मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|स्फुट कविता संग्रह|
चंडेश्वरकथा

चंडेश्वरकथा

विविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.


श्रीशंकरचरणांतें  पूजिति जे, दृढ धरोनि करणांतें, ।
त्यांच्या दुष्कृतविपदा वारुनि, देतो तयां शिव स्वपदा. ॥ १
पूर्वीं सद्भृगुगोत्रीं  संभूत, प्रथित माल्यवद्रोत्रीं ।
होता कणभद्र मुनी.  ध्यात शिवातें मनादिकां दमुनी. ॥ २
करुनी मनोजयातें  सेविति भार्या, तथा सुत जयातें, ।
त्या दोघांसहित भला  राहे तो ऋषि शिवार्चनीं निभला. ॥ ३
तेथेंचि दैवगतिनें  येउनि, वैदर्भ, सुज्ञ भूपतिनें ।
पूजुनि त्यांतें विधिनें,  देउनि तांबूलहेमवसनांतें, ।
त्यांच्या नमुनि पदांतें,  गेला भूपाल तो जनपदातें. ॥ ५
धेनु सदा चाराया  सांगे ऋषि तो सुता, सदाचारा, या. ।
सुज्ञ तदर्भक हा कीं  वेगीं तैं काननासि त्यांतें हांकी. ॥ ६
रानीं सरिदुपकंठा  आला, हृदयीं स्मरोनि शितिकंठा. ।
मग तो तेथें रोधीं  सार्‍या गायींसि धांवुनि निरोधी. ॥ ७
पाजुनि त्यांसि पयातें,  दुहुनी मृण्मयिंच भाजनिं पयातें, ।
सोडी; तंव त्या चरती,  कोमलयवसस्थळींच संचरती. ॥ ८
नीहुनि तटिनीभुवनीं,  जो शिव विख्यात या तिहीं भुवनीं ।
मूर्ति तयाची करुनी,  पूजी दृढ भक्ति मानसीं धरुनी. ॥ ९
पढतचि रुद्राध्याया,  क्षीरें अभिषेक करि अबाध्या या. ।
चंदनवन्यसुमांतें  अर्पी जपत सुसहस्त्रनामांतें. ॥ १०
धूप, तथा श्रुतिवेद्या  दावुनि दीपहि, फलादि नैवेद्या, ।
तांबूलाद्युपचारीं  पूजुनि, मग शैवमंत्र उच्चारी. ॥ ११
मोदें सकलशिवातें  स्थापुनि हृदयीं तया तंव शिवातें, ।
उरल्या दुग्धघटातें  घेउनि तो चालिला गिरितटातें. ॥ १२
त्या धेनुवांसरांसी  हांकुनियां शीघ्र पाववि घराशी. ।
मातृकरीं कलशातें  देउनि, चित्तीं स्मरे महेशातें. ॥ १३
जाउनि नित्य वनातें,  गाइ चारोनि, तो त्रिनयनातें ।
पूजुनि, ये सदनातें.  क्रमिता जाला अशा बहु दिनांतें. ॥ १४
येके दिवसीं माता  त्यासि पुसे ते, वदोनि मृदु माता. ।
“ गाई असती शंभरि;  आणिसि कां दूध येक कुंभबरी ? ” ॥ १५
बापहि त्यासि दटावी.  “ तूझी करणी नसे ऑम्हां ठावी. ।
प्राशिशि, देशी इतरां ?  सांग यथार्थचि नको सळूं पितरां. ” ॥ १६
जें पिउनि वांसरांनीं  उरलें, तें पय न वेंचिलें रानीं. ।
केलें नाहीं प्राशन.  काय नसे मज, वदा, घरीं अशन ? ॥ १७
संशय कांहीं न धरा.  जाणति मानस उमामहेश, धरा. ।
ऐशा तद्वचनातें  ऐकुनि, ते म्हणति “ जाइं विपिनातें. ” ॥ १८
पुनरपि तो प्रेमानें  गाई चारित, तसाचि नियमानें ।
शिवलिंगातें पूजी;  घालुनि तत्क्षीरसंग्रहीं पूजी. ॥ १९
स्वसुता पाडुनि विसर,  ब्राह्मण तो, चरति जेथ गोविसर, ।
आला त्याच अरण्या. पाहे पुत्रा. शिवा, श्रितशरण्या, ॥ २०
अभिषेकुनि देवा या  येणें पय सर्व वेंचिलें वायां. ।
केला लटिका शपथ.  “ प्रवळहि धरिला ” म्हणे “ कसा कुपथ ? ” ॥ २१
कुविषयधृतानुरागें  ऋषिनें मग त्या सुतावरिल रागें ।
पूजेचीं उपकरणें,  जाउनियां जवळि, लोटिलीं चरणें. ॥ २२
तेणें कृतपापाचा  केला प्रच्छेद तूर्ण बापाचा. ।
पडिला तो तंव सहसा, भूवरि हतमूल, पृथु अनोकहस. ॥ २३
पाहुनि अद्भुत करणी  भक्ताची, शिव रिझोनि अंत:करणीं, ।
प्रकटुनि, त्यासि वदे तो.  “ वांछित जें, सांग. तेंचि विभक्त देतों. ” ॥ २४
ऋषिसुत वंदुनि विनवी.  “ स्वामी, तूझीच भक्ति, नित्य नवी ।
संतत सेवाहि घडो.  मानस हें विषयचिंतनीं विघडो. ” ॥२५
ईश म्हणे, कैलासीं  राहीं मजजवळि संतत विलासीं. ।
होसी प्रथमगणांचा  नायक तूं, निधि अनेक सुगुणांचा. ॥ २६
तूं चंडकोप, बाला.  ताडुनिया पीडिलें तुवां बाला. ।
‘ चंड ’ म्हणुनि नाम तुला  होइल, मद्भक्तिही, जगीं न तुला. ” ॥ २७
ऐशा शुभ वचनांतें  ऐकुनि, तो मग वदे त्रिनयनातें. ।
“ मद्विरहदु:ख जाया, देईं जनकासि नंदन दुजा या. ” ॥ २८
“ या तूझ्या जनकातें,  जननीतेंही मदीय लोकातें ।
तुजसह दिव्य विमानीं  बसवुनि नेतों. यथार्थ हें मानीं. ” ॥ २९
ऐसें त्या अनघातें  बोलुनि, तेव्हांचि सत्वर तिघांतें ।
यानीं बसवुनि बरवे  आणि गेहासि ईश वाद्यरवें. ॥ ३०
देऊनि गाणपत्य,  स्वभक्त चंडासि मानुनि अपत्य, ।
स्थापी शिव निजऐक्यीं.  पूर्ण कृपे त्यासि नित्य अवलोकी. ॥ ३१
ऐशी कथा पुराणीं  प्रथिता हे शिवरहस्य सुपुराणी. ।
“ पढतां पातक नुरवी, ”  वीरेश्वरकवि म्हणे, “ मति स्थिरवी. ” ॥३२

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP