ नास्ति ’ वचनें जावें ह्मणावें धरा ।
रायें रक्षुनि दीन हा निजगृहीं कीं त्या वरा पाखरा ॥४४
तोडा कपोत हृदयीं भयशृंगळा हो ।
धाडा त्वरीत विपिनासि तया खळा हो ॥
जोडा अपार सुकृतें शरणार्थियातें ।
रक्षूनियां निजगृहांत न द्या तयानें ॥४५
पूर्वीं हो शरणागतू विभिषणूं लागे श्रिरामापदीं ।
रामें त्या चिरकाल पट्ट दिधला लंकेसि राज्यापदीं ॥
मौनांके उदधी शरण्य रिघतां पाळी जलाब्धी तया ।
तैसें तूम शरणांगता निजगृहीं रक्षी जगद्धातया ’ ॥४६
ऐसें परी वचन सांगतसे पित्यातें ।
ऐके कपोनरिपु तो बहु कोप त्यातें ॥
क्रोधें पुसे नृपवरासि ससाण पक्षी ।
‘ सांगा ’ ह्मणे कवण हा आमुचा विपक्षी ॥४७
‘ माझ्या हो जठरीं क्षुधा खवळली अत्यंत पैं नावरे ।
हाही त्यावरि धर्म - विघ्न करितो याचेम वदे नांव रे ’
सांगे भूपति ‘ ज्येष्ठ पुत्र अमुचा धर्मू असें नाम रे ’ ॥
हांसें पक्षि ह्मणे ‘ अधर्म दिसतो मी तों उपाशी मरे ॥४८
नाम रम्य गमलें करणीं हो ।
पाहतां न दिसतें करणी हो ॥
जेंवि नाम अमृतासि पियुष्णा ।
बोलती जन नदीसि पियुष्णा ॥४९
तैसेंचि धर्म अभिधान तुझ्या सुतातें ।
ठेवीयलें बहुप्रिती तनयासि तातें ॥
जैसा सुबुद्धि आवलोकियला प्रधान ।
तैसाचि धर्म तव आत्मज हा निधान ॥५०
ऐकोनि धर्म करिसी जरि पुत्रवाणी ।
तैं हो मखांत अतिथांप्रति काय वाणी ॥
मातें गमे नृपतिनंदनवाक्यार्थें ।
होईल यज्ञ परिपूर्णहि स्वल्प अर्थें ॥५१
या धर्मपुत्रवचनें अघ ये घराशीं ।
येईल सत्य अपकीर्ति अमोघ राशी ॥
आतां अधर्म वचना धरिशील चित्ता ।
झाली बहूत जबरी मज भूकचिंता ॥५२
अस्थिशिरांची शरिरांत जाळो ।
त्यातें क्षुधा सर्व समूळ जाळी ॥
हे तों मला पापिणि फार जाची ।
सर्वांतरीं बाधक हें निजांची ॥५३
गांधारी शत पुत्र मृत्य रचुनी त्यामाजि वेघो सर ।
पाला चिंचणिचा करें वरबडी खातां क्षुधा वोसरे ॥
ऐशी हे अनिवार भूक नृपती मातें करी यातना ॥५४
ऐशा परी बोलुनि दीन वाचे ।
पडे क्षिती मूर्छित मी नवाचे ॥
प्राणांत आला धरि मृत्यु वाटे ।
कृत्रीम पैं सत्य जनास वाटे ॥५५
ऐसा ससाना पडतां धरां हो ।
सिभ्री ह्मणे सत्वर त्या धग हो ॥
राया गमे हे बहु विघ्न दीसें ।
पुन्हां उठे तैं मज हांसु दीसे ॥५६
नरेंद्रू वदे थोर हा थोर घाला ।
प्रधाना ह्मणे त्या मुखी नीर घाला ॥
तया पक्षिया घालुनी शीत वारा ।
त्वरें उठवा या अपेशा निवारा ॥५७
मंत्री त्या करपल्लवीं धरुनिया घाली मुखीं जीवना ।
जंघीं घेउनि पल्लवें समिर त्या घाली तरी जीव ना ॥
बोले राव जनासि त्यास उठवा सर्वस्व देईन मी ।
विप्रातें ह्मणतो तयास जिववा भावें पदाब्जा नमी ॥५८
ह्मणे राव यत्नासि कांही करारे ।
कसें विघ्न आलें शिवा शंकरारे ॥
ह्मणे लौकिकीं लाज येईल मातें ।
असा राव चित्तांत पावे श्रमातें ॥५९
नरेंद्रू ह्मणे कायसे युक्ति यासी ।
बहू बोलती भक्ष्य द्याहो तयासी ॥
कपोता ससाण्यासि देवोनि खाया ।
नृपा तूं करी पूर्ण वेगीं मखा या ॥६०
असें सर्व लोकीं सुबुद्धे मतीला ।
बहूता परी सांगतीं भूपतीला ॥
कपोता ससाण्यासि द्या भूवरा हो ।
प्रभू अंतरीं गोष्टि हे वीवरा हो ॥६१
न देतां तरी शीघ्र तो मृत्यु पावे ।
कपोतासि देणें मुचे हा उपावे ॥
असें सांगती लोक राज्योत्तमातें ।
कपोता ह्मणे हेंचि कीं विघ्न मातें ॥६२
कांपें कपोततनु ऐकुनि लोकवाचे ।
आलें ह्मणे मज अरिष्ट खरें जिवाचें ॥
चिंता अशी बहुत होय विहंगमातें ।
म्लानें मुखें वदत पक्षि नृपोत्तमातें ॥६३
‘ऐके वृतांत नृपती मम अंतरीचा ।
मी वास कीं करितसे विपिनांतरीचा ॥
वाळें क्षुधीत जाहली ह्मणुनी ऑहारू ।
आणावया करित जात वनीं विहारू ॥६४
फिरे काननाभीतरीं मी चराया ।
नव्हे अन्यथा गोष्टि हे साच राया ॥
मुखीं यास घेऊनि जातां गृहा हो ।
अकस्मात झेंपावला हा ग्रहा हो ॥६५
विधीनें कसें लीहिलें कीं कपाळा ।
त्वरें हा रिपू पाठि लागे कृपाळा ॥
भयें याचिया हिंडलों फार भूमीं ।
न सोडीच हा त्रासलों तैं प्रभू मी ॥६६
भयें शत्रुच्या फीरतां पै नृपारे ।
दिठीं देखिलें तूज राजाधिपारे ॥
रिपूच्या भयालागिं वेगीं हराया ।
कराब्जीं तुझ्या बैसलों जाण राया ॥६७
कांतीपुरी परम पावन पुण्यक्षेत्री ।
तूं राव क्षत्रकुलश्रेष्ठ सुधर्म क्षेत्री ॥
तूं भूपतीं शरण रक्षक मस्तहस्ती ।
यालागिं शीर्घ बसलों तुझिया स्वहस्तीं ॥६८
वासुकी प्रभु जसा भुजगीं हो ।
तेंवि तूं नृपति या भुजगीं हो ॥
या निमित्य शरणांगत राया ।
येत मी रिपुभयाब्धि तराया ॥६९
जाईल कीं ह्मणुनि शत्रुसि जीव वाया ।
राया तुला शरण मी तनु जीववाया ॥
आलों विचारुनि मनीं बहु दूर दृष्टीं ।
मृत्यू परंतु न चुके सहसा अदृष्टीं ॥७०
द्यावेंच; निश्चय समस्त सभाजनांचा ।
तैसाच भाव दिसतो तुझिया मनाचा ॥
नाहींच बोल तुजला, मम पूर्वकर्में ।
भोगावया लिहियले विधिविश्वकर्में ॥७१
कांहीं तरी पर उपद्रव ये जयातें ।
तेणें शरण्य रिघिजे क्षितिराजयातें ॥
राया तया जिवविजे शरणांगतातें ।
हे नीति लावुनि दिली रतिरंगतातें ॥७२
तूं जाणशी सकल गोष्टि चराचराची ।
मी केवढें तुजपुढें मति खेचराची ॥
आलों शरण्य तुजला रिपुतें जिणाया ।
तूं हूनि देसि तरि कोण नको ह्मणाया ? ॥७३
ज्वावें बहू ह्मणूनि प्राशिति आमृतातें ।
त्या आमृतेंच जन पावविले मृतातें ॥
कीं मायबाप वदिती निज बाळकाहो ।
त्यातें उपाय न दिसें क्षितिपाळका हो ॥७४
तैसें तुह्मीं मज दिल्या रिपुच्या करीं हो ।
संरक्षणा कवण तैं मजला करी हो ॥
पाहे विचार शरणांगत वोपितां जी ।
हा न्याय मान्य करि केंचि जगत्पिता जी ॥७५
हें गोष्टि ऐकुनि जिवा त्यजिती अपत्यें ।
स्त्री गर्भिणी, तनु त्यजील, बहू अपत्यें ॥
आला असा कठिण काळ जिवास न्याया ।
तूं वर्तसी नृपति या परि नीतिन्याया ॥७६
आतां तुझ्याजवळि टाकिन हा स्वदेहो ।
त्यानंतरें रिपुकरीं ममदेह दे हो ॥
परंतु शत्रुकरपल्लविं होम राया ।
नेदींच हे तनु कदापि वधा कराया ॥७७
नृपेशा मनीं वाटली थोर चिंता ।
समस्तां ह्मणे युक्ति यालागिं चिंता ’ ॥
‘ प्रिये युक्ति सांगे ’ पुसे भूप तीतें ।
वधू सत्यवंती वदे भूपतीतें ॥७८
दुजें भक्ष्य देवोनिया प्राणनाथा ।
तया तृप्तवा वांचवा या अनाथा ॥
नृपें ऐकतां तोषला फार कांहीं ।
बहु मानली गोष्ट सर्वादिकां ही ॥७९
ससाण्याप्रती शिभ्रि राजा वदे तो ।
ह्मणेरे दुजें भक्ष्य घे मांस देतों ॥
असें ऐकतां तो ह्मणे दे प्रमाण ।
नृपू घे ह्मणे भाक माझी प्रमाण ॥८०
मत्बोलण्या संशय मानिसी हो ।
धरी खरा निश्चय मानसीं हो ॥
आधींच गा देइन भक्ष्य तूतें ।
त्यानंतरें साधिन या क्रतूतें ॥८१
अशी भाक पैं देउनी लोकतातें ।
निरोपी त्वरें ते क्षणीं तो दुतातें ॥
ह्मणे मोल देवोनिया मांसखंडा ।
ससाण्यासि देवोनि हें विघ्न खंडा ॥८२
ससाणा नृपालागि सन्मानवाचे ।
ह्मणे पाहिजे मांस पै मानवाचें ॥
असें ऐकतां राव थोरा विचारीं ।
पडे, युक्ति तैं मंत्रियातें विचारीं ॥८३
मंत्री ह्मणे अरितमांतकभास्करातें ।
कालींच जी वधियलें द्वय तस्करातें ॥
ते आणुनी त्वरित तस्करदेह राया ।
तें मांस जी विहग क्षुप्तिस दे हराया ॥८४
ससाणा ह्मणे ऐकिली मंत्रिवाचा ।
नृपा मी न घे तस्करांचे त्रिवाचा ॥
नको चोर हेरादिकां दुर्जिवाचा ।
नको सर्वथा मेलिया निर्जिवाचा ॥८५
कोणी तरी तव गृहा प्रतिये भिकारी ।
तोही परंतु मृत भक्ष्य न आंगिकारी ।
मत्भक्ष घेउनि मला शवमांस देशी ।
तैं केविं कीर्तिं प्रगटे दश दिग्प्रदेशीं ॥८६
न घे मी शवाचें नृपा जाण साचें ।
मला मांस देगा जित्या माणसाचें ॥
असें ऐकतां लागली काळजी हो ।
नृपा संकटाचा गमे काम जी हो ॥८७
कसा देउं मी दुसर्‍या प्राण दंडा ।
मनीं पाहतां पाप तेही उदंडा ॥
असा राव चित्तांत चिंता वरी तो ।
ह्मणे संकटा कोण पै आवरीतो ॥८८
विनंती करी सत्यवंती प्रियेशा ।
ह्मणे मद्वपूमांस दे घे सुयेशा ॥
वदे आत्मजू त्यास मी मांस देतों ।
असें ऐकतां पक्षि तेव्हां वदे तो ॥८९
असे देह ज्या बत्तिसां लक्षणीं हो ।
तयाचे दिजे मांस पै ये क्षणी हो ॥
नृपें ऐकतां आत्मजा सांगता हे ।
ह्मणे मद्दपू मांस तो मागतां हे ॥९०
नरेंद्रें तदा आणवीला तराजू ।
कपोता तयें बैसवी लोक राजू ॥
करी खङ्ग घेवोनि कापी स्वकाया ।
तुळेमाजि मांसासि घाली तुकाया ॥९१
तुला जोखितां मांस झालें अपूर्ण ।
कोपता दिसे आगळा भार पूर्ण ॥
असें देखतां मास थोडें तराजें ।
पुन्हां कापुनी घातले शिभ्रिराजें ॥९२
परी पक्षितो जाहला थोर भार ।
तया देखता धाकला लोकभार ॥
बहू बोलती विघ्न हें आकळेना ।
नृपा काय होईल कीं तेम कळेना ॥९३
जंव जंव नृप कापी मांस घाली तुकसी ।
तंव तंव विहगाचा भार तो आधिकेसी ॥
जन ह्मणति कसा हो पातला हा छळाया ।
जडपण धरुनीयं मांस घेतो तुलाया ॥९४
तदा भूवरे निश्चयेच्या बलेसी ।
दृढावा करी मांस घाली तुळेसी ॥
जिथें देखिलें मांस रायें देहातें ।
त्वरें ते स्थळीं मांस कापी स्वहातें ॥९५
असें कापिता आत्म देहासि रावो ।
दिसों लागल्या अस्थि मेंदू शिरा हो ॥
नये शब्द तो शस्त्र ही आवरेना ।
नृपाची अवस्था नृपा आवरेना ॥९६
तरी तो कपोता तुळे भार घाली ।
हहा:कारशी लोकवाचा निघाली ॥
अहारे विधी काय झालें कपाळा ।
कशी हे विधी पातली लोकपाळा ॥९७
सकळ जन तदा हो राजयाच्या अकांतीं ।
रुदन करिति तेव्हां सर्वही लोक कांती ॥
ह्मणति नृपति धर्मे पाळिगो, विप्र, भूला ।
पुनरपि अह्मि कैसें देखुजी या प्रभूला ॥९८
नर नमिति कपोत्या वंदिती बायका हो ।
ह्मणति विहग राया गोष्टि पै आयका हो ॥
हळुपण धरुनी या तूलने व्हा समान ।
अह्मि जन तुमचे हो हाचि आह्मांस मान ॥९९
( अपूर्ण )

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP